पूर्वकल्पना:
नमस्कार मित्रहो एक झणझणीत आपल्या सर्वांच्या आवडीची मालवणी भाषेतील स्क्रिप्ट घेऊन आलोय खास तुमच्यासाठी ” Marathi Dialogue Script For Audition( मालवणी ) | मराठी डायलॉग स्क्रिप्ट फॉर ऑडिशन ” . रात्रीस खेळ ही मालवणी भाषेतील मालिका तर आपण सर्वानी डोक्यावर उचलून धरली मग विचार करा अश्या प्रकारची एखादी मालिका करण्याची संधी जर का तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय कराल ? ऐन वेळी ऑडिशन साठी स्क्रिप्ट कुठून शोधाल.
तर काळजी करू नका आपल्या या marathiauditionscript.com वेबसाइटवर फक्त मराठी , हिन्दी च नाही तर बऱ्याच रिजनल भाषेतील audition स्क्रिप्ट सुद्धा मिळतात ज्या तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करू शकता ( मराठी नाटक ऑडिशन स्क्रिप्ट pdf ).
या स्क्रिप्ट ची पार्श्वभूमी अशी आहे की , एथे एक मुलगी आणि एक मुलगा एकमेकांवर प्रेम करून लग्न करण्याच्या तयारीत आहेत. डोंघाच्याही घरी ही गोष्ट माहीत आहे. एके दिवशी मुलगा मुलगी दोघेही बाहेर फिरायला गेले असता मुलगा नशा करून पब्लिकमध्ये धिंगाणा घालतो , ही गोष्ट मुलीच्या आईला पटत नाही आणि मुलीची आई रागामध्ये मुलाच्या वाडीलापाशी गेली आहे आणि त्यांना जाब विचारते आहे.
सर्वाना एक विनंती आहे की खाली दिलेल्या ” सोशल मेडिया ” ला लगेच subcribe , follow करून ठेवा कारण नवनवीन अपडेट त्या ठिकाणी दररोज केले जातात. so प्लीज लगेच आम्हाला जॉइन व्हा. तसेच कमेन्ट करून feedback नक्की शेअर करा.
पात्र :
लग्न झालेली स्त्री ( वय ३५ ते ५० वर्ष )
वेळ :
१ मिनिट ३० सेकंद

Marathi dialogue script for audition for female | मराठी डायलॉग स्क्रिप्ट फॉर ऑडिशन फॉर फिमेल
ह्या बघ किती काय झाला ना तरी तुझ्या पोराचा लगीन माझ्या चेडवाबरोबर होवक देवचय नाय, तेव्हा तुझ्या झिलाक सांगान ठेव आजपासून माझ्या चेडंवापासून लांब रवायचा.
कित्या ?…..अरे वर तोंड करून कित्या म्हणान काय इचारतस ? माझा पॉर बिचारा गरीब गाय, तेका सांगल्यान माका कसलाच व्यसन नाय, ना दारू – ना सिगारेट आणि कल दारू पिऊन भर रस्त्यात तमाशा केल्यानं. ह्या लग्नाच्या आधी इतक्या तर मगे काय करतलो ? ता काय नाय दोघांनी प्रेम केलेल्यानी ता समजून घेवन आम्ही लग्नाक तयार झालेलाव पण आता ह्या सगळा बघून आमच्यकडसुन लग्नाक परवानगी नाय.
खरा तर मिया आधीच नाय म्हणान सांगलेलंय. येदासा हुता जन्माक इला तेव्हा . १२ दिस घरात बसलंय नाय बसलंय आठावणा नाय, हेका कपड्यात गुटाळून आम्ही दोघावं लोकांच्या शेतात मजुरेक जावं. झेपत नाय हुता पण काय करतलस, पोटासाठी खय ना खय धडपड कारना भाग हुता. असा पै पै जमा करून तेका लहानाचा मोठा केलाव.
बोलता बोलता कशी २५ वर्षा गेली कळलाच नाय, इतके दिवस आपल्याबरोबर रवलेला पोरग्या दुसऱ्या घरात देतना १०० प्रश्न डोळ्यांसमोर येतंत, कसा होतला , सगळा नीट होयत काय नाय,पोर एकटा तर नाय ना पडाचा.
तुमच्यासमोर हात जोडतंय , मी माझ्या पोराक समजावतय तुम्ही तुमच्या झिलाक समजावा पण ही सोयरीक हयच थांबवा. आम्ही पोरीच्या आयुष्याबरोबर नाय खेळाचावं. किती काय झाला तरी आवशीचा काळीज हा , सगळा समजत आसान् आपल्या पोराक आगीत ढकलूक माका जमाचा नाय. मागासपासून तुमका तोंड सोडून लय काय काय बोललंय, जमला तर मोठ्या मनानं माफ करा पण ह्या लगीन होवचा नाय….येतंय …
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा :
Male Monologues For Auditions | ऑडिशन मोनोलॉग फॉर मेल
(2024)Children’s Monologues For Auditions in Marathi | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन
Marathi Dialogue Script For Audition PDF Free | मराठी डियलॉग स्क्रिप्ट फॉर ऑडिशन पीडीएफ फ्री

Tag: Marathi Dialogue Script For Audition( मालवणी ) | मराठी डायलॉग स्क्रिप्ट फॉर ऑडिशन, Marathi dialogue script for audition pdf, Marathi dialogue script for audition for girl, Marathi audition script for female, Marathi dialogue script for audition for female,Marathi dialogue script,marathi drama script,short marathi drama script pdf,marathi script for audition,audition for marathi serial.