पूर्वकल्पना:
आज आम्ही तुमच्यासाठी खास स्क्रीप्ट घेऊन आलेलो आहोत Marathi Monologue Script For Audition | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट. एक वयोवृद्ध जोडप आहे जे शहराच्या ठिकाणी राहतात. आज आजोबा आजी उठायच्या आधीच उठले आणि तिच्यासाठी चहा बनवून घेऊन गेलेत. आजोबा आजीला उठवायला गेलेत कारण आज त्यांच्याकडे खास पाहुणे येणार आहेत. हा प्रसंग घडत असताना आजोबांच्या मुखातून निघालेले उच्चार खालीलप्रमाणे …..
पात्र :
आजोबा ( वय वर्ष ७० )
वेळ :
१ मिनिट ४५ सेकंद
Marathi Monologue Script For Audition For Male | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल
काय हो उठलात काय ? अहो उठा… आज तुमच्या आधी मीच उठलोय बघा, आणी बरं का चहा सुद्धा केलाय मी तुमच्यासाठी तो ही फक्कड मलाई मारके ..काय ! चला उठा बघू लवकर लवकर, मला माहिती आहे पुढच्या महिन्यात गावी जायचं आहे त्यामुळे तुमचं काही मन थाऱ्यावर नाही, आणी त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करत बसता. पोर – टोर, नातवंड, शेतीवाडी या सगळ्यांची काळजी आहेच पण दिवसभर हेच डोक्यात धरून बसलात तर कस होईल?
बर आजचा दिवस लक्षात आहे ना की विसरलात ? हा …म्हणजे एकवेळ मी कुठलीही गोष्ट विसरेन पण तुम्ही नाही . आज मी खूप खूष आहे की नाना आणी अण्णा मुंबईला येणार आहेत. किती वर्षापसुन मी त्यांना सांगतोय की मुंबईला या म्हणून पण नाही …शेतीवाडी, गुरढोर यांचं करायचं म्हणे. नानांना गुराढोराची इतकी आवड आहे म्हणून सांगू ४-५ बैल, ३गायी , म्हैसी आणी लहानसहान वासर .अबब केवढा मोठा हा खटाटोप. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो आपलं लग्न एका तासावर होत तरी हा माणूस माळावर गुरांच्या मागून फिरत होता. मीही तेवढाच हट्टी, नाना नाही तर माळच घालणार नाही एवढं म्हटल्यावर कोणीतरी पळत गेला आणी नानांना घेऊन आला. हा हा हा …
आणी अण्णांचं सांगायचं तर पक्का शेतकरी. शेतीत मुरलेला,वडिलोपार्जित शेतीची शिदोरी जपून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावणारा आणी तितक्याच आवडीने स्वतःचे चांगले वाईट अनुभव इतरांशी वाटणारा असा तो सर्वकलागुनसंपन्न माणूस. शेतीच्या कामाच्या बाबतीत अण्णाचा हात कोणीही धरू शकत नाही.
आता हे दोघेही येतायत म्हटल्यावर माझं काय होणार मी बिचारा मॅट्रिक माणूस आणी पतपेढीत नोकरी करतोय या पलीकडे बाकी काही मला काही येत नाही. बर आता आवरा लवकर नाहीतर म्हणतील इथे बरा काम करतोस गावी आला की तुझी कंबर धरते.. बाकीच तर त्यांच्या गावच्या गजाली सुरु झाल्यावर कळेलच. आणी हो रमेश ला म्हणावं आज जरा लवकर ये कामावर आणी उशीर होईल घरी जायला म्हणून,ओव्हरटाईम मिळेल त्याची चिता करू नकोस म्हणावं आता माणस वाढली की बाकी सर्व वाढलंच की, जेवण-खावन , भांडी,लता- कपडे.
अरे हो आज १० नंतर पाणी बंद होणार आहे लागलीच जातो आणी आधी टाकी भरून घेतो.
हे पण वाचा:
Marathi Natak Script PDF Free Download | दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट
Marathi Monologue Script For Audition pdf | मराठी ऑडिशन मोंओलॉग
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Marathi monologue script for audition pdf, Marathi monologue script for audition for girl, Marathi monologue script for audition for male, Marathi Monologue Script For Audition, मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट,Marathi monologue script for audition for boy, marathi audition script.