पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो आज मी तुमच्यासोबत अनोखी स्क्रिप्ट शेयर करतोय ” Marathi Natak Script PDF “ , या स्क्रिप्टमध्ये एक नाटक मंडळ आहे आणि ते एक नाटक बसवत आहेत. नाटकमध्ये राजदरबार भरलेला आहे सर्वजण आपापल्या जागेवर बसून राज्याच म्हणण ऐकत आहेत. राजा सर्वाना उपदेश करताना दिसत आहे, तसेच प्रजेला आपण कशाप्रकारे मदत करू शकतो याबद्दल योजना करत आहे.
पात्र :
पुरुष ( वय वर्ष ३०-४० ) (शाळा कॉलेज साठी पण तुम्ही याचा वापर करू शकता.)
वेळ:
१ मिनिट ३५ सेकंद
Marathi Natak Script PDF For Male | मराठी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ फॉर मेल
” थोरल्या राज्यांच्या पश्चात कमरेच्या समशेरीने राज्याच्या चहू बाजूला रक्तरंजित इतिहास कोरून विजयाच्या पताकेचा खांब राज्याच्या वेशीवर रोवून उज्जैनी नगरीच्या राजगादिवर विराजमान झाल्यानंतर भावनांच्या युध्दामध्ये अडकलेल्या माझ्या तमाम प्रजाजनांच्या नयनातील प्रेमळ आणि निर्मळ अश्रू आमच्या कोमल हातानी पुसण्याची अकाली संधी जर का आम्हाला मिळत असेल तर अश्या सुसंधीचा लाभ आम्ही समोरून लाथावणं यासारखं घोर पाप अन्य दुसर नसाव. “
प्रधानजी राज्याच्या चहू बाजूला दवंडी फिरू द्या, सध्याच्या आपत्तीने त्रस्थ झालेल्या लोकांना दररोज च्या जीवनात लागणारी सर्वतोपरी मदत ही आपल्याकडून पोहोचली जावी याची दक्षता घ्या; आणि हो ही मदत राज्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण तितकंच महत्वाच आहे जितकं वेळा तुम्ही कर आकारणीसाठी त्यांच्या दारी जाता.
प्रत्येकाने स्वतःच्या वाट्याला आलेली कामगिरी फत्ते करावी, आणि जर तस नाही झाल तर आम्हाला स्वतःहून या गोष्टीमध्ये लक्ष घालाव लागेल. आपल्या राज्यावर खूप मोठ संकट आल आहे, आपली अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे याबद्दल शत्रूला कल्पना असेलच यात किंचितही शंखा नाही कारण आपलीच जिवाभावाची माणस कुणाच्यातरी मेवामिठाईसाठी स्वतःची कर्तव्य विसरतायत.
आम्हाला राजगादिचा फारसा अनुभव नाही परंतु बेईमानी आणि लाचारीपणाच राजकारण आम्हाला चांगलंच कळत. थोरल्या राज्यांनी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत राजगादी सांभाळली कारण त्यांच्या जिवाभावाची माणस त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत होती. एखाद युद्ध जिंकायला काय लागत ? लाखोंच सैन्य, दारूगोळा, अवजड शस्त्र की अन्य काही….?….नाही ….तर यापेक्षा आपल्या माणसांचा आपल्यावर असलेला विश्वास हे एक शत्र जर का आपल्याबरोबर असेल तर अशी अनेक युद्ध आपण जिंकू शकतो. [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
Script For Audition For Female | फिमेल मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी
1 Minute Monologues For Females| फक्त एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट
Marathi Natak Script PDF Free Download | मराठी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ फ्री डाउनलोड
Tag: Marathi Natak Script PDF Audition | मराठी नाटक ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ ऑडिशन, Marathiauditionscript,Marathi natak script pdf free download,Marathi natak script pdf in english,Marathi natak script pdf in marathi, Marathi audition.