पूर्वकल्पना :
एक आजच्या काळातील माणूस , स्वतःची मानसिकता हरपून विचारांच्या जोरावर काही वर्ष मागे, शिवकालीन युगामध्ये गेला. महाराजांवर अखंड प्रेम आणि महाराजांच्या विचारांमुळे प्रेरित झालेल्या निळकंठ सुभेदार या व्यक्तीला कुठेतरी महाराजांची उणीव भासू लागली. सध्याच्या काळात झालेले हे जग, जगातील बदल यांचं रोजच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम व त्यांची कारणे त्याला स्वस्थ बसू देत नाही.
आणि म्हणूनच ही सर्व तक्रार घेऊन तो महाराजांकडे गेलाय , तिथे जाऊन तो राजांना विनंती करतोय की ही सर्व परिस्थिती जर का बदलायची असेल तर ” राजे पुन्हा जन्माला या ” .
हे एक लघु नाट्य म्हणता येईल किंवा एकपात्री साठी सुद्धा या marathi audition script चा उपयोग करता येईल. ही स्क्रिप्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार सादर करू शकता, परंतु सादरीकरणादरम्यान कुठल्याही ” ऐतिहासिक व्यक्ती, घडामोडी, गोष्टी यांचा अवमान होता नये याची काळजी घ्यावी.“
वेळ:
वाचन 7 मिनिट (सादरीकरण 10-15 मिनिट )
Simple Marathi Script For Audition | ” राजे पुन्हा जन्माला या ” ऑडिशन स्क्रिप्ट मराठी
” नमस्कार मि नीळकंठ सुभेदार , नाही नाही म्हणजे नाव आणी शरीरयष्टी याचा काहीही संबंध नाही पण पूर्वजी परंपरा आणी चालीरिती यांप्रमाणे ही नावही आमच्यापर्यंतर्यं चालत आलीत ” ,बाकी फारस याच्यात नवल नाही.
असो …
खपु दरूुन आलोय .” तेवढी राज्यांची भेट घालनू दिली असती तर बर झाल असत “. हो मी
वाट बघतो ,तेवढा राज्यांना सागावा पाठवा.
हो चला….
मुजरा सरकार ..मुजरा ….(आनंदित होऊन ) ” सोनियाचा दिस आज अमृते पाहिला ” ..धन्य झालो राजे
…धन्य झालो ..तुम्हाला पाहील राजे माझा देव मला भेटला.
आजपर्यंत ” ईतिहासकार,कवि, कीर्तनकारांनी ” जे वर्णन केल , आमच्यावर संस्कार करताना जे
आमच्या मनात रुजवलं गेल अगदी तसच किंबहूना त्याहून संदरु माझ्या राज्याचं हे रूप पाहुन
खरच धन्य झालो.
‘ राजे मि कोणी मोठा माणसू नाही ,आपणच घडवलेल्या स्वराज्यातील, याच मातीत जन्माला
आलेला एक सामान्य माणसू आहे.’
हो आज याच सामान्य माणसाला आपल्या दरबारी याव लागल, नाही म्हंटल बघाव माझ्या
राजांचा दरबार कसा होता ते , बघाव माझ्या राजाचं स्वराज्य कसं होतं ते , बघावं माझ्या
राजांच्या अवतीभवती असणारी माणसं कशी होती ते , आणि बघावं सामान्य जनतेवर , रयतेवर
माझ्या राजाचं किती प्रेम होतं ते .
आजवर फक्त इतिहासात वाचलंय , ऐकलंय , जे जे आमच्या पर्यंतर्यं पोहोचवलं गेलं तचे आम्हाला
समजलं. पण आज प्रत्यक्षात पाहिलं, राजे माझ्या डोळ्यांच पारडं फिटल राजे, माझ्या डोळ्यांच
पारड फिटलं.
पण राजे काही वर्षपूर्वी आपण सामान्य माणसू घडवला, ज्या सामान्य माणसाला समाज्यात
मानाने वावरायला शिकवलं, तोच सामान्य माणसू आज कुठेतरी मागे पडत चाललाय हो.
आज सामान्य माणसू कुठेही कमी नाही, तो प्रयत्न करतोय पण काही विकृत विचरांची माणस त्याला
तिथपर्यंतर्यं पोहोचू देत नाहीत.
तुम्ही अफजल खान संपवला स्वराज्यातील आया बहिणीची अब्रू वाचवली , पण राजे आज
माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही हो, दिवसा ढवळ्या त्यांच्या अब्रूवर हात टाकला जातोय,
त्यांची विटंबना के केली जातेय, आणि आमंच्यासारखे काही षंढ प्रवृत्तीची माणस ते उघड्या डोळ्यानी
पाहतायत. कुणा एकाची हिम्मत नाही की त्यांना जाऊन विचाराव की त्यांच्याशी दोन करावे.
राजे तुम्ही राजकारण केलं पण ते प्रजेच्या हितासाठी, पण आज आम्ही राजकारणामध्ये
सद्धा स्वतःचा स्वार्थ बघतोय, मग तिथे कुणाचे नुकसान होवो की अन्य काही आम्हाला
त्याचं काही घेणं देणं नाही.
आज आमची बद्धी भ्रष्ट झाली आहे, दुसऱ्याच्या आनंदापेक्षा आज स्वतःचा आनंद आम्हाला
जास्त प्रिय आहे.
आम्ही मराठी माणसाला मदतीचा हात तर देत नाहीच, पण जर का
स्वप्रयत्नाने कष्ट करून कोणी पढुे गेला तर त्याचे पाय मात्र ओढायला आम्ही सज्ज आहोत..
तुम्ही म्हणायचे की जर का तम्हाला तुमच्या ध्येयापर्यंतर्यं पोहोचायचे असेल तर मराठी
माणसाने एकजुट होणं गरजेचं आहे, होतो ना आम्ही एकत्र, काढतो संघटना, काढतो मिरवणका ू
पण कशासाठी दगडफेक आणि जाळफोळ करण्यासाठी?
स्वकीयांशी वैर करून परकीयांची घर भरण्यातच आम्ही वाया जाणार , आम्हाला आमचे
विचारच नाहीत, ते करून सद्धा काय करणार म्हणा. आमच्या विचारांना चालना देणारे कोणी
नाही , पण दबाव आणणारे मात्र कित्येक मिळतील.
न जानो कित्येक कर आणि वसुली माझा सामान्य माणसू भरतोय , राजे एकवेळ पोटाला चिमटा
काढतोय पण कर भरतोय, तुमच्या रयततील शेतकरी कसा होता हो , तोही कर भरायचा
पण सुखी समाधानी आयुष्य जगायचा, माझा शेतकरी बांधव कष्ट तवढेच करतोय पण
व्यवसायिक आणि दलाल यांच्या कचाट्यात सापडलाय. दर साल कित्येक माझा शेतकरी
बांधव स्वतःच जीवन संपवतोय, प्रत्येकांची बायका पोर वर्षानवुर्ष या कर्जाच्या बोजाखाली जीवन जगतायत..
कुठे तरी हे बदलल पाहिजे राजे…. “ ही मानसिकता आणि हे वास्तव कुठेतरी
बदलल पाहजे.
त्या.. त्या औरंगजेबाला केवढा विश्वास ओ , की त्यांच्या आया बहिणी मराठ्यांच्या ताब्यात
आहेत पण कणभर ना दुख, ना चिंता, ना भीती. उलट तो स्वतच्या दरबारात मोठ्या तोरयात
सांगतोय की “ फक्त मराठ्यांच्याच ताब्यात आहेत ना, मग चिंता सोडा . औरतों के लिए
मराठों के सिवा दुसरी सुरक्षित जगह नही है ” राजे ही तुमची पुण्याई राजे, तुमच्यावर
झालेल्या संस्काराची पण्याई.
राजे आज आम्ही तुमची जयंती, पुण्यतिथी न चुकता साजरी करतो हो , छत्रपती शिवाजी
महाराज की हे शब्द कानावर पडतात कोणाच्याही मुखातून आपसूक जय बाहेर पडत. ही
आपण केलेली पुण्याई आहे. आपण दिलेले आचार विचार, आजही आम्ही कटाक्षाने पाळतो,
त्याचा सन्मान करतो.
पण कुठेतरी वाटतं की या विचारांना थोडी धार देण्याची गरज आहे, एखाद्या तलवारीच्या
लखलखत्या पात्याप्रमाणे हे विचार चमकले पाहिजेत, आणि समोर येणाऱ्या विकृत
परिस्थितीवर मात करत विजयाची भगवी पताका या देशाच्या कानाकोपऱ्यात फडकली पाहिजे ,
तेव्हाच आपण केलेल्या पराक्रमाचे सार्थक होईल.
तुम्ही नाही कधी धर्म,जात यांच्यात भेदभाव केला. आपल्यासाठी , दलित ही तवढाच ,
मध्यमवर्गीय ही तेवढाच आणि उच्चवर्णीय तेवढाच महत्त्वाचा होता, पण आमच्यातही
मानसिकता कधी येणार , आमच्यात हा शिव विचार कधी जागणार.
महाराज ही सगळ जर का सुरळीत करायच असेल तर गरज आहे.. .. .. गरज आहे आम्हाला
तुमच्या सारख्या राज्याची ,गरज आहे आम्हाला तुमच्या सारख्या नेतृत्वाची , गरज आहे आम्हाला
या भागव्या झेंड्याची , गरज आहे आम्हाला या मर्द मराठी मावळ्यांची,गरज आहे आम्हाला
आपल्या शिव विचारांची , आणि गरज आहे राजे आम्हाला रायतेला न्याय देणाऱ्या स्वराज्याची,
गरज आहे राजे गरज आहे ..
आणि ही सर्व स्वप्नवत जग जर का सत्य करायच असेल तर एकच मार्ग आहे राजे आपण पुन्हा
जन्माला या ,राजे पुन्हा जन्माला या ,राजे पुन्हा जन्माला या…
Marathi Monologue For Male | ” राजे पुन्हा जन्माला या ” ऑडिशन स्क्रिप्ट मराठी (डाउनलोड )
Tag: script marathi,ऑडिशन स्क्रिप्ट,sample script,sample scripts,acting scripts for auditions,marathi audition,marathi natak script pdf free download,मराठी एकांकिका script,marathi monologue script,marathi audition script for male,marathi monologue for male,marathi audition script,Marathi Monologue For Male (MarathiAuditionScript),hindi monologue script pdf,.