पूर्वकल्पना:
एक कॉलेजवयीन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत दोघेही एक दिवशी पिच्छर ला जायचं प्लान बनवतात. ठरल्याप्रमाणे दोघेही एक जागेवर भेटायच ठरवतात. स्नेहा ही ठरलेल्या वेळेच्या आधीच पोहोचते पण सूरज नेहमीप्रमाणे खूप उशिरा येतो व त्यानंतर त्यांच्यात होणारे रूसवे फुगवे ही सांगणारी ही छोटीशी स्क्रिप्ट आहे.
पात्र :
स्नेहा आणि सूरज कॉलेज मधील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड
वेळ:
१ मिनिट २० सेकंद
Marathi Serial Auditions Script | दोन पात्रांसाठी मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
स्नेहा : अरे यार हा काय मुलगा आहे ? स्वतःच्या गर्लफ्रेंड ला भेटायला एवढा उशीर, माझ्याकडे स्वतःची गाडी नसून मी वेळेवर आले, बर आणखी त्यात करणं किती ? बाबा घरी आहेत, आई घरात आहे. मला ना कंटाळा आलाय. एखाद्याने समजून घ्यावं …पण किती ? याला काही लिमिट आहे की नाही. खड्ड्यात गेला तो पिच्चर.निघूनच जाते म्हणजे याला कळेल वेळेवर न आल्यावर काय होत ते.
सुरज : Surprice Surprice… .(२वेळा लयीमध्ये) (एक कानाखाली ठेऊन देते)
स्नेहा : Surprice Surprice..
सूरज : ह…ह..(लाज नसल्यासारखा स्मित हास्य) ऐक ना म्हणजे कसंय..की …मी वेळेवरच आलो होतो पण ..
स्नेहा : पण काय ? आ ?..पण काय? हे बघ तुझी कारण टाक पिशवीत ..मला काही घेणं देण नाही .
(सूरज बॅगमधुन पिशवी काढतो )
स्नेहा : हे काय ? तु खरच पिशवी काढलीस ! हे बघ ए मला वाटलं नव्हतं की तु एवढा बावळट असशील.
सूरज : अग सोड ना ..एवढं काय त्यात ..थोडासा उशीर झाला ..बस्स..!! जस्ट चिल बाबू …
स्नेहा: थोडासा ! अरे बापरे …मी इथे सकाळी 11 ची गाडी पकडून आले आहे आणी तू संध्याकाळचे साडे ३ वाजता उगवतोयस .
एवढ्या वेळात तर आम्ही कार्यक्रम आवरून घेतो.
सूरज: काय …कसला कार्यक्रम ..? (चकित होऊन…थोडीशी शंखा आल्यासारखा चेहरा)
स्नेहा: अरे …म्हणजे आमचा इव्हेंट मॅनेजमेन्ट चा बिसनेस आहे ना .. तर मी असं म्हटलं की एवढ्या वेळात आमचा एक कार्यक्रम
झाला असता.तुला काय वाटलं?
सूरज: काहीच नाही..(खुश होऊन)
स्नेहा: तु पण ना यार …आपल ठरलं होत ना की आपण थोड फिरायच आणी मग संध्याकाळी पिच्चर ला जायच म्हणून..तुला वेळेची
कदर च नाही आहे.(थोडी रडव्या आवाजात)
सूरज: अग माझ्या सोन्या आता ते सोड ना (थोड प्रेमाने) आता मी आलोय ना …चल चल…एखाद्या पाणीपुरीवाल्याला श्रीमंत करूया.
स्नेहा : अरे पण आपण तर तिथे पाणीपुरी खायला जातोय ना ..
सूरज : हो हो…पण खाणार तर तु आहेस ना …
स्नेहा : म्हणजे…?
सूरज: काही नाही …तु चल…तुला एक्सप्लेन करायच्या नादात माझा रगडा व्हायचा….चल आपण जाऊ हा ..
Male and Female Marathi Serial Comedy Script PDF Free | मराठी सिरियल कॉमेडी स्क्रिप्ट पीडीएफ
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: marathi comedy script,marathi audition script, girls audition, female audition script, natak script for male and female,best marathi comedy audition script, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड audition स्क्रिप्ट, Marathi Serial Audition For Male And Female.