पूर्वकल्पना :
नमस्कार आजच्या या आर्टिकल मध्ये आलोय एक नवीन स्क्रिप्ट सोबत ” Audition Script in Marathi For Boy “, नॉर्मली आपण ज्या वेळेस अॅक्टिंग शिकत असतो त्यावेळी बऱ्याचदा अस होत की आपल्याला प्रॅक्टिस साठी स्क्रिप्ट उपलब्ध होत नाहीत किवा ज्या असतात त्या paid असतात. त्यामुळे आपल्या या प्लॅटफॉर्म वर जास्तीत जास्त स्क्रिप्ट आपण फ्री मध्ये आपलब्ध करून देतो जेणेकरून तुम्हाला छोट्या स्क्रिप्ट संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
एक मुलगा आहे ज्याच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तो वर्तमानपत्र विकत असतो. असाच एक दिवस तो वर्तमान पेपर विकत असताना एक आजोबा त्याला भेटतात. आजोबा त्याच्याकडून पेपर विकत घेतात आणि बोलता बोलता त्यांच्या खूप गप्पा रंगतात. आता पुढे……. [ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
पात्र :
गणेश (पेपर विकणार, वय वर्ष १४-१५ ) , आजोबा ( वय वर्ष ७०-८० )
वेळ :
१ मिनिट ५० सेकंद

Short Audition Script in Marathi For Boy शॉर्ट ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फॉर बॉय
गणेश : आज की ताजा खबर …आज की ताजा खबर ..पेपर घ्या पेपर …चला चला फक्त ५ रूपये.. ओ अंकल सुट्टे पैसे द्या ना .
चला चला पेपरवाला …
आजोबा : ए बाळा एक पेपर दे बघू
गणेश : हे घ्या आजोबा….
आजोबा : किती झाले ?
गणेश. : फक्त ५ रुपये आजोबा.
आजोबा : बरं… हे घे आणी उरलेल्या पैश्याच चॉकलेट खा.
गणेश. : नाही नाही ..नको नको माझी आई म्हणते आपण फक्त आपल्या कामाचे पैसे घायचे आणि तसहि आज माझे सगळे पेपर
विकले गेले आहेत.थॅन्क यु.
आजोबा : बर…अस का ..खूप छान. असाच मेहनत कर आणि आई-वडिलांच नव मोठ कर .
गणेश : हो आजोबा .
आजोबा : बर मला एक सांग तु कुठल्या शाळेत शिकतोस नाही म्हणजे शाळा आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणं
हे खूप जोखमीच काम आहे नाही ?
(थोडी तारीफ करत म्हणतात )
गणेश : नाही मी तर शाळेत जातच नाही, फक्त पेपर विकतो.
आजोबा : अरे पण का .? तुला आवडत नाही का शाळा?
गणेश : आई म्हणते शाळा शिकायचं आपलं काम नाही . शाळा शिकायला म्हणे खूप पैसे लागतात आणि
माझ्या आईबाबांकडे एवढे पैसे नाहीत.
आजोबा : एक काम कर हे सर्व किती पेपर आहेत , सर्व मी घेतो ….. हे घे पैसे .आता दे ते पेपर माझ्याकडे.आता खुश ना ?
नाही त्याच काय आहे आज की नाही माझे सगळे मित्र येणार आहेत घरी , म्हणून मी ही सर्व पेपर घेतले सर्वाना एक एक द्यायचा आहे.
गणेश : थँक यु आजोबा.
आजोबा : मला एक सांग मघाशी पण मी पेपर घेतला तेव्हा तु थँक यु म्हणालास आणी आता पण , तुला हे इंग्रजी
शब्द कसे काय माहित ?
गणेश : इकडे या …कानात सांगतो …त्याच काय आहे ना इथे बाजूला मोठ्ठ ऑफिस आहे आणि इथे काम करणारे
साहेब लोक या हॉटेल मध्ये येतात. एकमेकांशी ते इंग्रजी बोलतात त्यामुळे ऐकून ऐकून मी पण बोलतो.
आजोबा : अरे वा. खूप हुशार आहेस की. मला एक सांग तुका शाळेत जायला आवडेल का ?
गणेश : हो आजोबा !
आजोबा : मग ठीक आहे, मी आज तुझ्या घरी येईन आणि तुझ्या आईबाबांशी बोलेन. आजपासून तुझ्या सर्व शिक्षणाची जबाबदारी
माझी.
गणेश : हो चालेल…… थॅंक यू आजोबा.
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
हे सुद्धा वाचा :
Male Monologues For Auditions | ऑडिशन मोनोलॉग फॉर मेल
(2024)Children’s Monologues For Auditions in Marathi | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन
Audition Script in Marathi For Boy PDF Free | ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फॉर बॉय पीडीएफ फ्री
Tag: दोन पात्रांसाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Boy,Short audition script in marathi for boy,Best audition script in marathi for boy, Audition script in marathi for boy pdf download,Audition script in marathi for boy pdf,Audition script in marathi for boy in hindi, Audition script,marathi audition.