पूर्वकल्पना:
शेतकरी दलालाकडे माल घेऊन गेला आहे आणि दलाल त्याला माल कमी किमतीत मागतोय,त्याचवेळी एक समाजसुधारक कार्यकर्ता शेतकार्याच्या बाजूने बोलण्यास आला आहे. याप्रकरचे audition script तुम्ही मराठी नाटक किवा एकांकिका किवा फार फार तर फिल्म च्या audition साठी वापरू शकता.
पात्र आणि परिस्थिती यांचे भान ठेऊन व योग्य सराव करूनच सादरीकरण केले तर उत्तम सदरीकरन करण्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी ऑडिशन साठी लागणारी Marathi Drama Script उपलब्ध करून देत आहोत. [नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
पात्र :
दलाल (शेतकऱ्याचा माल विकत घेणारा) ,वय ३०-४५ वर्ष , सुरेन्द्र ( सामाजिक कार्यकर्ता ) २५-४० वर्ष
वेळ :
१ मिनिट २० सेकंद
Free Marathi Natak , Drama audition Script | फ्री मराठी नाटक, ड्रामा ऑडिशन स्क्रिप्ट
दलाल : तुम्हाला मी सांगितलेली किंमत परवडत नसेल तर इथून निघून जा उगाच माझा टाइम खोटी करू नका.
सुरेन्द्र: हे बघा तुम्ही करताय ते अत्यंत चुकीच आहे.
दलाल: तुम्ही कोण ?
सुरेन्द्र:
मी सुरेन्द्र एक समजकार्यकर्ता आहे,सामान्य नागरिक आणि समजकार्यकर्ता म्हणून मला ही बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणार. इथे शतकाऱ्यांची पिळवणूक होते, त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव नाही दिला जात अजून बरीच करणं आहेत.
दलाल:
हे बघा तुम्ही म्हणताय तस काहीही नाही उगाच तुम्हाला कोणीतरी माझ्याविरुद्ध भडकवत आहे. मी प्रत्येक शेतकऱ्याला योग्य तोच भाव देतोय.
सुरेन्द्र:
तुम्ही योग्य भाव दिला असता तर काल ट्रॅक्टर ला गळफास लावून त्या गरिबाचा जीव गेला नसता. ” त्याने पिकवायच, घाम गाळायचा, स्वतःच्या आणि पोरांच्या पोटाला चिमटा काढून दोन पैसे वाचवायचे..” कशाला ? तर पिकाला योग्य खत पानी देता याव म्हणून. जेव्हा सगळ पणाला लावून शेवटी पदरात चार पैसे येतील या आशेने तो तुमच्याकडे येतो तर तुम्ही त्याच्या भावनांशी खेळता.
दलाल:
साहेब हे बघा इतका सगळं माल घेऊन तो समोरच्याला देपर्यंत आम्हाला पण काही कमी कष्ट नाहीत, तसंही आम्ही जर यांचा माल घेतला नाही ना तर यांचा माल असाच कुजून जाईल कोण कुत्रं पण घेणार नाही. उलट आम्ही यांच्याकडचा माल घेतो ते यांच्यावर मेहरवाणी करतो एका अर्थाने.
ऐक्टिंग की प्रैक्टिस करने के लिए बेस्ट किताब : ” स्विच ऑन – स्विच ऑफ एक्टिंग मैथॅड / कैमरा ऐक्टिंग की सबसे सरल और प्रभावी तकनीक “
(शेतकाऱ्यांकडे बघून )
सुरेन्द्र:
बघितलं काय रे ए काय किंमत आहे तुमची ? सगळ्या जगाचा पोशिंदा आहात ना. किडे, मुंग्याना तरी किंमत आहे पण शेतकऱ्याला नाही. तरी म्हणतो बाबाहो शिका, जागे व्हा स्वतःचा माल स्वतः विकायला शिका, उद्योजक व्हा. या असल्या माजोरड्या लोकांच्या नादी न लागता एकत्र या संघटित व्हा आणि आपल मार्केट आपणच निर्माण करा. तु रे .. उद्यापासून तुझ दुकान बंद..कळलं ? यांचा माल कुत्रं सुद्धा घेणार नाही ना बघतो कोण घेत नाही ते . बघू तरी जर शेतकरी नाही तर तुम्ही तरी कसे जागताय ते.
[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
स्कूल /कॉलेज साठी मराठी ड्रामा स्क्रिप्ट |Marathi Drama Script For Children’s
मराठी मूवीज डाउनलोड कैसे करे ?
Marathi Drama Script PDF Free | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ फ्री
Tag: marathi natak new, मराठी ड्रामा ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Drama Script,best marathi natak,मराठी नाटक,new marathi drama,natak in marathi,comedy marathi natak list,marathi natak download,play marathi,marathi drama movies,online marathi natak,upcoming marathi natak,marathi audition script,मी मराठी.