पूर्वकल्पना:
मित्रहो आजची स्क्रिप्ट खास आपल्या छोट्या कलाकारांसाठी ” Monologue For Children’s Audition in Marathi | मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन ऑडिशन इन मराठी ” ; या स्क्रिप्ट मध्ये एक छोटा मुलगा आहे, त्याला वडील नाहीत. त्याच्या घरामध्ये त्याची आई आणि तो असे दोघेच राहत आहेत. आई लोकांच्या घरी धुनी भांडी करते आणि या मुलांच संगोपन करत आहे. आज हा मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल शेजारी बसलेला आहे, तिथून येणाऱ्या एक व्यक्तीला त्याने थांबवल ; स्वताला भूक लागल्याची तो त्या व्यक्तीला सांगतो. आता पुढे..
पात्र:
छोटा मुलगा / ग्रामीण मुलगा ( वय वर्ष १० -१५ )
वेळ:
१ मिनिट ३० सेकंद
2 Minute Monologue For Children’s Audition | 2 मिनिट मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन ऑडिशन
दादा …ओ दादा …(भूक लागली आहे ..काहीतरी खायला मागण्याची ऍक्टिंग करतो). लय भूक लागली हाय कायतरी खायला द्या ना. न्हाय नग….न्हाय नग नग…..पैक नग (पैसे नको) मला ..जेवाया दिल तर लई उपकार व्हतील. अन तसबी म्या काय फुकट न्हाय घायचो तुमच्याकडन, कायतरी काम करिन की तुमचं. माय म्हणती कुणाकडन तरी उसन घ्यावं पण फुकट न्हाय.
तुमचं बुट साफ करू काय, आता करतो बघा अन एकदम चकाचक करून देतो. तुम्हास्नी कळणार बी न्हाय जुन हाय का नव ते…
आव दादा आता भाकर खायाची असल तर गरम चटके बी सोसाया लागतील ना, उग मिळतीया व्हय? . हे बी माझी माय च म्हणती. अन तसबी इथ एक येळच्या जेवणाचा ठाव न्हाय मंग जे बी हाताला काम मिळल ते करायचं अन पोट भरायचं. बघाया गेल तर वयान अन अनुभवान दोघांनी बी म्या तुमच्यापेक्षा लहान हाय, मंग तुमचे बुट साफ केल तर काय बी वंगाळ(वाईट) न्हाय. आणा इकड .. आव द्या .. कष्ट कराया भ्या कुणाच. चोरी लबाडी तर न्हाय करत हाय.
माझी माय लोकांची धुनी-भांडी करती, घर चालवती, मला बी सांभाळती. घर कसलं ,खोपट हाय पण मायेची उब हाय त्यात.बा लवकर गेला माझा पण जाताना जगण्याचा अर्थ शिकवून गेला. मिठ भाकर खायाची पण इमानदारीत जगायचं.
मागच्याला माझ्या मायला लोकांनी हाकलून देताना म्या माझ्या डोळ्यांनी पायलंय पर कधी तिन ते माझ्या कानाव न्हाय पडू दिल.
आता तुम्हास्नी वाटलं ह्यो इतक सांगतोय तर पैक कश्यपायी न्हाय घेत ? दोन चार कमी का व्हतील पण माय कष्टाने पैक हानती. पण सांच्याला (संध्याकाळी) तिला तरास नग (नको) म्हणून म्या जेवण मागतूया. दादा म्या चुकलो असन तर माफी द्या, माय वाट बघत असलं मला घरला जयाला लागल.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
Drama Script in Marathi | ड्रामा स्क्रिप्ट ऑडिशन इन मराठी
Marathi Monologue Script | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट फ्री
Children’s Audition Script Free PDF | चिल्ड्रेन ऑडिशन स्क्रिप्ट फ्री पीडीएफ
Tag: Monologues for auditions, Childrens audition, Monologue For Children’s Audition in Marathi | मोनोलॉग फॉर चिल्ड्रेन ऑडिशन इन मराठी, Marathiauditionscript, Children’s theatre monologues for adults,Kid monologues from movies, Students audition script.