पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो , नेहमीप्रमाणे आज सुद्धा एक धमाल audition script [ एकपात्री नाटक स्क्रिप्ट फॉर फिमेल (Audition) ] घेऊन आलोय. ही script अणि हा विषय आपल्या आजुबाजूला प्रत्येकाने अनुभवलेला किवा पाहिलेला आहे.
या script ची पार्श्वभूमी अशी आहे की या audition script मध्ये एक मुलगी आहे जी एका मुलावर प्रेम करते अणि रोज त्याला भेटायला नाक्यावर जाते. आज ती त्याला भेटायला गेली असता तिच्या वडिलांना ही खबर समजली आहे. आता आईवडील घरी तिला जाब विचारण्यासाठी तिची वाट बघत आहेत .ती घरी आल्यावर आईवडील अणि मुलगी यांच्यामध्ये संवाद होतो अणि त्यावर मुलगी स्पष्टीकरण देते आहे…आता पुढे …..
पात्र :
मुलगी ( वय वर्ष 20 -30)
वेळ :
1 मिनिट 50 सेकंद

Ekpatri Natak Script in Marathi | एकपात्री नाटक स्क्रिप्ट
हो बाबा तुम्ही जे काही ऐकलंय ते खर आहे. मला सुयश आवडतो आणि मी त्याला नाक्यावर भेटायला गेले होते.बाबा ..बाबा प्लिज माझं आधी एकून घ्या , मी तुम्हाला हे सर्व सांगणारच होते पण त्याआधीच तुम्हाला कळलं.
खर तर आज मी याचं विषयावर बोलायला त्याला भेटायला गेले होते की आपण अस किती दिवस लपून लपून भेटणार ? या सगळ्याची कल्पना आपण घरच्यांना द्यायला हवी. तोहि आज त्याच्या घरच्यांशी बोलणार होता.तसा तो खूप चांगला मुलगा आहे शिवाय नौकरी आणि घरही आहे स्वतःच, वडील लहानपणीच गेले त्यामुळे परिस्थिती आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
आई अग तु तरी सांग ना, हे बघा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही तुम्हाला जर का वाटलं की तो मुलगा माझी काळजी नाही घेऊ शकणार, मला सुखात नाही ठेऊ शकणार तर मग तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करेन पण एकदा ….एकदा त्याला भेटून घ्या.
कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून मी त्याला बघतेय सकाळी लवकर कॉलेज मध्ये येऊन लायब्ररीमध्ये एकटाच वाचत बसायचा, मग लेक्चर अटेंट करून दुपारी न जेवताच निघून जायचा आमच्या फ्रेंडस् च्या ग्रुप मध्ये सुद्धा नसायचा. नंतर माझ्या एका मैत्रीकडून कळलं की तो कॉलेज सुटल्यावर पार्ट टाइम जॉब करायचा.कॉलेज ची फी स्वतः भरायचा आणि घरात आईला हातभार सुद्धा लावायचा.
बाबा मला कळतंय की स्वतःच्या पोटच्या पोरीने आपल्या वडिलांपासून लपवून स्वतःचा निर्णय स्वतः च घेणं हे पचवण कुठल्याही बापासाठी किती कठीण आहे. म्हणूनच आजवर सामाज्यात तुमची मान खाली जाईल अस काहीही मी केलेलं नाही.मला जे सांगायचं होत ते मी सांगितलंय, आता यानंतर तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा:
दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download
मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male
Ekpatri Natak Script in Marathi PDF Free | एकपात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी फ्री

Tag: एकपात्री नाटक स्क्रिप्ट फॉर फिमेल (ऑडिशन ), Monologue Script for Female (Audition), marathi script,script marathi,script of marathi, marathi natak script, natak script in marathi, एकपात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी , marathi audition script,एकपात्री नाटक स्क्रिप्ट फॉर मेल, ekpatri natak script in marathi,एकपात्री नाटक script.