पूर्वकल्पना :
(सकाळची वेळ आहे ) रामा नावाचा मालवणी माणूस सकाळी सकाळी गडबडीत तात्यांना त्यांच्या अंगणाच्या बाजूने जाताना दिसतो, एवढा गडबडीत दिल्यामुळे तात्यांनी त्याला त्याचं कारण विचारलं. तात्यांचे एका मागोमाग एक प्रश्न ऐकून रामा त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो की त्यांच्या वाडीतील एक वयोवृद्ध म्हातारी ची तब्बेत बारी नाही आहे आणि तिला सरकारी दवाखान्यात नेल गेल आहे .
सदर ऑडिशन स्क्रिप्ट ही मालवणी भाषेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही स्क्रिप्ट मालवणी नाटक, एकांकिका, एकपात्री तसेच ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वैयक्तिक पत्राची गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा वापरू शकता. (Monologue Script in Marathi)
वेळ :
1 मिनिट 30 सेकंद
मालवणी भाषा ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Script Free PDF
ओ तात्यांनु काय करतास ? सकाळीच !! .. ..आता काय सांगाव तुमका ? तुमका काय खबर ? ओ परबांच्या घराकडे गेलंय, होय तर ! अहो ती परबांची म्हातारी पुढल्या दारच्या पडयेतसून खळ्यात पडली ना ! तरी नशीब हुंबरो चुकलो , नाहीतर काय बघूकच नुको हुता .
कोणाक कोणाचा पडलेला नाय हा , मी आपलो म्हशी चराक घेवन जाय होतंय म्हणाण बघलय आणि आरड मारलय . आता न्हिल्यानी हा सरकारी दवाखान्या . नाय न्हेवन काय करतीत , उद्या लोकांका उत्तरा देवक होई नुको.
तात्यांनु तुमका म्हनान सांगतय , तिची सून ढुंकान पण बघना नाय तकडे, पण ह्या लोकांका माहित नाय हा . वर वर दाखवता म्हणाण काय समजत नाय कोणाक.
म्हातारी चलान फिरान हुती ता बारा हुता ,आता फुडे कसा काय होता हा देवांक म्हायत. वरची नानी सांगा हुती कसली तरी पेन्शन चालू हा तिका , नाय तर बिचारेक घर पण नशिबात नाय हुता .
कधी घराकडे गेलस तर तीना असाच पाठवल्यान नाय, अगदीच नाय चाय चा फुटा पानी तरी फुडे करी, म्हणाण वायच वायट वाटता. देवा भैरोबा च्या कृपेन सगळा बारा होवदे.
काय म्हणतत तसला आयकलास, पोरांका हाताच्या फोडासारखे जपाक होये आणि हेंका पंखा फुटली काय आवस बापुस दिसत नाय . आम्ही बोलान तरी काय हा म्हणा, आम्ही कोण परकी मानसा. कसाव असला तरी म्हातारेन आमका लहानपणी अन घातल्यान हा आपुन इसरान चलत नाय.
बारा मी येतंय वायच मूठभर चार हानतय खायसून तरी, बारक्या वासूर घराकडे हा. जवया मगे म्हातारेक बघूक . आपनाक तरी काय म्हणा अगदीच नाय वायच पेजेचो निवळ फुडे करुक होयो .
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Marathi Monologue Script Free PDF | मालवणी भाषा ऑडिशन स्क्रिप्ट फ्री PDF
Tag : script marathi,ऑडिशन स्क्रिप्ट,marathi comedy script for audition,malvani audition script ,Marathi Monologue Script (Marathiauditionscript),audition in marathi,script for kids,hindi monologue for audition,acting scripts for auditions,sample scripts,sample script,script in marathi for audition.