दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download

पूर्वकल्पना:

नमस्कार मित्रहो कॉमेडी करण हे देखील आजकाल खूप जोखमीच काम आहे अस आपण म्हणू शकतो, आता कॉमेडी करण हे जितक कठीण आहे तितकच कठीण आहे कॉमेडी लिखाण करण. आणि अश्यामुळे होत काय .. की बऱ्याच लोकाना स्क्रिप्ट उपलब्ध न झाल्यामुळे किवा तश्या प्रकारच लिखाण न जमल्याने त्यांच अभिनय करण्याच स्वप्न हे राहून जात. पण आता नो टेंशन आपल्याकडे अनेक प्रकारचे स्क्रिप्ट उपलब्ध आहेत. आजची स्क्रिप्ट खास आहे कारण यामध्ये दोन पात्र आहेत, जी तुम्ही तुमच्या सहकलाकाराबरोबर सादर करू शकता.” दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download “. ( Whatspp Channel जॉइन करा )

एक टॅक्सी ड्रायवर पॅसेंजर ची वाट बघत आपल्या गाडीमध्ये बसलेला आहे, बराच वेळ झाला तरी त्याला भाडे मिळत नाही. थोड्या वेळाने एक पॅसेंजर हातात पिशव्या घेऊन गाडीजवळ येताना त्याला दिसते. पॅसेंजर त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी बोलायला लागते.

पात्र :

पॅसेंजर (लेडीज २५-३५ वर्ष ) , ड्रायवर (वय वर्ष २५-४० )

( कॉलेज मधील विद्यार्थी सुद्धा ही स्कीट सादर करू शकतात , वयमर्यादा फक्त पत्रांची ओळख करून देण्यासाठी दिलेली आहे )

Marathi-Comedy-Skit-Script-PDF-Download
दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download

Marathi Comedy Skit Script PDF Download in Marathi | मराठी कॉमेडी स्किट स्क्रिप्ट

प्रवासी : ओ ओ .. शुक शुक…रामनगर ..?
ड्राइवर : नाही , मी दादर .
प्रवासी: नाही नाही ओ, तस नाही .
ड्राइवर : मग कसं ?
प्रवासी: रामनगर ला येणार का ? असं.
           बाकी नक्की तुम्ही ड्राइवरच आहात ना.
ड्राइवर : एक मिन्ट, तुम्ही असं का विचारताय ?
प्रवासी : नाही ते तुम्ही हातात धरून बसला नाही आहात ना.
ड्राइवर : (आश्चर्याने) काय ?
प्रवासी : स्टेअरिंग.
ड्राइवर : हा हा..
प्रवासी : चला मग येताय .(थोडा इशारा करून)
ड्राइवर : नाही नाही ओ मी तसला नाही आहे. मी एक साधा 
            सुसंस्कारी मनुष्य आहे.
प्रवासी : ओ काय बोलताय तुम्ही, मी म्हटलं ना रामनगर ला 
            येताय का म्हणून, तिकड जायचंय मला.
ड्राइवर : हो हो , मी विसरलोच …चला या बसा…एक
            मिनिट…बसू नका ..(गाडीतून बाहेर येतो), रामनगर
            म्हणजे पोलीस चौकीच्या  डावीकडची गल्ली ?
प्रवासी : हो तिथेच, तुम्हाला एवढं अचूक कस माहित ?
ड्राइवर : तुम्ही दुसरी टॅक्सी बघा पण मला सोडा..
प्रवासी :  पण मी तुम्हाला धरलेलाच नाही, मग सोडणार कस .
ड्राइवर : तुमच्या जोकला ना इंजिनमध्ये घालून वरून पाणी
            टाकलं पाहिजे, चांगला धुर निघाला म्हणजे कळेल.ओ  
            म्हणजे तुम्ही दुसरी टॅक्सी पकडा पण मी तिकडे येणार
            नाही.
प्रवासी : अहो पण का ? तुम्हाला आमच्या एरियात यायला का
            नाही आवडत ? एकदा येऊन तर बघा परत मागे   
            जाणार नाही .
ड्राइवर: तेच सांगतोय, अरे अख्ख्या मुंबईत जेवढं ट्रॅफिक नसेल
           तेवढं तुमच्या एरियात आहे. मागे एकदा भाड घेऊन
           गेलेलो बायको म्हणाली अहो उद्या होळी आहे येताना
           पुरणपोळीच सामान घेऊन या (थोड बायकोची ऍक्टिंग
            करत ). मि म्हटलं चला एकच तर भाड आहे तेवढे
            सामानाचे पैसे सुटतील. कुठलं काय होळी
            झाली ,धुळीवंदन झाल तरी मी सिग्नलवरच. पुरणपोळी    
            करायला घेतलेल्या चण्याच्या डाळीला कोंब आले ओ पण
             ट्रॅफिक काही कमी नाही झाल.
           म्हणून सांगतोय पुन्हा तिकडे नको,तुम्ही दुसरी टॅक्सी
         बघा.
प्रवासी : हे बघा अस करू नका ” मी अबला नारी आहे मला
             मदत करा ” (थोड मस्का मारत ..ऍक्टिंग  करत ).
ड्राइवर : तुम्ही अबला ! (आश्चर्यचकित होऊन…चेह्यावर
            आश्चर्याचे तीव्र भाव…डोक्यावर आठ्या ).
प्रवासी : हे बघा प्लीज मला घरी सोडा, आता दुसरी टॅक्सी मला
             मिळणार सुद्धा नाही शिवाय बाहेर उन किती आहे,मी  
             उन्हात काळी झाले तर.
ड्राइवर : आजून ! ( आश्चर्यचकित भाव चेहऱ्यावर)
             नाही नाही म्हणजे बाहेर अजून खूप टॅक्सी आहेत हो.
प्रवासी:  (रडायला सुरुवात करते ) शी बाबा तुम्ही खूप वाईट 
            आहात .एका स्त्री बरोबर कस वागायचं तुम्हाला
            कळतच नाही.(थोड कुजबुज करत काही ना काही
            बडबडते..कॉमेडी करत).
ड्राइवर : ओ बाई ..ओ रडू नका ओ …ओ चार लोक आहेत
            आजूबाजूला, काय समजतील ? त्यांना वाटेल भर
            रस्त्यात मी तुमची इज्जत लुटतोय.(कॉमेडी हातवारे
           करत ).
            खर तर आत्ताची परिस्थिती बघता तुमच्या जागी मी     
            आणी माझ्या जागी तुम्ही हव्या होता..
प्रवासी : म्हणजे ?
ड्राईव्हर : इज्जत खरी माझी लुटली जातेय..ते पण एका  बाईकडून. उठा   
             आधी तिथून…रस्त्यावरून उठा आणी
             गाडीत बसा.
प्रवासी : खुश होऊन …! उठायला लागतात.
ड्राइवर: जास्त खुश होऊ नका (तोंड वाकडं करत…) परिथिती
           हाताबाहेर जाऊ नये म्हणून हा आटापिटा बाकी काही   
           नाही.
प्रवासी : हे बघा तुम्ही जर मला अर्ध्या तासाच्या आत घरी
            सोडलं तर मी तुमची चहा पाण्याची सोय करिन…ते
            काय आहे ना मला लवकर घरी जायचं आहे ना म्हणून
            ही ऑफर …( थोडा लाज नसल्यासारखा चेहरा करत).
            बर पण तुम्ही चहा पिता ना.
ड्राइवर : पितो ?…..ठोसतो म्हणा…म्हणजे चहाच्या बाबतीत  
            माझा हात धरण म्हणजे मौत का कुवा मध्ये जाऊन
            तळ्यात – मळ्यात खेळण्यासारखं आहे.
प्रवासी : ते सोडा हो…
ड्राइवर: नाही सोडा आता नाही सोडा रात्री.
प्रवासी : आ आ ..काही म्हणालात काय?
            ड्राइवर : कोण मी …..ह्या ….नाही बाबा..मी कुठे काय
            म्हणालो.(बोलता बोलता दोन्ही हातानी दारू प्यायला 
            बसायचे हातवारे करतो.
प्रवासी : हे बघा …मघापासून तुम्ही फक्त टाईमपास करताय
            तुमचा जॉब आहे ना हा, जरा तरी सिरीयसली घ्या.
ड्राइवर : तुम्हाला वाटतंय की आपण मघापासून जे करतोय ते
            सिरीयस आहे?…हा सगळा टाईमपासच आहे.
            आणि हे जे बघायला आले आहेत ना ते पण सिरीयस
             बघायला नाही आलेत त्यांना पण टाइमपासच करायचाय. मघाशी
              बघितलं एवढं पोटतिडकीने मोठ्ठ
             वाक्य बोललो तर स्मशान शांतता होती आणि चुकून 
             गुंड शब्दाला **** म्हणालो तर केवढा लाफ्टर.
प्रवासी: आता चला …
ड्राइवर: ओ.. फूस फूस…
प्रवासी : काय …?  फूस फूस काय..?
ड्राईवर : अहो आवाज ऐका …आला ..?
प्रवासी : हो थोडा थोडा येतोय मला.
ड्राइवर : हवा गेली …(थोड कॉमेडी करत..बसल्या जागेवर एक
            पाय वर करत)
प्रवासी : कुणाची ?
ड्राइवर : कुणाची काय कुणाची ? गाडीची.
प्रवासी : आता ?
ड्राइवर : आता काही नाही .. धक्का द्या.
प्रवासी : हा हा ..जास्त शहाणे झाले तुम्ही एकटी बाई दिसली
            की आले धक्का मारायला.
ड्राइवर : ( वरील वाक्य बोलतानाच मध्ये अडवतो) ओ ओ
             तुम्हाला कशाला धक्का मारायला येऊ मी, खाली  
             उतरा आणी गाडीला धक्का मारा.
प्रवासी : अहो माझ्याने होत नाहीये. मी हलते पण गाडी नाही
            हलत आहे.
ड्राइवर : हे बघा, अजूनही तुम्हाला मी सांगतोय तुम्ही दुसरी
            गाडी बघा आणी जा.
प्रवासी : नाही, उशीर व्हायचा तेवढा होऊदे पण मी
            तुमच्यासोबतच येणार.
ड्राइवर : अहो बाई माझी बायको पण माझ्या राशीला एवढी
             लागली नाही जेवढे तुम्ही लागलात. माझं लग्न पण
             एवढ्या लवकर झाल की सकाळी साखरपुढा आणी
             दुपारी लग्न. मी पोहे खायला बसलो तर एका बाजूने
             हळद लावायला चालू केली होती, हळद धुतली नाही
             भडजी काकांनी मंगळाष्टका सुरु  केली. एवढ्या  घाईत
             माझं लग्न झाल त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी पटकन
             करायची सवय झाली आहे . इकडे तुम्ही आहात की 
             2 तास जायचं नाव घेत नाही आहात.
प्रवासी : आता पटकन हवा भरा ..मला घरी जायच आहे.    

  ड्राइवर : हॅलो रशीद भाई….हॅल्लो हा मै गन्या बोल    
             राहा हू, नही वो गाडी पंचर हुवा था, नाही नाही भैस    
            आडवी नाही आली , (नंतर तिच्याकडे बघून) हा 
             म्हणजे….. नाही नाही .. ही भैस कशाला आडवी
             येणार …भैस नाही ….हा हा कुछ तो टोचा है
             जल्दी भेजो किसिको.
             हे बघा बाई पंचरवाला येईपर्यंत १५ मिनिट लागतील
            तेवढा वेळ थांबणार आहात तुम्ही.
             आता तरी जा ना (मनातल्या मनात)
प्रवासी: १५ मिनिटच ना ?.. मी थांबते.
ड्राइवर : बाई मी आजवर हजारो प्रवासी बघितले …पण 
             आजपर्यंत तुमच्यासारखा प्रवासी नाही बघितला.
             एकदा चावी लावून गाडी चालू नाही झाली तर
            दुसऱ्यांदा चावी लावेपर्यंत लोक दुसरी गाडी बघतात.
             तुमच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे. खर सांगा काय  
           मॅटर काय आहे ?
प्रवासी :  खर सांगू …
ड्राइवर : हो सांगा…
प्रवासी : नक्की सांगू…
ड्राइवर : हो आता सांगा…
प्रवासी : मी ….मी…मी…
ड्राइवर : आता एकपात्री करताय…?
प्रवासी : नाही…
ड्राइवर : मग ..सांगा काय ते..
प्रवासी : ते मी चोरी केली आहे.
ड्राइवर : अच्छा…. एवढच ना ….आ चोरी ..म्हणजे ..वावं  
            वावं..पोलिस…ती वाली चोरी…
प्रवासी : चोरी केली आणी तुमच्या गाडीच्या डिक्कीत  माल    
            माल लपवलाय.

ड्राइवर: तुम्ही चोरी केलीय ?.आणी माझ्या गाडीच्या
          डिक्कीत माल लपवलाय ?  तरीच म्हणतोय घरीच
          जायचं तर कस पण जाऊ शकता ना, मलाच का पकडून 
          ठेवलंय.
          तुम्ही आता निघा. ओ बाई (हात जोडून)
प्रवासी : तुम्ही करू नका घाई.
ड्राइवर: ओ ताई..
ड्राइवर : ओ इथे काय गाण्यांच्या भेंड्या चालल्या आहेत.
            तुझ्यावर र आला हा आता तु र वरून गण म्हण,अरे
            बापरे माझ्यावर क आला का ……आ ?
प्रवासी : (गाण म्हणायला सुरु कारते ..) राजसा जवळी असे
             बसा …..
ड्राइवर : ए ..चुप….एकदम चुप…परत गण म्हटलंस ना तर तुला
           पण डिक्कीत टाकेन आणी गाडी उन्हात नेऊन पार्क
           करेन. खालून वरून पत्रा तापला मग कळेल.
           एकतर चोरी केली केली ती केली माझ्या गाडीत आणून
            माल लपवलाय .आता पोलीस येणार आणी चोर
            समजून मला पकडणार. आता एकच झालाय पण
            दांड्याने मारून मारून दुसरा पण तयार पंचर करणार
            (पाठीमागे हात चोळत) . नको बाबा त्यापेक्षा मीच
            पोलिसांना फोन करतो आणी सगळं सांगून टाकतो.
प्रवासी : नको नको असा नका करू.
ड्राइवर: अस नका करू ? हा बघा फोन करतोय…ओ ओ
           पळताय कुठे थांबा ..थांबा…घरी सोडतो…वाचलो  
            बाबा ..कसली खतरनाक ऍक्टिंग केली मी… आणी हो
            हिने खरच चोरी केली असेल का ? नाही ही कसली
            चोरी करणार. तरीपण एकदा खात्री करूनच घेतो….
           (डिक्की उघडतो)..आश्चर्यचाकीत आणी घाबरतो…अरे
            खरंच चोरी केली आहे हिने…..हॅलो पोलीस
            स्टेशन…….
पडदा पडतो……

हे पण वाचा :

2024 फिल्म इंडस्ट्री में कैसे जाये | Actor Kaise Bane – एक्टर कैसे बने पुरी जानकरी

नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF

Best Marathi Comedy Skit Script PDF Download | बेस्ट मराठी कॉमेडी स्किट स्क्रिप्ट पीडीएफ डाउनलोड

Marathi-Comedy-Skit-Script-PDF-Download
Marathi-Comedy-Skit-Script-PDF-Download
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Whatspp Channel

Tag:marathi monologue for male,marathi monologue for female,audition script in marathi for female,marathi audition script pdf,दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download,audition script in marathi,script for audition in marathi for female,monologue script in marathi,marathi script for audition for girl,marathi dialogue for audition,audition script for female.

Leave a Comment