पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो आजची नवीन स्क्रिप्ट खास तुमच्यासाठी “बेस्ट ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल |Monologue Script in Marathi “ .
एका फॅमिली मध्ये फंक्शन असल्यामुळे त्या फॅमिलीने ऑनलाईन केक ऑर्डर केला आहे . परंतु फंक्शन सुरू होण्याची वेळ झाली तरी सुद्धा केक आला नाही. काही क्षणात दरवाज्यावरची बेल वाजते , फॅमिली मधील एक व्यक्ती दरवाजा उघडून बघते तर डिलिव्हरी बॉय समोर उभा असतो. केकची डिलिव्हरी वेळेवर न आल्यामुळे ती व्यक्ती आणि समोरील डिलिव्हरी बॉय यांच्यामध्ये होणारा संवाद…. या ठिकाणी डिलिव्हरी बॉय समोरील व्यक्तीला विनंती करतोय आणि स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न करतोय.
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
पात्र:
डिलीवरी बॉय ( वय वर्ष २७ )
वेळ :
१ मिनिट ४० सेकंद

1 Minute Monologue Script in Marathi | शॉर्ट मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी
” हे घ्या तुमच पार्सल…”
” अहो ताई मि वेळेवरच आलो होतो. पण रस्त्यात मोठा अपघात झालात , आणि एवढा भयंकर होता ना कि अजून माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य फिरतय.”
तुम्हाला खोटं वाटतं का ? एक मिनिट हा …
हे बघा या रोड ला किती ट्रॅफिक आहे बघा ? आता मला सांगा या सगळ्यातून मि कसं येणार वेळेवर.
पण नाही हा असं नाही कि मि प्रयत्न नाही केले,मला शक्य होईल तेवढं सगळं करून बघितलं पण शेवटी नाही जमलं यायला.
हे बघा मला कळतंय आणि मि मान्य हि करतोय कि केक डिलिव्हरी वेळेत व्हायला हवी होती, तुमच function असेल, नातेवाईक आले असतील आणि बरच .पण मला पण समजून घ्या ना थोडासा.
नको ताई प्लीज विनंती करतो माझी कम्प्लेंट नका करू , एकतर हल्ली मागच्या आठवड्यात ४ दिवस सलग पाऊस पडल्यामुळे कामं बंद होत त्यामुळे तसाही चार दिवसांचा पगार कापून येईल, आणि जर का तुम्ही आता कम्प्लेंट केली आणि वाईट फीडबॅक गेला तर माझी नोकरी जाईल हो.
हे बघा यात माझी चूक असली तर हमखास माझी कम्प्लेंट करा पण इथे माझा नवीलाज आहे हो.
*****अॅक्टिंग सुधारण्यासाठी पुस्तक : ” मराठी नाटक आणि रंगभूमि “*****
हवं तर मि माफी मागतो मला माफ करा परत असं नाही होणार , ताई आज माझ्याही मुलीचा वाढदिवस आहे आणि सकाळीच माझ्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलय.
इथे बाप म्हणून मुलीचा वाढदिवस करू , एक मुलगा म्हणून वाडीलांची जबाबदारी घेऊ कि कर्तव्य म्हणून जॉब करू, काहीच कळत नाही आहे.
पण आहे कि या सगळ्याचा मि माझ्या कामावर परिणाम नाही होऊ दिलाय.
मि एवढच सांगू शकतो यापुढे निर्णय तुमचा आहे, चला येतो आणि सॉरी माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला उशीर झालाय. आणि हो माझ्याकडून हॅप्पी बर्थडे बर का !!
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
हे सुद्धा वाचा:
Ekankika Script in Marathi(Audition )| मराठी एकांकिका स्क्रिप्ट
Audition Script in Marathi| मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
Monologue Script in Marathi PDF | मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी फ्री पीडीएफ

मित्रहो इथे दिलेले स्क्रिप्ट तुम्हाला आवडतात किंवा नाही, वाचायला मजा येते, त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही चुका आहेत , सुधारणा करायला हवी, कुठल्याही विषयावरती स्क्रिप्ट पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण कमेंट हे असं माध्यम आहे जे तुम्हा-आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवते.
Tag : 1 minute monologue script in marathi, Monologue script in marathi for male,marathi audition script,Monologue script in marathi for male,marathi audition script, Monologue script in marathi pdf ,Monologue script in marathi for girl,Monologue script in marathi for boy,audition,audition script,male audition,female audition.