Marathi Audition Script For Female(आई Monologue) | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

आजची स्क्रिप्ट सगळ्यांच्या जवळची आणि आवडीची आहे, आई घरात कश्या प्रकारे सर्व गोष्टी करत असते त्याचप्रमाणे तिचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चालेलला संघर्ष याच्यावर आधारित ही स्क्रिप्ट आहे. Marathi Audition Script For Female(आई Monologue) | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट “ सकाळ झाली आहे आणि राहुलची आई नेहमीप्रमाणे सकाळच्या कामांमध्ये व्यस्त आहे, राहुलचे बाबा ऑफिसला जायचं तयारीत आहेत. राहुलच्या बाबांच्या स्कूटरची चावी, रुमाल आणि पट्टा घेण्यासाठी राहुलची आई बेडरूममध्ये येते एवढ्यात तिचे लक्ष जातं की राहुल अजून झोपलेलाच आहे . त्याच कॉलेज आहे आणि एव्हाना तो कॉलेजला जाण्यासाठी कुठून तयार झाला पाहिजे होता. राहुल ला झोपलेले पाहून आईने त्याच्यावर शब्दांचा भडिमार सुरू केला तो खालील प्रमाणे.. Marathi Audition Script For Female….[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

Marathi-Audition-Script-For-Female
Marathi-Audition-Script-For-Female

पात्र :

आई (30-40 वर्ष )

वेळ :

02 मिनिट 30 सेकंद.

Marathi Audition Script For Female | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल :

आई: काय बाई , सकाळी सकाळी किती हि कामं ,एक संपलं कि दुसरं आहेच,कधी कधी वाटतं नको हे सगळं ,सर्व सोडून कुठेतरी दूर निघून जावं ,” निदान तिथे तरी सुखाने जगता येईल “.

राहुल ..राहुल ..अरे गधड्या अजून तु उठलास च नाहीय , “अरे कधी उठणार, कॉलेज ला कधी जाणार” , तुमचा म्हणजे ना ,आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही .एक दिवस कॉलेज ला जाणार , दोन दिवस सुटटी करणार . मला एक कळत नाही तुम्हाला कोण विचारात नाही का रे कॉलेजमध्ये ?

सर्व बावळटपनाचा कळस आहे.आमच्या वेळी शिक्षक वर्गाच्या बाहेर छडी घेऊन उभे रहायचे .सुट्टीच सोडाच पण वर्गात जायला जरा उशीर तरी झाला ना कि बाकावर हात आणि हातावर छडी .

बरं ! छडी सुद्धा काय साधी छडी नाही बरं !! चांगली वेताची काठी तासून घेऊन यायचे , ” एकदा खाल्ली कि परत उशिरा जायची हिम्मत नाही व्हायची “. पण खरच तेव्हाचे शिक्षक सुद्द्धा खूप चांगले, मायाळू,आणि आम्हाला समजून घेणारे होते.

तुला सांगते माझे बाबा फारसे कुठे नोकरी ला नव्हते, वाडवडीलांची राखून ठेवलेली शेती करायचे,कसायचे आणि हो या शेतीच्या जीवावरच बर का आम्हा चार हि बहीणींच शिक्षण, लग्न खूप थाटात केलं.

तुमच्या सारख खाऊ ला पैसे नाही रे मिलायचे आम्हाला आणि नाही हे असले पिझा ,बर्गर .कधितरी कोणी खाऊची पूडी दिली कि पुढचे कित्तेक दिवस त्याचा कवर दाखवत फिरायचो.

आमच्या आईने पण खूप सोसलय रे आमच्यासासाठी, एक वेळ स्वतः चा आनंद बाजूला ठेवायची पण आपल्या मुलांना काहि कमी पडू द्यायची नाही.
मग काय लग्न झालं ,तुझ्या बाबां बरोबर मुंबई ला आले.

(तेवढ्यात रोहन च्या बाबांचा आवाज येतो ..अग डबा झालाय का ??)
हो हो आले आले… अग बाई बोलण्याच्या नादात त्यांचा डबाच द्यायला विसरले.
मि पण काय बोलत बसलेय ..अरे ए .. तु परत झोपलास ..उठतोस कि नाही ..कि पाणी ओतू..चल आधी जा आवरून घे..

[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा :

मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script

मराठी फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Script For Audition

Marathi Audition Script PDF Download Free | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री

PDF image 7
Download Now

(इथे दिलेल्या स्क्रिप्स डाऊनलोड करून , तुमच्या सोयीनुसार कार्यक्रम, स्नेहसंमेलन, त्याचप्रमाणे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा या स्क्रब तुम्ही वापरू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रिप्ट आवडत असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा , हीच आमच्या कामाची पोचपावती)

Tag: Marathi audition script, marathi audition script for female,marathi natak script pdf marathi audition script for female,marathi audition script for male, marathi audition,Marathi audition script pdf,marathi audition update download,marathi audition script pdf download,marathi audition script pdf download free,aai marathi audition script.

4 thoughts on “Marathi Audition Script For Female(आई Monologue) | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट”

Leave a Comment