Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो तुमच्यासाठी ची पुढील खास ऑडिशन स्क्रिप्ट“Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी”; आजच्या आपल्या या गोष्टीमध्ये एक दाम्पत्य आहे ज्यांचा एकमेकांवर खूप जीव आहे, एकमेकाना समजून घेतात, संकटात एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात असा खूप छान संसार चालला आहे. आज दरवाज्याची बेल वाजल्यानंतर काहीस विचित्र दिसल, बायकोने नवऱ्याच्या डोळ्यांत पहिल तर तिथे थोडीशी भीती, थोडा बावरलेपणा जाणवला पण नवरा मात्र काही घडल्याच कबूल करत नाही आहे. आता पुढे……..[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

पात्र :

लग्न झालेला माणूस ( नाव तुमच्या आवडीनुसार ), वय वर्ष २५-३५

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

Monoact-Script-in-Marathi
Monoact-Script-in-Marathi

Monoact Script in Marathi For Male | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी फॉर मेल

(दरवाजाची बेल वाजते… बायको दरवाजा उघडते आणि आलात का अस विचारल्यासारख )
हों आलो…. हे घे…(थोडा काहीतरी बिनसल्याचा चेहरा पण चांगल असण्याचा दिखावा..)
आलोच फ्रेश होऊन येतो…
नाही ग कुठे काय..काहीच नाही..(काय झाल म्हणून विचारते)
अग खरच काही नाही…ते थोडंसं ट्राफिक मुळे दमछाक झाली आहे… तुला तर माहित आहे ना हे मुंबईच ट्रॅफिक म्हणजे बापरे बाप…
(बायकोला अजून शंखा आल्याच चेहऱ्यावर दिसत आहे…घाबरत भाव..आणि ती आता खोदून खोदून विचारते आहे…)
आलोच…..
(परत थांबवते)
हे बघ अक्षता काहीच झालेलं नाही आहे ..तु उगाच ” पराचा कावळा ” करतेस, आणि तसही काही झालं असत तर तुला मी सांगितलं नसत का ?..माझी ती लाडाची बायको…उगाच काळजी करत बसते…चल मी येतो जरा फ्रेश होऊन.
(परत परत करण विचारते…एखाद्याला टॉर्चर कराव तस)
तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का ..काहीच नाही झालय म्हणून..इथ नोकरी गेली आहे माझी आणि तु…
(पच्छाताप झाल्यासारखं…चलविचल अवस्था)
I am सॉरी…I am सॉरी अक्षता….मला तुझ्यावर रागवायच नव्हतं, खरच सॉरी. काहीच कारण नाही आणि असताना आम्हाला कामावरून काढून टाकलं.काय करू ? गेले साडे पाच तास वेड्यासारखं फिरतोय ग, तुझ्यासमोर यायची हिम्मतच होत नव्हती.
पण हे बघ तु घाबरू नकोस हा मी काहीतरी करेन, नौकरी मिळवेन . उद्या सकाळीच शोधायला सुरु करतो. तुझ्या पोटात आपलं .बाळ आहे ना त्याला खूप मोठ करायचं मला, माझ्यापेक्षा मोठा झालेलं बघायचंय. तुझ्या बाबांना मी वचन दिलंय की तुला सुखी ठेवीन म्हणून, तु काळजी करू नकोस हा मी करेन काहीतरी. भेटेल काहीतरी नौकरी, नाहीतर ! नाहीतर मी काहीही करेन . मी चहा विकेन, मी पेन, भाजीपाला विकेन काहीही करेन पण तुला त्रास होऊ देणार नाही.
ए अक्षता ..ए ..तु मला सोडून तर नाही जाणार ना. मला थोडा वेळ हवाय ,मी सर्व ठीक करेन आणि शक्य असेल तर मोठ्या मनाने माफ कर.(रडत)……end.

नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) आणि खाली कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून अभिप्राय नक्की कळवा.

हे सुद्धा वाचा:

Drama Script in Marathi | ड्रामा स्क्रिप्ट ऑडिशन इन मराठी

Marathi Monologue Script For Audition| मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट

Monoact Script in Marathi PDF Download Free | मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ डाउनलोड फ्री

Monoact-Script-in-Marathi
Monoact Script in Marathi
Download Now

Tag: Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी,Monoact script in marathi pdf download,Monoact script in marathi pdf,Monoact script in marathi for students,Monoact script in marathi for girl,Monoact script in marathi for male,Monoact script in marathi for female,marathiauditionscript.

Leave a Comment