पूर्वकल्पना:
आजच्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एक आजीबाई भेटणार आहेत हो, आज आपण बघणार आहोत Audition Script For Female. म्हणजेच महिलांसाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट. ही स्क्रिप्ट कोणीही सादर करू शकत, मुळात पात्र जारी ” म्हातारी ” असल तरी तुम्ही तुमच्या सोईनुसार कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सादर करू शकता.
इथे एक आजीबाई आहेत त्या घरात एकट्या राहतात आणि शेजारची एक मुलगी सासरी आलेली असल्यामुळे ती सहज त्या आजीबाईला भेटायला येते. भरपूर दिवसाणी कोणीतरी घरी आलेल बघून आजीबाई सुद्धा आपल मन मोकळ करताहेत. आता पुढे...
पात्र:
आजीबाई ( वय वर्ष ६०-७० )
वेळ:
१ मिनिट ४० सेकंद
Best Script For Audition For Female | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल
कोण मीने तु ! ….ये ग बाई ये …बस बस.. कशी आहेस ?…आणी घरी सगळे बरेत ना ?..हा हा ..बर बर….खूप दिवसानी आलीस नाही, ” लग्न झाल्यावर बाळंतपणाला माहेरी आलेलीस तेवढी ” नंतर भेटच नाही झाली बघ. ” पण बाकी खूप छान झाल हा पोरी तुझ ” माहेर तर चांगला आहेच आणी सासर सुद्धा उत्तम मिळालं . जावईबापूना घेऊन यायचं ना निदान बघता तरी आल असत शेवटचं.
अग आता शेवटचं नाहीतर काय, मी बिचारी एकटी म्हातारी ‘ माझी अर्धी लाकडं गेली म्हसनात ‘ कधी यमराज येऊन खांद्यावर टाकून घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. हा हा ..बर तु काय घेणार चहा बनवू की लिंबाचा सरबत करू. बर बस लिंबाचा सरबतच करते. कालच शेजारच्या बाबीकडून मागच्या परसबागेतील लिंब काढून घेतलीत .पण काहीही म्हण हा या वर्षी लिंब मात्र खूप लागलीत.
(थोड्यावेळाने सरबत घेऊन येते)
घे सरबत घे…साखर थोडी जास्त झाली आहे वाटत, म्हणजे चालेल ना. डायबेटिक वैगेरे नाही ना ? हा हा …गंम्मत केली ग पोरी. आमच्या वेळेस कुठे होत हे सगळं, आता खान ,राहणं बदललं तशी रोगराई सुद्धा आली. कसंय ना आता ह्या वयात एकटेपणा नुसता खायला उठतो ग, घरात आपली काळजी घेणार कोणीतरी आसवं अस खूप वाटत पण काय करणार?.
मूल ही अशी परदेशात जाऊन बसलीत, पाहिलं कधीतरी बाजूच्या बबन्याकडे फोन करून खुशाली तरी कळवायची पण आता मागल्या दोन वर्षापासून ते सुद्धा करायला त्यांना वेळ नाही. म्हातारा गेला त्या वर्षी कसेबसे कार्यासाठी बोलावून घेतलं.
नाही ग कधीकधी वाटत की नको हा पैसा , ही संपत्ती काहीच नको पण हक्काची दोन माणस पाहिजेत ज्यांच्याकडे आपलेपणाने पाण्याचा ग्लास मागू शकेन. बर ते जाऊदे माझं काय म्हातारीच गाऱ्हाणं सुरूच राहणार .आता आलीस आहेस तर जेवल्याशिवाय मी सोडणार नाही बर, मला जे झेपेल ते करिन पण तुला जेवल्याशिवाय आज सोडणार नाही. बर बस तु मी जेवणाची तयारी करते….
हे पण वाचा:
एक्टर कैसे बने,फिल्म इंडस्ट्री मे अपना कैरियर कैसे बनाए?
फ्री मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट(मालवणी ) | Marathi Monologue Script (Marathiauditionscript)
Script For Audition For Female pdf Free | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ फ्री
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Script for audition for female pdf, Short script for audition for female, Scripts to practice acting alone, Script for audition for female in english, Script for audition in Hindi for Female, Best script for audition for female, Scripts to practice acting Girl, Dialogue Script for Audition in Hindi.