मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script

पूर्वकल्पना :

एक वडील आपल्या कुटुंबासाठी काय काय करतात हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट आहे. एका व्यक्तीची नोकरी सुटल्यामुळे क्षणात त्याच्या नशिबाची दारं बंद पडली . त्याला काय करावं काही सूचत नाही . घरी बायको आणि छोटा मुलगा आहे. एका कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे ही व्यक्ती हाताला मिळेल ते काम करतोय म्हणजेच स्टेशनरी मटेरियल घरोघरी जाऊन विकतोय. Follow:  Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]

असेच एक दिवस बाजारात तो वस्तू विकत असते वेळी घडलेला छोटासा प्रसंग……..

Marathi-Serial-Audition-Script
मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script

पात्र :

वडील ( 25-35 वर्ष )

वेळ :

1 मिनिट 30 सेकंद

Marathi Serial Audition Script For Male | पुरुषांसाठी मराठी सिरीयल ऑडिशन स्क्रिप्ट

नमस्कार दादा. …पेन घेणार …नको तर हे घ्या ना पेन्सिल,रबर ,वह्या काहीतरी …..आणि हे बघा ते तर कलर पेन्सिल आहेत तुमच्या मुलाला खूप आवडतील.
घ्या ना …देऊ …नकोच का ..? ठीक आहे ..

ओ साहेब ..असं कोणाकडून काही घ्यायच नसेल तर नका घेऊ  निदान त्याची थट्टा तरि नका करू.
आणि हो मी अडाणी नाही आहे … चांगल्या नोकरीला होतो ,पण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच फसवलं .कंपनीच्या मोठ्या फ्रॉड मध्ये माझं नाव आलं तेही काही चूक नसताना. कंपनीने हि विचार न करता काढून टाकलं.

घरी बायको आहे , मुलाची शाळेची फी …. काही काहीच करू शकत नाही आहे मी. आज  महिना झाला घराबाहेर पडतोय पण कोणी काम द्यायला तयार नाही आहे.
दादा पोराला चॉकलेट घ्यायच म्हटलं तरी 2 रुपये खर्च करायची ऐपत नाही ओ.

(शेजारी जाणाऱ्या व्यक्तीला पेन विचारतो)
भाऊ पेन देऊ …घ्या ना …या पेनाने तुमचा मुलगा अभ्यास करील तर चांगल्या गुणांनी पास होईल… घ्या घ्या…अजून काही देऊ सगळं आहे हा आपल्याकडे ..हा..

नाही नाही आता परत ती चूक नाही नौकरी च्या भानगडीत परत नाही पडणार. शेवटी चाकरी ती चाकरीच. तुम्ही कितीही करा ,जिवाच्या आकांताने मेहनत करून काहीही मिळत नाही . शिवाय कधीही काढतील याची भीती आहेच.

त्यापेक्षा धंदा काय वाईट आहे. स्वतःच्या मनानुसार  कामं करायच , हा पैसे थोडे कमी मिळतात पण रात्री सुखाची झोप लागते.
मला माहित आहे आज मला लोक नाव ठेवतील … ठेवूदे पण उद्या हीच लोक माझ्याबद्दल चांगल बोलतील. कसंय ना लोकांना एखाद्या व्यक्तीचा वर्तमान दिसतो पण भूतकाळ नाही.

असो तुम्हाला काही देऊ का ? 
काय सगळं !

पण हे सगळं घेऊन तुम्ही काय करणार …असो माझा धंदा तरी होतोय ….
धन्यवाद बर का …या तुम्ही…

Follow:  Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]

हे पण वाचा :

मराठी फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Script For Audition

09 जबरदस्त Secret फिल्मे बच्चे जरूर देखे |Kids Movies in Hindi

Monologue Audition Script For Male Free PDF | मोनओलॉग ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल फ्री पीडीएफ

PDF image 8
Download Now

Tag: मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट , Marathi Serial Audition Script ,Marathi serial audition script pdf,Marathi serial audition script for male,Marathi serial audition script for female,Marathi serial audition script for girl,marathi audition script.

Leave a Comment