पूर्वकल्पना :
राजेश आणि राजनंदिनी …पहिली भेट..
राजेश आणि राजानंदिनी सोशल मीडियावर एकमेकांना ओळखत असतात त्यानंतर हळूहळू ओळख वाढल्याने दोघेही निर्णय घेतात की आपण प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. एक दिवस ते दोघेही एका गार्डनमध्ये भेटायचं ठरवतात दिवस ,वेळ ठरतो ,राजेश खूप उत्सुकतेने आणि आनंदाने घरातून बाहेर पडतो आणि वेळेच्या आधीच काही मिनिट ठरलेल्या जागी पोहोचून राजनंदिनी देण्याची वाट बघत उभा राहतो.
काही वेळाने त्याच्या लक्ष पडतं की समोरून एक सुंदर मुलगी चालत त्याच्याकडे येत आहे, तिच्याकडे पाहतो , हळूच गालात असतो केसावरून हलकासा हात फिरवतो , एवढ्या ती मुलगी राजेश च्या समोर येऊन उभी राहते . Marathi Audition Script PDF Monologue… [नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
त्यानंतर राजेश………
( या स्क्रिप्ट मध्ये फक्त राजेश हे पात्र बोलत आहे आणि राजनंदिनी हे पात्र काल्पनिक आहे )
वेळ :
03:30 सेकंद
Marathi Audition Script PDF Monologue | राजेश आणि राजनंदिनी …पहिली भेट
राजेश: hii. … ( समोरून हाय.. आणि नाव सांगते)
ओ वाव ..राजनंदिनी..nice name. .(नाव तर परफेक्ट जुळतायत ..फक्त मन जुळंली पाहिजेत ,मग झालं !)मनातल्या मनात पूटपुटतो)
नाही नाही…काही नाही…हेच कि नाव खूप छान आहे तुमचं… बाय द वे मी राजेश ..
काय !! नाव आजीन ठेवलं ? ” वा म्हणजे काय योगायोग आहे ना माझं पण माझ्या अजिने च ठेवलं ” , नाही म्हणजे कसं झालं माझी आजी त्याकाळी ‘ राजेश खन्ना ‘ ची खूप मोठी फॅन.एकदा तर माझ्या आजोबांना तोंडावर म्हणाली होती कि ” जर राजेश खन्ना माझ्या लग्नाच्या वेळी भेटला असता तर त्याच्याशीच लग्न केलं असत.”
हा हा हा हा ….
हो तर..खूपच गमतीदार होती..
बाकी घरी कोण कोण असत तुमच्या ?
अच्छा…. माझ्या सुद्धा अगदी तसंच काहीतरी , ‘ म्हणजे मी आई-वडील आणि छोटी बहीण आहे ‘. छोटा परिवार सुखी परिवार नाही का ? हा हा हा हा ….
आणि हो फेसबुक च्या सगळ्या पोस्ट बघितल्यात बर का मी.. like आणि कंमेंट्स चा पाऊस च पडत असतो नुसता..आणि ते सुद्धा प्रत्येक पोस्ट वर !!!
सॉरी बर का ..मि एकदा बोलत बसलो तर बोलत च बसतो..आता आपलं कामं च तसं आहे त्यामुळे बोलण आलंच नाही का ?
बर तुम्ही चहा ,कॉफी काही घेणार? कि जूस मध्ये काही ?
नाही नाही असं कसं?
एकतर पहिल्यांदा,भेटतोय आपण…काही तरी घ्या ना ,प्लीज .
ठीक आहे .. ” तुम्ही 5 मिनटं बसा ,मि आलोच गरमा गरम कांदा भजी आणि कडक चाय घेऊन येतो.”
(बाजूच्या दुकानातून राजेश चहा आणि भजी घेऊन येतो)
हे घ्या ..तुमची आवडती कांदा भाजी आणि हा आहे आल्याचा कडक चहा.
आपला पण फेवरेट मेन्यू आहे बरं का ? ” म्हणजे ढगांवर आदळणारे ते ढग, हलकासा गार गार सुटणार वारा, सूर्य असा ढगांच्या मागे लपलाय ,आणि रिमझिम पडणार तो पाऊस आणि ही सगळ होत असताना किचन मधून येणार तो भजीचा वास, तो वेलची आणि आल्याचा कडक चहा याशिवाय दुसर सुख नाही . “
काय म्हणालात रोमॅंटिक ? नाही हो रोमॅंटिक वैगेरे नाही पण मला असं हलक्या फुलक्या वातावरणात राहायला आवडत.
बर एक विचारू ?म्हणजे आजकालच्या मुलींना हे पिझ्झा,बर्गर चायनीस असे फास्ट फूड आवडतात .नाही म्हणजे मलाही असंच वाटलं होत कि तुम्हाला हि तसच काहीतरी आवडत असेल.असो .. घ्या आधी आपण खाऊन घेऊ नंतर बोलू .
हो हो..म्हणजे..मि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये कामं करतो ,आणि त्यामुळे च म्हटलं कि आम्हाला बोलायची सवय आहे म्हणून्.
बाय द वे तुम्ही काय करता? नाही म्हणजे मला थोडीशी आयडिया आहे पण तरीपण तुमच्याकडून ऐकायचय.
ओ वाव मेकअप आर्टिस्ट..nice जॉब..
आवडेल .. ‘ नाही नाही आवडल असत म्हटल मी की मला सुद्धा मेकअप आर्टिस्ट व्हायला असं. ‘
हे काय लगेच निघायचय ….. नाही म्हणजे जेमतेम 10 मिनिट झाली आपल्याला भेटून म्हणून म्हटल….
बरं ठीक आहे तुम्हाला उशीर होईल ..तर तुम्ही या ..नाही तरी खूप वेळ घेतलाय मी तुमचा .
भेटू परत…
ओके…
बाय..
काळजी घ्या..
[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
मध्यमवर्गीय मुलगी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Script For Audition in Marathi For Female
[100%True]Film Director Kaise Bane|फिल्म डायरेक्टर कैसे बने?Film Director Ki Salary Kitni Hoti Hai?
Marathi Audition Script PDF Monologue | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री
Tag:marathi audition script pdf download free,marathi audition,marathi audition script pdf download,marathi audition script pdf,marathi audition script pdf download free,free marathi audition script,marathi audition update,marathi natak script pdf marathi audition script for female.Marathi Audition Script PDF Monologue.
Wow
खूप खूप धन्यवाद..