पूर्वकल्पना :
एक डॉन आहे, त्याने एका माणसाला किडनॅप केले आहे. किडनॅप करायचं कारण असं की त्या माणसाने एक दिवस आधी एक बॅग लपवली आहे, आणि त्या बॅगेमध्ये बक्कळ सोन आहे. आता ती बॅग शोधण्यासाठी हा गुंड आणि त्याची माणसं त्या साध्या माणसाला टॉर्चर करत आहेत.
काहीही करून ती बॅग मिळवली पाहिजे या उद्देशाने तो डॉन नाही नाही ते प्रयत्न करून बघतोय………आणि पुढे …
पात्र :
35-40 वर्ष (पुरुष)
वेळ :
1 मिनिट 40 सेकंद
Marathi Script For Audition | मराठी स्क्रिप्ट फॉर ऑडिशन फ्री
घेऊन ये रे त्याला इकडे , त्याची मस्ती उतरवतो .
काय रे ए जास्त शहाणा झाला काय ….
काय केलं !!!!!!! ….?
म्हणजे कर्म करायची तु आणि वरून आपल्यालाच विचारतो काय केलं म्हणून.
हे बघ ए आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे हा गुमान कबूल करायचं , ती बॅग कुठे लपवली ?
मि काय विचारतोय ? काल पाळवलेलि बॅग कुठे लपवली ?
आता गुमान बोलतोयस कि …. हे बघ अश्या चिल्लर कामासाठी वेळ नाही हा माझ्याकडे .तु आपल्या साल्याचा पैचानवाला आहेस म्हनुन नायतर एवढ्यात अख्खा घोडा खाली केला असता.
चल बोल पटकन बॅग कुठे आहे . (ओरडून) बॅग कुठे आहे . अबे याला कोणीतरी समजावा रे हा माझ्या डोक्यात चाललाय. ए बारक्या इकडं ये …हा तुझा आदमी हाय ना . सांग त्याला पप्याभाई बोलतात आपल्याला. 5 मर्डर,10 दरोडे, हाप मर्डर, सगळे पकड़लेस ना तर 25-30 गुन्हे अंगार घेऊन फिरतोय.
खाकी ची पण हिम्मत नाही हा झाली आजपर्यंत आपल्या अंगाला टच करायची.
तुला माहित आहे त्या बागेत काय आहे ते…आपल्या नशिबाची चाबी आहे त्यात . एकदा का ती बॅग सापडली ना कि आपण मालामाल होणार .
आणि तुम्ही रे ..आपापला वाटा घायचा नि गायब व्हायच कळलं का ?
पण हे सगळं करायचं असेल तर आपल्याला तु ती बॅग द्यायला हवी नाही का ..? (बोलताना एक गोळी झाडतो )
हे बघ ए हि गोळी तुझ्या छाताडात पण घुसली असती , आता एक पाय तर गेलाच आहे , तोंडाची पट्टी नाही काढली ना तर दुसरा पण जाईल . कळतंय …
आता कसं .. मागापासून बोलला असता तर पाय तरी वाचला असता .
ए गण्या इकडे ये…जा काय पण कर आणि ती गाडी शोध ,मला बॅग पाहिजे काय ? आणि रिकाम्या हाती माझ्याफुडें यायच नाही हा.
आणि तु रे जोपर्यंत आपला प्लॅन sucess होत नाही ना … तोपर्यंत तू इथंच राहणार .
जर शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर जीवाला मुकशिल ..
कळल ………
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Best Marathi Script For Audition for male | पुरुषांसाठी बेस्ट मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फ्री
Tag: Best Marathi Script For Audition for male, पुरुषांसाठी बेस्ट मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फ्री,script in marathi for audition,female audition monologues,sample script,serial audition script,dialogue for audition,marathi natak script pdf free download,scripts for auditions,marathi audition script.