Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो आज आपलीसाठी खास “दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट ” घेऊन आलोय, ” Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ “ ; वडील घरी दाढी करत आहेत आणि मुलगी हातात रिजल्ट घेऊन येते, आपण परीक्षेत पास झाल्याची बातमी देते. एकीकडे वडील मुलीच्या बातमिने आनंदात आहेत आणि एकीकडे मुलाच्या वागणुकीमुळे त्रस्त . आई ,बाबा , मुलगी ,मुलगा या कुटुंबात घडत असलेली गोष्ट आहे जी मुलगी आणि बाबा याच्या संवादा मधून आपल्याला दिसेल.

पात्र :

मुलगी ( १८-२५ वर्ष ) , वडील ( ४०-५० वर्ष )

वेळ:

७ मिनिटे ३० सेकंद

Marathi-Drama-Script-PDF
Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ

Best Marathi Drama Script PDF | बेस्ट मराठी ड्रामा ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ

मुलगी: बाबा …बाबा..बाबा …आहो कुठे आहात तुम्ही ? 

बाबा: अग अग…हो हो…पण झाल तरी काय ते सांगशील का ? की फक्त बाबा बाबा च करणार आहेस ?

मुलगी: अहो बाबा आधी तुम्ही इकडे या बघू .

बाबा: हे बघ मी जरा दाढी करतोय,उद्या संध्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला जायचंय माहिती आहे ना. जे काय सांगायचंय ते इथेच सांग.

मुलगी: हा आता तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या मुलांचीच लग्न करा आपली राहूदे बाजूला.(थोड रुसल्यासारखं)

बाबा: काय म्हणालीस ? 

मुलगी: आ…? नाही नाही काही नाही..तेच की आधी हे सर्व ठेवा  आणि इकडे या.

बाबा: अग हो हो .. पण काहीतरी सांगशील का ? इथे तु काय सांगशील याचा विचार करून माझ्या छातीत धडधड सुरु झाली आहे. बर मग जी गोष्ट सांगणार आहेस ती चांगली की वाईट हे तरी निदान सांग, जेणेकरून माझी धडधड तरी कमी होईल.

मुलगी: तुम्ही असे ऐकणार नाही, हे ठेवा बाजूला . आता या इकडे बसा आणि डोळे बंद करा.

बाबा: अग पण माझी अर्धी दाढी..?

मुलगी: तुम्ही डोळे बंद करा ना.

बाबा: बर करतो…

मुलगी: आता उघडा..

बाबा: हे काय…!..म्हणजे तु..?

मुलगी: हो बाबा…मी फायनल परीक्षा पास झालेय आणि ते सुद्धा टॉप 5 मध्ये.

बाबा: मला माहित होत तु बापाचे कष्ट वाया जाऊ नाही देणार आणि तु ते सिद्ध केलस. ए ऐकलंस का ग आपली नंदिनी पास झाली बर का आणि ते सुद्धा नंबरात. काय म्हणालीस गोडधोड…करा हो करा आज गोडधोड, चमचमीत, पंच पक्वन करा माझी मुलगी पास झाली आहे.

मुलगी: बाबा तुमची दाढी….तो फेस पसरतोय सगळीकडे..आधी धुवून या बघू.

बाबा: हे बघ आता दाढी वैगेरे सर्व बाजूला, या घडीला माझ्या दाढीपेक्षा तुला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण हे जास्त महत्वाचं आहे. थांब आधी त्या नाकतोड्याला सांगतो ,नाकतोड्या म्हणजे तो शेजारचा गुंडू बर. काय आहे आम्ही आमच्या ग्रुप मध्ये त्याला नाकतोड्या म्हणतो. सतत दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक घुपसत असतो. आता माझ्या मुलीने इतकं मोठ काम केलय ते सांगायला नको.

मुलगी: तुमचही बरोबर च आहे म्हणा, कित्येक मूल वर्ष वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्यांना हे यश मिळत नाही पण मला तर पहिल्याच वेळेला मिळालं आणि ते सुद्धा भरघोस.

बाबा : हे बघ आता मागे वळून बघायचं नाही सतत पुढे बघून चालायचं.

मुलगी: बर बाबा …नाही बघत मागे वळून….बाबा दादा कुठे आहे , नाही म्हणजे दिसत नाही आहे आल्यापासून;  नाही म्हणजे मला त्याला सुद्धा ही बातमी द्यायची आहे.

बाबा: (थोड रागाने) काहीही गरज नाही आहे कोणालाही सांगायची, आणि हो तुझा दादा काही मोठ काम करायला नाही गेलाय. एव्हाना तो समुद्रात पोहत असेल नाहीतर स्वर्गविहार. आपण ज्या ठिकाणी पोहोचायचा विचार सुद्धा करत नाही तिथे हे महाशय रोज जातात.

मुलगी: म्हणजे बाबा….दादा पुन्हा…..(संशयाच्या नजरेने)

बाबा: हो हो…तुझा दादा परत दारू पिऊन आलाय. काय करायचं काहीच कळत नाही आहे. लहान असताना म्हटलं मोठ झाल्यावर बापाचं नाव उज्वल करेल पण अश्या पद्धतीने करेल हे माहित नव्हतं.आज मला समाजात तोंड दाखवायच्या लायकीच सुद्धा ठेवलं नाही आहे. बर किती आणि काहीही झाल तरी आपल्याला सामाज्याची गरज ही पडतेच त्यामुळे त्यांनाही दुखवून चालत नाही. मधल्या मधी माझी मात्र फरफट बाकी काही नाही.

मुलगी: पण बाबा त्याने तर तुम्हाला वचन दिल होत ना की यापुढे दारूला स्पर्शही करणार नाही म्हणून.

बाबा: वचन….ह…ह्ह….. कुठलं वचन. अतिशय घाणेरड्या शब्दात सांगायच झाल तर ” बेवड्याना कसली आलीत वचन “.एकदा का नजारा त्यांच्यासमोर आला की माग आपली माणस, आजूबाजूची लोक, त्यांचे शब्द,वचन सगळी मातीमोल होतात.

मुलगी: मला तर वाटलेलं ही बातमी ऐकून दादा तर खूप खुश होईल. बाबा एक विचारू …नाही म्हणजे दादाची ही सवय काही केल्या सुटत नाही आहे मग पुढे कस होणार? 

बाबा: हे बघ या विषयावर बोलण, किंबहुना विचार करण सुद्धा बंद केलय मी. मला सांग हे अस बाहेर समजल्यावर कोण मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार होईल ?  बर एखादी होईलाही तयार पण कुठला बाप स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेईल? हे बघ मी ही एका मुलीचा बाप आहे, स्वतःच्या मुलीला सुखात बघण्यासाठी काय काय कराव लागत ना ते मला चांगलच ठाऊक आहे; त्यामुळे मी कुणा दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याशी खेळणार नाही. कळलं..

मुलगी: बाबा मला तर खूपच काळजी वाटायला लागली आहे आणि त्याहून जास्त भीती ही. 

बाबा: हे बघ आता तो विषय नको. आई आज गोडाधोडाच जेवण करतेय त्यामुळे आज फक्त हसायचं, कुणालाही सहजादाहजी जमणार नाही अस काम तु केलंयस त्यामुळे बिनधास्त राहायचं , अगदी रुबाबात.

मुलगी: बाबा मला कळतंय की तुम्ही बाहेरून कसेही वागलात तरी तुम्हाला सगळयांची काळजी आहे. सगळं नीट होईल. आपण सगळे मिळून दादाला समजावू आणि माला खात्री आहे तोही घेईल ऐकून आपलं. 

बाबा एक विचारू का ?

बाबा: हो विचार ना ..काय आहे आज मी तुझ्यावर खूप खुश आहे त्यामुळे तु काय म्हणशील ते आपण करू. 

मुलगी : ते मघाशी मी घरी येताना बबन शेठ ला आपल्या घरातून बाहेर जाताना बघितलंय. तुम्ही माझी फी भरायला काही कर्ज वैगेरे घेतलंय का ?

बाबा: हे बघ तु त्या गोष्टींचा विचार करू नकोस, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक मोठी हो. आता त्यासाठी थोडीफार पैश्यांची गरज पडली आणि ते कुणाकडून तरी घेतले तर त्यात वाईट काहीच नाही. आपण उसन्या वस्तू घेतोच की लोकांकडून आणि त्या परतही करतोच ना, तसच पैसेही करणार . तु आतापासून या गोष्टींचा विचार करू नकोस फक्त अभ्यासावर लक्ष ठेव बाकी बघायला मी आहे.

(आतून हाक मारल्याचा आवाज)

काय ग?…. हो का हे मात्र उत्तम झाल.

मुलगी: बाबा आई  काय म्हणतेय कोण येणार आहे आणि काहीतरी पाठवायचं म्हणत होती.

बाबा: अग ते नाही का मी मघाशी म्हणालो की संध्या मावशीच्या मुलाचं उद्या लग्न आहे आणि आपण जाणार आहोत, तर तुझी मावशी खास आपल्यासाठी गाडी पाठवणार आहे.

मुलगी: (थोड मोठ्याने आतमध्ये आवाज ऐकू जाईल अस) नाही म्हणजे बाबा आजकाल बहिणी बहिणींच प्रेम जरा जास्तच उतू चाललंय अस नाही वाटत तुम्हाला..?

(दोघेही हसतात…हा हा हा हा )

बाबा: ( बायकोच्या कानावर पडल्यावर ती काहीतरी बोलते मग तिला समजावताना )अग हो हो… आम्ही मस्करी करतोय, बाकी मानल पाहिजे बर तुझ्या ताईला , निदान जायचा यायचा तरी प्रश्न मिटला.

मुलगी: बाबा …ते सर्व ठीक आहे पण …

बाबा : जाऊ….आपण जाऊ…जेवण झाल की सर्वजण जाऊ. लग्न समारंभ आहे , अंगावर चांगले- चुंगले कपडे असावेत अस प्रत्येकालाच वाटत त्यामुळे आज आपण नवीन कपडे घ्यायला जाऊ.

मुलगी: हो हो…ते दादाला पण उठवू का …म्हणजे त्याला पण काही घायचं असेल तर. 

बाबा: हे बघ …त्याला यायचं असेल तर तो येईल उगाच जबरदस्ती करायची काहीही गरज नाही आहे.

मुलगी: बाबा तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. माणस  बदलतात वेगळा विचार करायला लागतात, वेगळं वागतात हे सर्व त्या त्या वेळच्या परिस्थितीमुळे असेल कदाचित. आपल्याला कळत नाही की आपण कुठंच पाऊल उचलतोय, उचलेल पाऊल हे योग्य आहे की अयोग्य त्यामुळे मला अस वाटत की दादाच्या बाबतीत सुद्धा अस काहीतरी असेल जे तो आपल्याला सांगायला घाबरत असेल किंवा आपल्या कुटुंबाला त्रास नको म्हणून स्वतःच दुःख लपवत असेल.

मी काय म्हणते एकदा आपण …किंवा तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलल पाहिजे कदाचित तुम्हाला त्याच बोलण पटेल. हा आता राहिला त्याच्या काही वाईट गोष्टींचा प्रश्न ते ही सुटेल हळू हळू.

बाबा: ( थोडा हळवेपणाने )बाळा तु खरंच एवढी मोठी कधी झालीस मला कळलं देखील नाही. म्हणजे एक बाप म्हणू मी जो विचार करायला हवा , ज्या गोष्टी मी वडिलधारा म्हणून तुम्हा मुलांना सांगायला हव्यात त्या तुझ्याकडून मला शिकायला मिळाल्या. बापाच्या नात्याने स्वतःला जमेल तस मुलांना आपल्या परिवाराला खुश ठेवायचा प्रयत्न केला पण तुमच्या मनात काय आहे याचा विचार कधीच नाही केला.

बघ ते म्हणतात ना चांगल होण्यासाठी थोडी वाट बघावी लागते म्हणून तसच काहीतरी आज तुझा रिजर्ट लागला या एका चांगल्या गोष्टीबरोबर खूप काही आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्य घडतील . चल आपण दादांशी बोलू, त्याच दुख समजावून घेऊ ,त्याला चार चांगल्या गोष्टी सांगू, कदाचित त्याच्यामुळे तरी थोडीशी सुधारणा होईल.

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे सुद्धा वाचा :

Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी

२ Patri Natak Script in Marathi(Audition )| दोन पात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी

Marathi Drama Script PDF

Marathi Drama Script PDF Free | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ फ्री

Marathi-Drama-Script-PDF
Marathi Drama Script PDF
Download Now

Tag: Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ, Marathi drama script pdf in hindi,Marathi drama script pdf for students,Marathi drama script pdf download, Marathi audition script,marathi audition,marathi scripts,marathi natak pdf free download,ekpatri natak script in marathi pdf,serial audition script,

Leave a Comment