मराठी नाटक स्क्रिप्ट PDF | मालवणी/Marathi Natak Script PDF

पूर्वकल्पना:

आज खास सर्वांसाठी बोलोभाषेतील एक स्क्रिप्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत मराठी नाटक स्क्रिप्ट PDF . एक कोकणातली फॅमिली आहे जे शहरात राहतात. गणेश चतुर्थी जवळ येत असल्या कारणाने त्या फॅमिलीचे सर्व मेंबर्स नि मीटिंग घ्यायचे ठरवले आहे . ही मीटिंग फॅमिली पैकी एका सदस्याच्या घरात आहे. आता सर्वजण एकत्र बसलेले आहेत आणि मीटिंग सुरू आहे . पुढे ..

पात्र :`

पुरुष (वय २५-४० वर्ष )

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

मराठी-नाटक-स्क्रिप्ट-pdf
मराठी नाटक स्क्रिप्ट PDF | Marathi Natak Script PDF

Ekpatri Malvani Natak Script | एकपात्री मालवणी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ

घेवा घेवा चाय घेवा आधी, बाकीचा मरांदे लय लांबसून इलास. बाकी ट्रेन ला आज गर्दी गावली असतली. आज रविवार म्हटल्या गर्दी नी काय ता बोलाक नुको. तरी मी थोरल्यांका म्हणा हुतंय आज नाय जमणा सगळ्यांका तर फुडल्या रविवारा बघूया तर म्हणाक लागले नाय, लांबला काय लांबत रावतला ता, हाताबरोबर झालेला काम मगे होयत नाय.

काय म्हणतास चाय भारी लागली ? होय तर मियाच केलय ती,   वहिनिक् ? वाहिनीक खयसून चाय जमता, मी केलल्या चाय ची चव तुमका दुसरेकडे खय गावाची नाय. उगाच नाय खालच्या आवटातले ताते रोज चाय पिऊक आमच्याकडे यायचे. हा हा हा ..बारा ता सगळा होईतच रावतला पण यंदा गणपतीचा कसा करूया ? थोरले यंदा वायच कुरकुर करतत, बारक्याची परीक्षा हा नाय?  तसो मी पापल्याक पाट देवक आठवण केलय, पण बाकी तयारी एकट्याक नाय जमाची घर झाडूक होया,रंगकाम,डेकोरेशन सगळा एकट्याक महागायत पाडात.

नायतर असा करूया पामो आणी मी फुडें जतव, निदान बाकी तयारी करूंक गावात. तु, वाहिनी, अण्णां आणी बारक्यांका घेवंन पाटसून येवा. कसा ?

पण कायव म्हण हा जसो जसो चतुर्थी चो दिवस जवळ येता ना वातावरण बघा कसा आनंदित होता. म्हणजे बँकेचे हाप्ते, घराचा भाडा, जमिनीचा टेंशन सगळा बाजूक रवता आणी डोळ्यांवर दिसता फक्त मकरात बसलेलो आमचो विघ्नहर्ता. देणारो पण तोच आणी घेणारो पण तोच. बरा वर्गणेचा कसा करूया ? गेल्यावर्षाचे थोडे पैसे अकाऊंट वर आसत. वर्गणी काय ती आताच ठरवा आणि चार दिवसात जमा करा नाय तर काय काय जणांची वर्गणी येयपर्यंत गणपतीचा विसर्जन करुक येता.

बरा तुम्ही मीटिंग चालू ठेवा, तवसर मी मस्तपैकी शिरो करतय सगळ्यांसाठी, तेचा काय हा ना तुमच्या वहिनीचा जेवाण होऊक वेळ हा आजून . तेवढो वायच माझो timepass.

हे सुद्धा वाचा:

Audition Script in Marathi| मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

[Full Guide]Dubbing Se Paise Kaise Kamaye|डबिंग से पैसे कैसे कमाए?

Marathi Natak Script PDF Free Download | मराठी नाटक स्क्रिप्ट PDF

मराठी-नाटक-स्क्रिप्ट-pdf
मराठी-नाटक-स्क्रिप्ट-pdf
Download Now

आम्हाला फॉलो आणि Subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: marathi natak script pdf free download,natak script in marathi, marathi drama script, marathi natak script for students, ekpatri natak script in marathi, short marathi drama script pdf, marathi natak script,मराठी विनोदी नाटक स्क्रिप्ट pdf, मराठी नाटक स्क्रिप्ट PDF | Marathi Natak Script PDF.

Leave a Comment