Monologues For Children’s| मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो आजची स्क्रिप्ट खास आपल्या बालमित्रांसाठी घेऊन आलोय, “Monologues For Children’s| मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन “ . या स्क्रिप्टमध्ये एक शाळेत जाणारा मुलगा आहे. शाळेतील श्रीमंत मुलाच्या पालकांनी आपल्या मुलाना सायकल घेऊन दिल्यामुळे याला सुद्धा स्वतःची सायकल असावी असे वाटते; परंतु मनात जरी वाटत असेल तरी त्याला आपली परिस्थिती माहिती आहे . आई आणि मुलामधला हा संवाद आहे तसेच ग्रामीण भाषेचा वापर या स्क्रिप्ट साठी केलेला आहे. Whatspp Channel

पात्र :

मुलगा (वय वर्ष १०-१५ )/ ग्रामीण भाषा

वेळ :

१ मिनिट २० सेकंद

Free 1 Minute Monologues For Children’s 10 Year-Olds| वन मिनिट मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन

न्हाय आय काय बी न्हाय …आता न्हाय म्हणतोय नव ..काय बी न्हाय झालय…. आय ..त्या सावकाराच्या पोरानं नवीन सायकल घेतली त्याची बघून बाकी पोरास्नी बी त्यांच्या आई-बा न सायकल घेऊन दिली. मी माझ्या बा ला इचारू का नग याचाच इचार कराया लागलोय बघ.

इथ एक दिस बा कामाला न्हाय गेला तर आपल्याला दोन येळच जेवया बी मिळायचं न्हाय मंग कुठल्या तोंडान इचारू तेच कळना झालय. आय हे गरीब अन श्रीमंत दोन्ही बी लोकांचा साळा येगळ्या असत्या तर लय बर झाल असत बघ. ज्या गोष्टींचा त्यास्नी कंटाळा येतुया ते समदं आम्हासनी सपनात बी दिसत न्हाय. तुमच्या लग्नाच्या दिसाला बान तुझ्या गळ्यात घातलेल डोरल बी माझ्या शाळसाठी त्या सावकाराकडं गहान ठेवलंय. सणासुदीला तुझ्याकडं बघून लई वाईट वाटतंय बघ.म्या मोठ्ठा झालो ना का आधी तुझ डोरल तुला आणून देईन.

आय.. एक इचारू… शनवारच्याला साळेची सहल जाणार हाय, म्या पयलं तर मस्तरासनी न्हाय म्हटलं पर नंतरच्याला त्यांनीच मला हाफिसमधी बोलावून घेतलं अन म्हणले ” हे बघ नामदेव , सहलीला द्यायला पैस न्हाईत म्हणून जर तु येणार नसशील तर म्या तुझ पैस भरतो ” म्या म्हटलं त्यांना का मला घरी बी इचारावं लागल. हा आता तु अन बा दोघांनी बी परवानगी दिली तरच मास्तरसानी हा म्हणून सांगन.

अन हा ते सायकलच बाला नग सांगू , उगाच पोरानं कायतरी मागितलंय अन त्यो देऊ शकत न्हाय याचं वाईट वाटल त्याला. म्या जाईन चालत. तस बी शेजारच्या गावात तर साळा हाय.

नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel )

हे सुद्धा वाचा :

कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Comedy Audition Script in Marathi

Monologue For Children’s Audition in Marathi | मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन ऑडिशन इन मराठी

Monologues For Childrens Under 15 Years PDF Free| मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन पीडीएफ फ्री

Monologues-For-Childrens
Monologues-For-Childrens
Download Now

Tag: Monologues For Childrens, Monologues for children from movies, Children audition script,Children audition script,Children audition for serial, 10 years children audition script,Audition script, free 1 minute monologues for 10 year-olds,Monologues for Kids | Monologues for Under 15 Years.

Leave a Comment