Marathi Monologue Script | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट फ्री

पूर्वकल्पना :

आज आम्ही आपल्यासाठी नवीन स्क्रिप्ट घेऊन आलो आहोत Marathi monologue script for male ; मुलांसाठी किवा पुरुषांसाठी ही स्क्रिप्ट आहे. या स्क्रिप्ट मध्ये एक व्यक्ति आहे जो सर्व अन्यायाविरुद्ध बोलतो , खर बोलतो आणि त्यामुळे समाज्यातील लोक त्याला वेडा ठरवत आहेत. हा समाज त्या व्यक्तीला बोलू देत नाही तो जर बोलला तर असंख्य खोटी दार उघडी होतील, आणि म्हणूनच हा आवाज दाबला जातोय. असाच एक व्यक्ति आहे ज्याला जाणून भूजून वेडा ठरवलं जात आहे . आता पुढे ..

मित्रहो कसय, आपण तुमच्यासाठी नवनवीन स्क्रिप्ट घेऊन येतच राहणार आणि ते सुद्धा निशुल्क, तुम्ही पहिल असेल की अश्या प्रकारच माध्यम कोणीही विनामूल्य उपलब्ध करून देत नाही ; परंतु आपल्या सर्व मित्र-मैत्रिणीसाठी इथे सर्व प्रकारच्या ऑडिशन स्क्रिप्ट आम्ही शेअर करत असतो. स्क्रिप्ट आवडल्यास खाली कमेन्ट बॉक्स मध्ये कॉमेंट करून feedback द्या हेच आमच्यासाठी मूल्य असेल.

पात्र:

मुलगा /पुरुष ( वय वर्ष २५-४० )

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

Marathi-Monologue-Script
Marathi Monologue Script | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट फ्री

Marathi Monologue Script For Male | मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर मेल

हो आहे मी वेडा .. आहे …वेडा आहे मी ….वेडा आहे मी (ओरडून)…..अन्यायाविरुद्ध बोलणारा प्रत्येक माणूस असतो वेडा . त्याची मत, त्याचा खरेपणा, त्याचा रोखठोकपणा या सर्व गोष्टी त्याला वेड बनवतात किंबहुना वेड व्हायला भाग पडतात.माझ्याही बाबतीत तेच, ” एकदा, दोनदा किती वेळा ” ?. म्हणजे एरवी मी ज्यावेळी तुमच्या बाजूने बोलतो त्यावेळी चांगला माणूस, सुशिक्षित.माझ्या आदर्शाचे धडे लोकांना देता पण तोच व्यक्ती ज्यावेळी तुमच्या विरुद्ध जाऊन काहीतरी बोलतो त्यावेळी वेडा.(स्मितहास्य )

हे बोलणारे कुणी अन्य नव्हे तर माझ्या आजूबाजूचेच आहेत. माझ्या एका वाक्याने समज बिघडतोय म्हणे. समाज तर बिघडेल ‘ बरोबर आहे कारण मी वेडा आहे ना ‘. या वेड्याबरोबर नका राहू हा ” तुम्ही पण बिघडाल …तुम्ही पण बिघडाल “.जा जा निघून जा ….निघून जा इथून ..(थोड वेडेचाळे करत..घाबरत).. निघून जा .

बोटाला शाही लावायची आली की मी जबाबदार नागरिक, देशवासी आणी शाही निघून गेली की वेडा (दात चावत. ..रागाने) . पण किती आणी काहीही झाल तरी तुमच्या दबावाखाली चिडून जाईल इतका नरम नाही आहे मी. वाईट या गोष्टीच नाही की हे असे लांडगे माझ्यासारख्या सामान्यांचे लचके तोडतायत तर वाईट त्यावेळी वाटत की माझ्या अवतीभोंवती असणारे सुद्धा माझ्यावर संश्याच्या नजरेने बघू लागतात.

असो …माझ्यासारखे कित्येक वेडे असतील जे जिवंतपणी मेल्यासारखे जगतायत, त्यांच्या भावना, त्यांचे विचार एका अंधाऱ्या बंद खोलीत फिरतायत ; ते वाट शोधू पाहतायत पण त्यांच्याकडे जाणार प्रत्येक प्रकाशकिरण या नराधमांनी रोखून धरलंय. ” मला त्यांच्यासाठी जगायचंय …जगायचंय मला….एक वेडा होऊन का होईना पण जगायचंय…जगायचंय ” …(रडत)

हे पण वाचा:

2024 बच्चों के लिए ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Hindi For Male

फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

Marathi Monologue Script PDF Free | मोनोलॉग स्क्रिप्ट पीडीएफ इन मराठी

PDF image 15
Marathi-Monologue-Script
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: Marathi monologue script pdf, Marathi monologue script for girl, Marathi monologue script for male, Marathi monologue script for female, Marathi monologue script for female pdf,Marathi monologue script for boy, Marathi Ausition Script.

Leave a Comment