पूर्वकल्पना:
एक घर आहे , एखादे जूने घरंदाज घर असावे अगदी तसे. त्या घरातील सासूबाई खूपच कठोर आहेत,त्यांच्या बोलण्याशिवाय एकडच पण तिकडे होत नाही . नुकतंच लग्न होऊन आलेली त्यांची सून आज त्यांना त्यांना विचारल्याशिवाय घराबाहेर गेली , आणि ती घरात येणार तेवढ्यात तिची सासू घरात वाट बघतच उभी होती . सासू सुनेची चांगली खबर घेते ….आता पुढे …………
स्क्रिप्ट आवडली तर नक्की कमेन्ट करा आणि अजून कुठल्या प्रकारची स्क्रिप्ट वाचायला आवडेल हे सुचवा, तसेच खाली दिलेल्या सोशल मीडिया अकाऊंट ला सुद्धा फॉलो करा.
पात्र:
सासूबाई (40-50 वर्ष )
वेळ:
1 मिनिट 40 सेकंद
Audition Script For Girl | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर गर्ल्स
सासूबाई:(Audition Script in Marathi For Female)
थांब खबरदार पाऊल पुढे टाकशील तर गाठ माझ्याशी आहे.
आ ..? काय झालं ?..काय झालं म्हणून मलाच विचारशील, म्हणजे आपण चूक करायची आणि वर दुसऱ्याला च विचारायच कि काय झालं .
कुठे गेली होतीस ? आम्ही विचारलं कुठे गेली होतीस? घरात कोणी मोठे आहेत कि नाही, काही विचारन्याची पद्धत ?
नाही म्हणजे आता कुठे जायच , कधी जायचं याचा निर्णय पण तुम्हीच घेणार का?
बस्स..! आम्हाला काहीही ऐकायचं नाही, या घरात असं यापुढे चालणार नाही , कळलं .या घरात राहायचं असेल तर या घरचे सगळे नियम काटाक्षाने, पाळावेच लागतील नाहीतर …
हा …तरिच म्हटलं बायको चा बैल अजून कसा आला नाही मध्ये नाक खूपसायला. हे बघ ती या घरात नवीन आहे पण तु ! तुला तर सगळं माहित आहे ना, मग तिला सगळं समजून सांग. यापुढे असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
एके काळी आम्ही सुद्धा या घरात नवीन होतो पण आम्ही या घरचे कायदे कानून शिकून घेतले.
आणि हे हातात काय आहे ?… शी हे बघ हि असली थेरं इथे चालणार नाही कळलं …!
आणि आवरा आता आजपासुन जेवणाचं सुद्धा तुलाच बघायला लागेल, आम्हाला आजपासून आमच्या सुनेच्या हातचा स्वयंपाक चाखायचाय ‘ बघू तरी सुनबाई किती सुगरन आहेत त्या, कसंय ना नुसतं प्रेम करणं, लग्न करणं हे करताना खूप सोपं वाटत पण सांभाळायला तीतकच कठीण. कळतंय का ?
*****अॅक्टिंग सुधारण्यासाठी पुस्तक : ” मराठी नाटक आणि रंगभूमि “*****
हे जे दिसतंय ना ते एवढ्या सहजासहजी नाही बर का ,हे कमवायला तितकीच अक्कल आणि हुशारी हवी .
आणि तु रे आमच्याबरोबर् आत ये आम्हाला महत्वाच बोलायचं आहे तुझ्याशी, तिकडे मागे मागे जायची गरज नाही आहे.
आणि हो तिला नीट सांग बर , म्हणावं आमच्या घरात पेशंट आहेत त्यामुळे जरा हात पटपट चालवा , पुढच्या तासाभरात जेवण तयार पाहीजे.
चला …आता आमचं तोंड बघत काय बसलाय …निघा …
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा :
मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script
Top10 Acting Books in Hindi-ऐक्टिंग सीखे घर बैठे सिर्फ यह किताब पढे
Audition Script in Marathi For Female
Audition Script in Marathi For Female PDF | ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फॉर फिमेल पीडीएफ
Tag: monologue meaning in marathi,marathi comedy script for audition,acting monologues female,female audition monologues,hindi monologue script for female,marathi natak script pdf free download,महिलांसाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Female.