पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो खूप दिवसांनी एक नवीन स्क्रिप्ट तुमच्यासाठी खास Marathi Comedy Audition Script For Female| मराठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल .
या स्क्रिप्ट मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहेत जे एकमेकांवर खूप प्रेम करतात . आज ते दोघेही बाहेर भेटले आहेत आणि मुलगी त्याला लग्नाबद्दल सांगते आहे. या मुलीला लग्न हे थोड मॉडर्न,नवीन पद्धतीच व्हायला हवं आहे आणि त्यासंबंधी तिचे स्वप्न ,विचार ती व्यक्त करते आहे.हा एक comedy monologue आहे जो कुठल्या ही कॉमेडी किंवा नॉर्मल प्रोजेक्ट च्या ऑडिशन साठी सादर करू शकता.
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
पात्र :
मुलगी (वय वर्षं साधारण २२-३०)
वेळ :
१ मिनिट ४६ सेकंद

Marathi Comedy Audition Script For Female Free| मराठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल फ्री
ए सोना ऐक ना मला ना बाकीचे करतात तसं ट्रॅडिशनल पद्धतीने वैगेरे लग्न नाही करायचंय. काहीतरी युनिक करायचंय आणि तसही घरचे मागे लागलेच आहेत, म्हणे ” मुलीच्या जातीने जास्त विचार करत बसू नये ,जे समोरून चांगल येत त्याला हो म्हणायचं ” आता समोरून येणारा प्रत्येक चांगलाच असेल कशावरून ? एरवी सर्व गोष्टींमध्ये १० वेळा विचार करणारी आपली घरची मंडळी याबाबतीत झटकन निर्णय कसा काय घेतात देव जाणे.
ते काही नाही मी आज तुझ्याबद्दल घरी सांगणार आहे, आपण आपल्याला जस हवं तसच लग्न करू. कायम लक्षात राहील अस. ए आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया का ? बोल ना .. ए तू काहीच कस बोलत नाहीस? नेहमीसारखा लग्नाचा विषय निघाला की साहेबांची बोलती बंद, काही प्लॅन्स ,स्वप्न आहेत की नाहीत ?
आजवर मी माझ्या करिअर च्या बाबतीत जेवढी स्वप्न बघितली नसतील तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्तच स्वप्न आपल्या लग्नाबद्दल बघते.
तुला माहित आहे मी ज्यावेळी ९वी मध्ये होते ना तेव्हा टीचर ने विचारलं होते ” बेटा रिना आपको आगे जाकर क्या करना है ” ? तेव्हा मी पुढचा मागचा विचार न करता २ सेकंदात उत्तर दिलं होत ” मिस मुझे शादी करनी है ” अख्खा क्लास पोट धरून हसत होता आणि नंतर माझ्या घरी त्या विषयाला घेऊन माझ्या घरी जे महाभारत झालं ते वेगळं. ना एकादशी ,ना संकष्टी कुठलाही सण वार नसतानाही दिवसभर माझा उपवास घडला होता.
अरे जरा तरी हस, की ठरवूनच आलायस ” की तिने काहीही बोलू दे आपण माठ बनून बसायचं ” . कधीपासून तुला हसवायचा प्रयत्न करते तर साहेबांच काहीतरी वेगळच.
हे बघ आज तूही तुझ्या घरच्यांशी सर्व गोष्टी बोलून घे आणि आपल्या दोघांबद्दल सांग .मला आता फक्त तू, मी आणि आपण प्लॅन केल्याप्रमाणे लग्न … बास्स….या पलीकडे काहीच दिसत नाही.
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
हे पण वाचा:
Marathi Comedy Audition Script For Female PDF| मराठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल पीडीएफ.

Tag:Marathi Comedy Audition Script For Female, कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट मुलींसाठी, funny acting script for girls, मुलींसाठी एकपात्री नाटिका, कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट, girl comedy natak script, comedy script in marathi female, acting script for female audition, विनोदी ऑडिशन सीन महिला साठी,
marathi monologue for girl audition, funny solo script for female,
drama script female character.