पूर्वकल्पना:
नमस्कार मित्रहो आजच्या स्क्रिप्ट मध्ये आपण पाहणार आहोत ” Monologues For Young Men in Marathi| पुरुषांसाठी ऑडिशन स्क्रिप्ट ” , इथे एक व्यक्ति आहे ज्याला थोडासा ,एकूणच सर्व गोष्टींचा अनुभव आणि ज्ञान आहे. आज हा व्यक्ति मंदिराच्या बाहेरच्या बाकावर बसला आहे, तिथे एक अजून व्यक्ति येतो त्याला तिथे बसलेला बघून प्रश्न विचारायला सुरू करतो, पण महत्वाचा त्याचा प्रश्न आहे जो ” देवाच अस्तित्व “. देवाबद्दल त्याला विश्वास नव्हता आणि त्याचमुळे तो त्या मंदिराच्या जवळ बसलेल्या व्यक्तीला अश्या प्रकारचे प्रश्न विचारात आहे. आता पुढे..
पात्र :
एक अनुभवी , जेष्ठ व्यक्ति ,जाणकार व्यक्ति ( ३५-५० वर्ष )
वेळ :
१ मिनिट ३५ मिनिटे
Short Monologues For Young Men | ऑडिशन स्क्रिप्ट मोनोलॉग फॉर मेल
” देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात ” नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे, देव देवाऱ्यात नाही ? तर नक्की देव आहे तरी कुठे ? आजकाल बँकेचा मॅनेजर केबिनमध्ये ५ मिनिट उशिरा आलेला दिसला तरी पब्लिक प्रश्न विचारते. प्रत्येकजण त्याच त्याच काम करतोय आणि मुळात ते करताना लोकांना दिसतोय तर मग देवाच अस काय ? त्याने पण मंदिरात बसायला हव.
याचं उत्तर मी तुम्हाला देईन पण माझ्या काही अटी आहेत, आणि हा त्या जर तुम्हाला मान्य असतील तर आणि तरच. अट क्रमांक एक तुमचा देवावर विश्वास जरी नसला तरी उत्तर मिळेपर्यंत थोड्या वेळासाठी का होईना पण देवाच अस्तित्व आहे हे तुमच्या मनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. हा आता थोड कठीण जाईल तुम्हाला पण काय करणार संगळच आपल्याला आपल्या मनासारख मिळत नाही, थोडीफार तडजोड करावीच लागते.
मी ज्या गोष्टी सांगेन त्या नीट ऐकून घ्याव्यात, सांगताना मध्येच अडवू नये, तुमच्या भाषेत सांगायचं तर Don’t Disturb.. लिंक तुटते. तुमचं शिक्षण,अनुभव ,विचार थोडेसे बाजूला ठेवावेत जेणेकरून मी सांगितलेले दोन शब्द काही काळासाठी का होईना पण पटतील.
बोला आहे का मनाची तयारी ?
कसंय ना जगात देव नाही हे बोलायला जितक सोप्प आहे त्याच्यापेक्षा कित्तेक पटीने कठीण आहे देवाच महत्व पटवून देण. हा आता देव दिसतो ना दिसत हा वेगळा भाग झाला. थोर संतांची इतकी पुण्याई असून देव सर्वांनाच दिसला अस नाही पण हा त्याच अस्तित्व प्रत्येकाने अनुभवलंय. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या का होईना पण देवाच अस्तित्व आहे. तुम्ही आम्ही विज्ञान शिकून देवाला प्रश्न विचारतो पण साक्षात विज्ञानानेच देवाच अस्तित्व मान्य केलय हे आपल्याला कधी कळणार ? नाही का ?
असो मी आता जास्त बोलत नाही कारण तुम्ही ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. जेव्हा तुमचं डोक शांत असेल, समोरच्याच ऐकून घेण्याची आणि मुळात ते पचवण्याची तयारी असेल तेव्हा तुम्ही या . काळजी करू नका देवाच अस्तित्व हे तुम्हाला पटवून देईनच पण हो तेवढ्या सांगितलेल्या अटी लक्षात ठेवा.
हे पण वाचा:
१) पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male
२)(सेक्रेटरी) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Monologue For Male PDF
Monologues For Young Men PDF | मोनोलॉग फॉर मेल पीडीएफ फ्री डाउनलोड
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Monologues For Young Men in Marathi| पुरुषांसाठी ऑडिशन स्क्रिप्ट, 2 minute monologues for young men, 1 minute monologues for young men in marathi, Short monologues for young men, Monologues for young men pdf in marathi, Male monologues from plays, Funny monologues for young men in marathi,