Monologue For Audition Male | मोनोलॉग फॉर ऑडिशन मेल

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो , आपली आजची स्क्रिप्ट एका नवीन विषयावर आहे, त्यामुळे तुम्हाला ती नक्की आवडेल. ” Monologue For Audition Male | मोनोलॉग फॉर ऑडिशन मेल “ ; आजकाल आपल्या आजूबाजूला, समाजात काय चालल आहे हे आपल्याला सर्वाना माहीतच आहे. लोकांची मानसिकता दिवसेंदिवस बदलत चालली आहे. ” बोलणाऱ्याचे तोंड दिसते ” अस एक सुंदर वाक्य आपण दररोज ऐकत असतो पण आज आपल्या या स्क्रिप्ट मध्ये एक व्यक्ति आहे जो या सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आहे, जो समाजाला ,व्यवस्थेला जाब विचारतोय.

स्क्रिप्ट वाचा आणि स्क्रिप्ट च्या खाली कमेन्ट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा. [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

पात्र :

पुरुष (वय वर्ष साधारण ३० -४५ वर्ष )

वेळ:

१ मिनिट ५५ सेकंद

Monologue-For-Audition-Male
Monologue For Audition Male | मोनोलॉग फॉर ऑडिशन मेल

2 Minute Monologue For Audition Male | ऑडिशन स्क्रिप्ट मराठी फॉर मेल

एका आणि सरळ वाक्यात सांगायच झाल तर तुम्ही षंढ आहात …हो हो षंढ . दरवर्षी फक्त खोटी आणि तात्पुरती आश्वासन. आज तुम्ही बघताय ना, आमच्या अवतीभोवती असणारी माणस आम्ही गमावत चाललोय. आहे तुमच्यावर विश्वास पण तो ही ठेवल्याची किव येते कधी कधी.

प्रत्येक वेळी मेणबत्त्या पेटवून सांत्वणांचे कार्यक्रम साजरे करताना मनात एक हुरहूर येऊन ठिणगी पेटवून जाते,म्हणते मेणबत्त्यांचं प्रोडक्शन जर बंद केल तर कदाचित असे कार्यक्रम साजरे करायची वेळच येणार नाही.

आता काय करणार माझं मनच आहे थोड चलविचल टाईप च, उगाच दुसऱ्यांचा विचार करत बसतंय. सोडून द्यावं ना, ते आपल्या बाबतीत नाही घडल ना तर सोडून द्यावं. नाही पण आता मी शिकतोय हा थोडथोडं तुमच्यासारखं वागायला. कशाला उगाच दुसऱ्याचा विचार करा,आपलं चाललंय ना, उगाच नसता खटाटोप कशाला?

दाखवताना कितीही बिनधास्त आणि हसरे असणारे आपण केसाच्या टोकाएवढी का होईना पण भीती मनात असतेच. माझ्याही आहे, तुमच्या ही असेल, यांचाही मनात असेल त्यांचाही असेल. पण मग या भीतीवर काही मार्ग वैगेरे काढायचा प्रयत्न केलाय ? अ
नसेल केला , कारण हे अजून तुमच्या घरात घडलेलं नाही आहे. तुमच्या घरात लागतायत LED दिवे , बटण दाबा आणि रोषणाई सुरु, ” पण कधी हे दिवे विजून मेणबत्त्या त्यांची जागा घेतील सांगता येनार नाही ” .

आता वाटली ना भीती आला ना कुटुंबाचा चेहरा डोळ्यांसमोर , हे आधी नव्हतं …नव्हतं हे आधी ….आता दिसायला लागलय तुमच्या चेहऱ्यावर. झाल…. माझं काम झाल… तुम्हाला जाणीवच करून द्यायची होती ती दिली, आता मी मोकळा. पुन्हा कुठेतरी मेणबत्त्या पेटण्याआधी मला तरी तिथे जायला हव. जायला हव मला .. जायला हव.

हे सुद्धा वाचा:

१) नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF

२) मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script

Monologue For Audition Male PDF Free | मोनोलॉग फॉर ऑडिशन मेल पीडीएफ फ्री

Monologue-For-Audition-Male
Monologue-For-Audition-Male
Download Now

Tag: Monologue For Audition Male, Monologue for audition male pdf, Monologue for audition male in Marathi, Monologue for audition male for Movies, 2 minute monologue for audition male, 1 minute dramatic monologues for males,Male monologues from plays, Short monologue for audition male

Leave a Comment