मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male

पूर्वकल्पना :

आजची स्क्रिप्ट खास आपल्या रोमॅंटिक मित्रांसाठी “मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male “ एक मुलगा आहे जो एक मुलीवर कॉलेजपासून प्रेम करतोय, सध्या तो एक कंपनीत काम करतोय. सुदैवाने त्या मुलीला या मुलाच्या कंपनीत जॉब लागला आहे आणि ही त्याला समजताच तो ती नौकरी सोडतो. आता पुढे...

monologue-script-in-marathi-for-male
मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male

पात्र:

पुरुष /मुलगा २५-३० वर्ष

वेळ :

१ मिनिट

Short Monologue Script in Marathi For Male | शॉर्ट मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी फॉर मेल

रघु तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे. याबद्दल कोणालाच आणि काहीही सांगायचं नाही. तु मला रोज विचारायचास ना की मी एवढा शिकलेला-सवरलेला मुलगा, चांगल्या पगाराचा जॉब सोडून असं हे ड्राइवर ची नौकरी का करतोय ? 

कदाचित आज तुला याच उत्तर मिळालं असेल. हो …मी अंजली मॅडम वर प्रेम करतो आणि खूप मनापासुन प्रेम करतो.

तुला माहिती नसेल म्हणून सांगतो मला त्या कॉलेजपसुनच आवडत होत्या पण कधी हिम्मत नाही झाली रे बिनधास्तपणे विचारायची. पण नंतर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, कुठे आहेत काय करतायत काहीच माहित नव्हतं.

असाच एक महिन्यापूर्वी आमच्याच कंपनीत इंटरव्हूसाठी आल्या होत्या तेव्हाच ठरवलं आता त्यांना नजरेआडं होऊ द्यायच नाही. अरे ऑफिस मध्ये फक्त लंच ब्रेक झाल्यावर त्यांचा चेहरा बघण्यापेक्षा त्यांचा पर्सनल ड्राइवर होऊन तासंतास त्यांच्यासोबत राहायला माला जास्त आवडत.

आणि हो सध्या तरी मी त्यांना ओळखतो पण त्या मला अजून तरी ड्राइवर म्हणूनच समजतात. तुला सांगतो फक्त काही मोजके दिवसच झालेत मला त्यांना भेटून पण असं वाटतंय की लाईफ मध्ये काहीतरी मोठ्ठा बदल झालाय.

खर आहे यार ते म्हणतात ना की प्रेमामध्ये माणूस खूप बदलतो . मी पण बदललोय यार, म्हणजे सतत डोक्यात त्यांचेच विचार , जिकडे तिकडे त्याच दिसतात.

अरे हो रे मला पण कळत की अस फक्त टाईमपास करण योग्य नाही, तरीही एक भीती वाटते रे की काही चुकीचं वागल्यावर त्या कायमच्या माझ्या आयुष्यातून निघून गेल्या तर.

पण आता नाही…. नाहीतरी किती दिवस अस लपून छापून प्रेम करायचं ? एकदा सांगूनच टाकतो मग जे पण होईल ते होईल. हे बघ तु माझ्यासोबत असलास ना की मला हिम्मत येते, फक्त पलटी खाऊ नको हा. ठरलं तर मग आज हिम्मत करून सांगूनच टाकतो “मॅडम आय लव्ह यु ” .

अरे मॅडम आल्या तु जा इथून, नंतर भेटू.

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा :

2023 What is Cinematography in Hindi – जानिए छायांकन क्या है ?

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Serial Audition For Male And Female

Monologue Script in Marathi For Male PDF Free | मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी फॉर मेल पीडीएफ फ्री

monologue-script-in-marathi-for-male
monologue-script-in-marathi-for-male
Download Now

Tag: Short monologue script in marathi for male,Monologue script in marathi for male female,Monologue script in marathi for male pdf,Monologue script in marathi for male for girl,marathi audition script.

Leave a Comment