पूर्वकल्पना :
एक शेतकरी महिला आहे जी स्वतःच्या शेतातील पिकावलेली भाजी बाजारात विकायला बसलेली आहे. त्या ठिकाणी एक गृहस्थ आले आणि त्या महिलेलेकडून भाज्यांचे दर विचारू लागले. पेहेरावावरून तर ते चांगल्या घरातले वाटतायत. भाज्यांचे दर पाहून तुम्ही जास्त किंमत सांगत असल्याच तिला सांगतात त्यावरून ती शेतकरी महिला त्या गृहस्थांना आपली व्यथा सांगते.
पात्र:
शेतकरी महिला (वय वर्ष २५-३५ )
वेळ:
१ मिनिट
Marathi Monologue For Female Online | मराठी मोनोलॉग फॉर फिमेल ऑनलाइन
या साहेब या काय देऊ ?
भाजी व्हय… ही इथ दिसतीया ती समदि भाजी इकायाच ठेवली हाय . तुमासणी काय देऊ ?
मेथी हाय ना .. हे घ्या २० रुपयाला एक .. आनं ताजी हाय बरं का , सकळच्यालाच काढून घेऊन आलोया |
नाय ओ साहेब किंमत म्या सांगितली तेवढीच, त्यात कमी न्हाय व्हायची. आवं दिस रात शेतात राबतूया आम्ही तवा कुठ चार पैस आमच्या गाठीला पडत्यात.
साहेब मोठ्या दुकानात छापलेली किंमत द्यायला समद्यांकड पैस हायत, पर आमच्यासारख्या गरिबांना कष्टाचं बी दोन पैस द्यायला लोक ईचार करत बसत्यात.
दहा रुपयाला नाय परवडत ओ, आवं काय येतंय आजकल दहा रुपयाला तरिबी पोटाकड बघून देतो बी अधन-मधन पर आता सकाळपातूरच पहिल गिऱ्हाईक तुम्ही आणि तुम्हासणी असा माघारी धडण म्हणजे लक्ष्मी ला नाकरल्यावाणी होईल बघा .
तुमच नाय माझ १५ रुपये द्या चला, आवं आता कसला ईचार करताय सा ? घ्या की बिगिबिगि.
अजून घ्या की कायतरी .. ही बघा मिरची हाय, लसूण हाय, कांदा हाय , कोथिंबीर बी हाय ..
आवं सूट पैस द्या की .. काय साहेब आता १५ रूपयासाठी ५०० रुपये सूट आणू म्या ? तुम्ही अस करा आता ही भाजी घेऊन जा आणि फुडल्या खेपला पैस द्या.
Marathi Monologue For Female PDF Free Download | मराठी मोनोलॉग फॉर फिमेल पीडीएफ फ्री डाउनलोड
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
मित्रहो इथे दिलेले स्क्रिप्ट तुम्हाला आवडतात किंवा नाही, वाचायला मजा येते, त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही चुका आहेत , सुधारणा करायला हवी, कुठल्याही विषयावरती स्क्रिप्ट पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण कमेंट हे असं माध्यम आहे जे तुम्हा-आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवते.
Tag: शेतकरी (ग्रामीण महिला )ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue For Female, Marathi monologue for female online, Marathi Monologue For Female PDF Free Download, marathi audition script, girls audition, female audition script, natak script for female.