पूर्वकल्पना :
एका ठिकाणी एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत जे एका सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. सकाळी बिल्डिंग मधून बाहेर आल्यावरती सहज त्यांचं लक्ष एका व्यक्ती वरती पडतो जी व्यक्ती अनोळखी असते आणि सोसायटीमध्ये / बिल्डिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. कोणीतरी नवीन व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते त्यांना अडवतात आणि विचारपूस करू लागतात. तुम्ही कोण, कुठे, कोणाला भेटायला आला ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न ते त्यांना विचारतात आता पुढे…
पात्र:
सोसायटी सेक्रेटरी (सोमदत्त पानचटे) वय वर्ष ६५ -७०
वेळ :
१ मिनिट ३४ सेकंद
Marathi Monologue For Male फ्री ऑडिशन स्क्रिप्ट
ओ ओ हॅलो काय कुठे …
थांबा आधी, आपण कोण आणी कुठे चाललाय मला कळेल का ?
आपणांस माहित नसेल म्हणून सांगतो, या ” कुंजनवन ” सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी ” सोमदत्त पानचटे ” आणी तो मीच. सोसायटी चा सेक्रेटरी या नात्याने माला आपणास विचारावेसे वाटते की आपण इथे कोणास भेटायास आला आहात ?
कसं आहे की अनोळखी व्यक्तीला सोसायटीमध्ये येण्यास आम्ही सक्त मनाई केलेली आहे, आणी तसे सोसायटी च्या परवाच्या बैठकीत नमूद केलेलं आहे.
नाव काय म्हणालात ? ” विश्वनाथ ” अरे वा छान नाव आहे. इथे कोणाकडे म्हणालात ? ” शिवराम कोलमठकर ” .
हो का ? हे आधी सांगायचं नाही का. आम्ही आपलं उगाच विचारपूर करत राहिलो. अहो कोलमठकर आणी आम्ही खूप जवळचे स्नेही बर.
नाही म्हणजे सांगायचे असे की त्यांच्या मुलीच्या सासरी आमच्या आहों ची चुलत बहीण दिलेली आहे.
नाही नाही ….अहो म्हणजे आमच्या पत्नी हो, लाडाने आम्ही त्यांना अहो म्हणतो.
असो, त्यामुळे म्हटलं की आम्ही जवळचे स्नेही आहोत म्हणून. बर तुम्ही काय करता ….नाही म्हणजे व्यवसाय किंवा पोटापाण्यासाठी काय करता ?
वा उत्तम … स्वतःचा व्यवसाय करता म्हणजे कुणाजवळ हात पुढे करायची गरज नाही.असंच …असंच प्रत्येकाने पुढे येऊन व्यवसायात उतरलं पाहिजे तर आणी तरच आपला देश पुढे जाईल.
बाकी घरी कोण कोण असतं? ….हो का …छान छान. ..
लग्न वैगेर झालय ? ..
नाही का ? काही विचार आहे की नाही, नाही म्हणजे कसय सर्व गोष्टी या वेळेतच व्हाव्यात बरं, म्हणून विचारलं.
नाही म्हणजे काही विचार असेल तर बघा, तशी एक मुलगी आहे आमच्या नजरेमध्ये. चांगली मॅट्रिक पास आहे हो, घरच सगळं उत्तम करते.
नाही म्हणजे आपली हरकत असेल आम्ही पुढाकार घेऊ शकतो .
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका , गंम्मत केली .आमचा स्वभावच आहे असा काय करणार.
बर तुम्हाला उशीर होत असेल ना, या या तुम्ही कोलमठकर वाट बघत असतील.
Marathi Monologue For Male PDF डाउनलोड फ्री
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag:Monologue script in marathi for boy,Monologue script in marathi for male,(सेक्रेटरी) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Monologue For Male PDF,Marathi Monologue For Male फ्री ऑडिशन स्क्रिप्ट ,Marathi Monologue, marathi audition script, audition for male,female latest audition.