पूर्वकल्पना :
नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन स्क्रिप्ट ” Marathi Audition Script PDF Download | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट (हवालदार Monologue) ” ; इथे एक हवालदार ड्युटी नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत असतो आणि अचानक त्याच्या लक्षात येतं की एक गाडी सिग्नल तोडून चुकीच्या दिशेने चालली आहे. अर्थात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाईट घटना घडू शकते त्यामुळे तो हवालदार त्या गाडीकडे बघत शिट्टी वाजवत त्या गाडीला बाजूला येण्याचा इशारा करतो त्यानंतर हवालदार आणि गाडीवरील ड्रायव्हर यांच्यामध्ये होणाऱ्या संवाद… [नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
वेळ:
03:00 मिनिटे
Marathi Audition Script PDF Download (हवालदार Monologue) |Marathi Audition Script For Male
हवालदार:
शिट्टी वाजवत…ए.शू शू शू….ए ए..चला बाजूला घ्या ,बाजूला घ्या …या बघू….हा ..आत्ता कसं..पटपट उतरा बघू ..बोला कितीचा फाईन करू? ” तसं तुमच्या बोलण्याने काही नाही म्हणा पण एक फॉर्मॅलिटी हो बाकी काही नाही.”
असो , गाडीचे पेपर दाखवा ..काय ? ‘ सर्विसिंग करताना घरी ठेवले होते ते अजून घरीच ! ‘ अरे वा..खूप छान..बर लायसन्स ? मित्राकडे राहील? खूप छान .
राम कृष्ण हरी …त्या पांडूरंगाची कृपा म्हणा हो , काहीही नसून सुखरूप फिरताय.अहो मला सॉरी म्हणून काय उपयोग, तुमच्या सॉरी ने सगळं बदलत नसत .
या या इकडे या ..नाही नाही तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही आहे ..या या ..
हा भिकारी दिसतोय ! हा जन्मः ता भिकारी नाही आहे ,चांगला धश्टपुश्ट होता. या या ” गाडीच्या नादातच संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं याच ” ,स्वतः तर जागेवर बसला पण संपूर्ण कुटुंब उध्वस्त केलं.
आता असं कोणी समजून-उमजुन नाही करत हो ,पण शेवटी झालं ना.हे सगळं आमच्या भल्यासाठी नाही , त्या पांडूरंगाने भरपूर दिलय आम्हाला, हे चाललंय ते तुमच्या भल्यासाठी . अख्ख कुटुंब आस लावून बसलेलं असत बाहेर गेलेला माणुस घरी येईपर्यंत निदान त्यांच्यासाठी तरी सुधरा.
आता हे अस काहीतरी आम्ही सांगणार आणि तुमच्यासारखे आम्हाला शिव्या देऊन निघून जाणार, हेच चाललंय आजवर.मोजक्या काही 15 मिनटं अगोदर इथं एक गाडी ट्रक खाली येता येता वाचली , ते सुद्धा वेळीच मि इशारा केला म्हणून,नाहीतर आज परत एक केस, पोलिसांना चौकशी, डॉक्टरांना पोस्टमार्टम करावा लागला असता.
गाडी थांबवून विचारावं तर कुठेतरी मोठ्या पक्षाच नाहीतर व्यक्तिच नाव सांगणार ,आणि मग आमचीच नोकरी जाण्याच्या धमक्या. नको रे बाबा हे सगळं , ‘ बर तुम्हाला कुठे काही फोन करायचंय तर लगेच करून घ्या ‘ नाही म्हणजे आमचा पण वेळ वाया नको ना म्हणून बाकी काही नाही.
बर नको नको माफीनामा नको , आता जे काही सांगितलं ते लक्षात ठेवा म्हणजे झालं.पांडुरंग हरी.
आणि हो फाईन देताय ना , नाही तर माझी मेहनत वाया ..नाही का ? हा हा हा ..बर या मग तुम्ही..आणि हो नीट जा ..हरी हरी..
परत शिट्टी वाजवत..शू ..शू..शू..
[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Audition Script For Girl
मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female
Marathi Audition Script PDF | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ डाउनलोड करा :
Tag: zee marathi audition 2023,sony marathi audition,marathi audition script for female,marathi audition script,marathi audition update,marathi audition script pdf,marathi audition script for male,new audition script for serial.