मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन स्क्रिप्ट ” मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female “, एक कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे, स्वभाव थोडासा खडूस, थोडा attitude सुद्धा आहे. एक दिवस तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा सहज तिच्याकडे बघतो त्यावर ती त्या मुलाला खूप सुनावते.

इथे ही पात्र थोड oversmart, attitude असलेल, मोठ्या घरात जन्माला आलेल जिला आपल्या श्रीमंत असल्याचा खूप गर्व आहे. सदरीकरना दरम्यान या गोष्टीं लक्षात ठेवण गरजेच आहे.

Marathi-Monologue-Script-For-Female
मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female

पात्र:

कॉलेजमधील मुलगी ( वय वर्ष २३ -२५ )

वेळ :

१ मिनिट ३० सेकंद

Marathi Monologue Female | मुलींसाठी सिम्पल ऑडिशन स्क्रिप्ट

लायकी शब्द ऐकलास कधी ?

माहिती तरी आहे का ?

मग त्या शब्दाला जरा सुद्धा विसरू नकोस. कळतंय का ?

सरळ शब्दात सांगायच तर लायकीत राहायच, कळलं? जास्त जवळ यायचा प्रयत्न करू नकोस , नाहीतर अख्या कॉलेजमध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहणार.

अरे तुझे कपडे बघ, ना धड चेहरा, पैसा तर खूप दूरची गोष्ट असेल तुझ्यासाठी . प्रपोज करायचं सोड, तुम्हालोकांची हिम्मत तरी कशी होते काय माहीत या कॉलेजमध्ये यायची.

कसंय ना आपला बाप बिसनेसमन आहे त्यामुळे लहानपणापासून आपण अशीच आहे. खाओ पिओ ऐश करो .१०-२० हजार तर नुसता पॉकेटमनी आहे आपला. तुझ्या घरात जेवढं वर्षाला कमवत नसाल ना तेवढा महिन्याला मी उडवते.

आता बोल एवढं सगळं जमणार आहे का तुला ? कॉलेज ची फी  लेट झाली तर तुला लेक्चर ला बसायला नाही दिल, काय ? आठवतेय ना ? मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे.

अग परवा याचा बाप आला होता कॉलेजमध्ये, आपला sandy तर त्याला बोलला ” वो वॉशरूम जरा ठीक से साफ करो ” ……मग काय . कसंय ना ” बेडकाला कस छोट्या खड्ड्यातून तलावात आल्यावर वाटतं की मी मोठा झालोय म्हणून पण बेडूक तो बेडूकच ” हा हा हा हा …… ( मैत्रिणीला म्हणते )

ए भाई प्रेम करायला सुद्धा पण स्टँडर्ड लागतो कळलं का आणी स्टँडर्ड व्हायला फक्त आणि  फक्त पैसा.
तुला माहिती आहे ? तुझ्यासारखे ५६ मूल माझ्या मागे मागे फिरतात आणि ते पण असे तसे नाही हा एकदम स्टँडर्ड.

त्यामुळे इथून पुढे  माझ्याकडे बघताना सुद्धा विचार करून, कळलं? तुमच्यारख्या भिकारड्यांची औकात नाही तरीसुद्धा या कॉलेजमध्ये तुम्हाला आसरा दिलाय त्यामुळे आपली पायरी आपण लक्षात ठेवायची .त्याच्या वर यायचा प्रयत्न करू नकोस.

Anyway  मी पण कोणाशी बोलतेय. आता जे काही बोलतेय ते लक्षात राहुदे . म्हणजे झालं….

हे पण वाचा :

एकदम जबरदस्त मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Male

(Pro Tips)घर बैठे ऑडिशन कैसे दें-2024 Audition Tips In Hindi

Marathi Monologue Script For Female PDF Free Download | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट फ्री मध्ये डाउनलोड करा

Marathi-Monologue-Script-For-Female
Marathi-Monologue-Script-For-Female
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female, Marathi Monologue Female,Marathi Monologue Script For Female PDF Free Download, audition, marathi audition script, best audition for male, new audition script for mail.

Leave a Comment