पूर्वकल्पना:
मित्रहो आज खास तुमच्यासाठी एक स्पेशल स्क्रिप्ट घेऊन आलो आहोत Marathi Natak Script PDF Free Download अर्थात दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट. इथे एक मुलगा आहे ज्याला अॅक्टिंग शिकायची आहे आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये करियर करायचे आहे. तो दररोज भरपूर ऑडिशन देतोय पण कुठेही त्याच सिलेक्शन झालेल नाही. आज तो एका स्टुडिओमध्ये ऑडिशन द्यायला गेला व तिथेही रीजेक्ट झाला आता, वैतागून तो बाहेर आलाय आणि त्याला एक खास व्यक्तीची ओळख होते .
पात्र:
पात्र : एक मुलगा (वय २०-२५ वर्ष ), अनोळखी माणूस(३०-५० वर्ष )
वेळ:
४ मिनिट ३० सेकंद
Best Marathi Natak Script PDF Free Download | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल
मुलगा:
शीट काय दळभद्री नशीब आहे माझं, आज परत रिजेक्ट झालो. काय कराव काहीच कळत नाही, खिशातले पैसे आणी वेळ दोन्हीही वाया चाललेत. म्हटलं निदान आज तरी सिलेक्शन होईल कुठलं काय बाकी वेळी तरी निदान कॅमेऱ्यासमोर उभ राहून दोन शब्द बोलायला द्यायचे पण यावेळी मात्र नाव विचारायच्या आधीच रिजेक्ट केल. कंटाळा आलाय या सगळ्याचा, दिवस नाही रात्र नाही कुठे ऑडिशन आहे समजल्यावर पुढचा मागचा विचार न करता चालले हिरो बनायला. कोण विचारतय आम्हाला ?
ऑडिशन आहे म्हणे आणी काय तर ” आमच्याकडे नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी ” अरे हट. …कोण कुत्र नाही विचारत नवोदित कलाकारांना. कधी मी successful ऑडिशन देणार आणी कधी मी स्टार होणार… अस वाटत की कुठेतरी जाऊन जीव द्यावा आणी संपवून टाकावं सगळं…….
(“ बाजूला दरवाज्याच्या बाहेर एक माणूस पेपर वाचत बसलेला असतो..तो मोठमोठ्याने वाचू लागतो “) गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ” , अरे वा छान आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, हा हा हा . प्रयत्नार्थी परमेश्वर अरे वा हे सुद्धा छान आहे.
मुलगा: ओ हॅलो…काय …काय चाललंय काय तुम्ही
माझ्याविषयी बोलता आहात का ?
माणूस : नाही तर ! …मी तर पेपर वाचतोय.
मुलगा: हा हा ठीक आहे, वाचा वाचा तुम्ही पेपर वाचा. नाहीतरी
सध्या माझी कंडिशन बघता कोणीही माझी टिंगल करू
शकेल.
माणूस: काय मग रिजेक्शन चा आनंद चेर्यावर ओघळतोय
वाटतं ? ( त्याच्याकडे बघत …थोड थट्टा करत)
मुलगा : एक मिनिट …काय म्हणालात ..रिजेक्शन ? तुम्हाला
कस कळलं की रिजेक्शन मुळे अस वागतोय ?
माणूस: ह् …(स्मित हास्य) फक्त आजचच नाही तर मागची १३
ऑडिशन्स तु कशी रिजेक्ट झालयस ते सुद्धा मी सांगू
शकतो.
मुलगा : हे बघा आता तर माझी उत्सुकता शिगेला पोहोचली
आहे . तुम्हाला माझ्याबद्द्ल एवढं कस माहिती ?
माणूस: हे बघ तुझ डोक शांत झालं असेल तर तुला सांगतो.
मुलगा: हो हो प्लीज सांगा.
माणूस: ये बस इथे …. 2003 स्वतःची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलायचा
खूप मोठा घेतलेला तो निर्णय आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने केलेला तो पहिला प्रवास. “ खिशात दमडी ही नव्हती पण आदल्या दिवशी वडिलांना दुसऱ्याच्या शेतात काम करायचे मजुरीचे 40 रुपये मिळाले होते त्यावर माझ्या डोळा होता अर्थात माझ्याकडे काही पर्याय सुद्धा नव्हता.” वडिलांना न सांगता त्यांच्या घामाने डबडबलेल्या आणि धुळीने माखलेल्या त्या पॅन्ट मधून ते 40 रुपये अलगद काढून माझ्या शर्टच्या वरच्या खिशात मी ठेवले होते. घरी कामासाठी जातो एवढे बोलून निघालो आणि थेट निघालो तो मुंबईच्या दिशेने “ खिसा पैशांनी भरलेला नव्हता पण मन मात्र मोठ्या मोठ्या स्वप्नांनी भरलेला होत.”
मुळातच कलेची आवड असल्यामुळे मला कोणीतरी मोठा कलाकार व्हायचं होतं नाव कमवायचं होतं पण प्लॅटफॉर्मवर उतरलो आणि मुंबईची गर्दी बघून अवाक झालो.
एक मन म्हणालं ‘ लागलीच दुसरी गाडी पकडून परत गावाकडे निघून जाऊ, पण तेच दुसरं मन म्हणालं आलाच आहेस तर जाताना बापाच्या खिशातले पैसे निदान दुप्पट तरी करून घेऊन जा. ‘
मग झाली माझ्या संघर्षाला सुरुवात आणि बरं का आमचा त्याकाळचा तो संघर्ष आणि आता तुमच्या या काळातला स्ट्रगल. हाताला जे मिळेल ते काम केलं आणि हळूहळू या क्षेत्रातील माणसं भेटत गेली कदाचित देवाला माझा संघर्ष पहावला नाही. काही काळानंतर माझ्या आयुष्यात एक गृहस्थ झाले त्यांनी कुठेतरी माझ्यात टॅलेंट बघितला आणि एवढेच नाही त्याचा वापरही चांगलं करून घेतला. आज सिने नाट्यसृष्टी मध्ये खूप आदराने माझं नाव घेतलं जाते याचं सगळं श्रेय्य मी माझ्या आई-वडिलांना देतो कारण ते माझे आयुष्यातले पहिली गुरु आणि माझ्यासाठी दुसरे गुरु म्हणजे ते गृहस्थ. आज खूप नाव आहे पैसा आहे संपत्ती आहे ते फक्त मला योग्य वेळी मिळालेल्या गुरूंमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे.
तुझ्यासारखी आज किती मुलं दररोज या मायाजालात फसलेली मी पाहिली आहेत ही सिने सृष्टी बाहेरून जरी लखलखित दिसत असली तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुझ्यासारखी अनेक मुलं फक्त पैसा संपत्ती फेम यामध्ये अडकून स्वतःचं किंबहुना घरच्यांचं आयुष्य हे बरबाद करतात. “ जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही ” ‘अखंड मेहनत आणि लागेल तितका वेळ ’ जर देता येत असेल तरच तुमचा पाय कुठेतरी टिकू शकतो अन्यथा तुमचा पैसा आणि वेळ व्यर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.
कुठलेही कर्म असो त्यामध्ये गुरूचा सल्ला खूप मोलाचा असतो ‘ गुरुने फक्त हाताच्या बोटाने दाखवलेल्या दिशेने जरी वाटचाल केली तरी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता ’ या सगळ्याचा अर्थ ऑडिशन देऊ नकोस असं नाही प्रयत्न करावे नक्की करा पण ते पूर्णतः अभ्यास करूनच कुठल्याही गोष्टीसाठी एकदा उतरलं की परत माघार नाही आणि आम्ही सांगितलेल्या दोन गोष्टी जरी तू स्वतःच्या आचरणात आणल्यास तर उद्याचा स्टार अभिनेता होण्यापासून तुझा हात कोणीही धरू शकत नाही.
मघाशी म्हणालो होतो की वडिलांचे खिशातून चाळीस रुपये चोरून आणले होते परंतु ज्या वेळेस मी परत गेलो त्यावेळी चाळीस हजार रुपये मी आई-वडिलांचे चरणापाशी ठेवले अर्थात मोठे पण नाही परंतु ते हक्काचे मानकरी आहेत माझ्या आयुष्यातले पहिले गुरू आहेत.
आणि हो एक गोष्ट विसरलोच गेले दोन महिने तु झ्या स्टुडिओमध्ये ऑडिशन्स देतोयस, या एवढ्या मोठ्या स्टुडिओचा मालक आणि येथे होत असलेली प्रत्येक गोष्ट ज्या व्यक्तीच्या इशाऱ्याशिवाय पूर्ण होत नाही ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझ्यासमोर उभी आहे.
हे स्क्रिप्ट घे याचा नीट अभ्यास कर आणि एका आठवड्याने मला भेट, मला जमेल तेवढं नक्कीच प्रयत्न करेन खूप खूप शुभेच्छा.
मुलगा: सर एक मिनिट मला माफ करा मी आजपर्यंत खूप चुकीचं वागलोय मला आज पर्यंत फक्त पैसा प्रसिद्धी या गोष्टी दिसत होत्या पण या मागची मेहनत मला आज तुमच्यामुळे कळली थँक्यू सर मी आजपासून नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि माझ्या आई-वडिलांचं माझ्या गुरूंचे नाव उज्वल करेन.
हे पण वाचा :
Audition Script in Marathi| मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
महाराष्ट्राची हास्य जत्रा कास्ट नेम विथ फोटो| Maharashtrachi Hasya Jatra Cast Name With Photo
Marathi Natak Script PDF Free For Students | मराठी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ फ्री फॉर स्टूडेंट्स
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Best marathi natak script pdf free download, Marathi natak script for students, Marathi Natak Script PDF Free Download | दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट, Short comedy Marathi natak script pdf, Marathi one act play script PDF, Marathi drama script on social issues, Marathi ekankika script PDF free download.