Marathi Serial Audition Script | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना:

नमस्कार मित्रहो आजच्या स्क्रिप्टमध्ये आपण पाहणार आहोत ” Marathi Serial Audition Script “ अर्थात मराठी सिरियलऑडिशन स्क्रिप्ट. या स्क्रिप्ट मध्ये एक माणूस/मुलगा आहे ,त्याची बायको,छोटा मुलगा आणि आई-वडील असा त्याचा परिवार आहे. बोलता बोलता त्याची बायको त्याला विचारते आहे की तिला जॉब करायचा आहे. हे ऐकून त्याची चिडचिड होते आणि तो तिला नकार देतो मग तिचे सासू सासरे तिला सपोर्ट करतात.

पात्र:

पुरुष/मुलगा (वय वर्ष 25-35 )

वेळ:

1 मिनिट 40 सेकद

Marathi-Serial-Audition-Script
Marathi Serial Audition Script | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट

Marathi Serial Audition Script 2024 | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट 2024

ए तु माझं डोक खाऊ नकोस हा. कालरात्रीपासुन तु मला विचारतेस आणि मी सुद्धा तेव्हाच उत्तर दिलेलं आहे तरीही पुन्हा तेच. म्हणजे नवऱ्याच्या बोलन्याला काही किंमत नाही ? असंच ना . नुसतं आपली किटकिट किटकिट .ताप करून ठेवलाय डोक्याला. आठवड्याभराने कधी एक रविवार भेटतो तो सुद्धा नीट जाऊ देत नाही.

जॉब करायचाय म्हणे . काही गरज आहे का ? ” मी इथे कमवतोय, महिन्याच्या महिन्याला पैसे घरी येतायत, स्वतःच घर आहे” . एवढं सगळं असताना कोणी कशाला जॉब करायचा विचार करेल ?

हो हो …चुकलो मी तेव्हा सांगितलं तिथेच माती खाल्ली.(थोडा रागावून).मुळात तुझ्याशी लग्न केल हेच चुकलं माझं.
लग्नाआधी सांगितलेलं म्हणे .. हो सांगितलेलं, पण त्यावेळी काही कारण होती तशी आणि आता त्याचा तिळमात्र ही संबंध नाही आहे.
काही नाही ग आई सुनेला जॉब करायचा आहे म्हणे. आता तूच समजावं हिला. नुसतं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे. अग करुदे काय करुदे ! तु पण आता बोल तिच्या बाजूने. अहो बाबा तुम्हीपण ! बर आता तुम्ही एवढं ठरवलंच आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते.(बाजूला आईवडील आहेत असे समजून).

हे बघा आता याचं काय करणार ? दिवसभर याला रडत ठेवायचय? आजी आजोबा आणि आई तुम्ही चौघेजण काय ते बघून घ्या हा .(बाळाकडे बघत …थोडा राग शांत करत…)

आणी तु जरा आत ये बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ आय एम सॉरी ..माझं चुकलं… चुकल म्हणजे जरा जास्तच बोललो. ठीक आहे तुला जॉब करायचा तु कर माझी काहीच हरकत नाही आणि आता तुझे सासू सासरेच तुझ्या पाठीशी आहेत तर मी काय बोलू?
बर ऐक …बाकी तुला काहीही लागलं तर मला सांग पण बाहेरच्या जगात गेल्यावर घराकडे मात्र दुर्लक्ष नाही झाल पाहिजे. आई बाबा आणि आता आपला मुलगा यांना फक्त तूच सांभाळू शकतेस,दुसर कोणी नाही आणि मला नेहमी याचीच भीती वाटते की तु घरात नसलीस तर कस होणार याची.(थोड काळजी करत)

चला तर मग आज काहीतरी चमचमीत होऊद्या की ,कसंय आता बायकोसुद्धा कामाला लागली की अस चमचमीत जेवण बंद होणार.(थोड रोमँटिक मुडमध्ये)

हे पण वाचा:

मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script

महिलांसाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Female

Marathi Serial Audition Script For Female Free PDF| मराठी सिरियल ऑडिशनस्क्रिप्ट फॉर फिमेल फ्री पीडीएफ

Marathi-Serial-Audition
Marathi-Serial-Audition
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: Marathi Serial Audition Script | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट, Marathi serial audition online, Marathi serial audition for female, Marathi serial Audition 2024, Marathi serial Audition WhatsApp group link, Marathi serial audition for girl, Marathi Audition Script.

Leave a Comment