नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो आजच्या स्क्रिप्ट मध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी स्क्रिप्ट ” नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF “ | एका कंपनीत परमेश नावाचा सिक्युरिटी गार्ड (शिपाई ) काम करतोय, दररोजच्या पेक्षा आज काहीतरी वेगळा म्हणजेच की त्या कंपनीचा मालक कामाच्या वेळेच्या थोडं आधी घरी जायला निघालाय . दररोज वेळेत जाणाऱ्या आपल्या मालकाला रमेशने विचाराचे धाडस केलं की आज तुम्ही वेळेच्या आधी घरी जात आहे, सर्व काही ठीक आहे ना .

मालकाला सुद्धा त्या शिपायाबद्दल थोडा आपलेपणा वाटला आणि तो त्याची विचारपूस करू लागला.. .. .. आणि रमेश त्यांना जमेल तशी ,घाबरत -घाबरत उत्तर देऊ लागला .. आता पुढे……….

Marathi-Audition-Script-PDF
नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF

पात्र :

रमेश (वय २७-३५ वर्ष )

वेळ :

१ मिनिट ३० सेकंद

Marathi script for audition | Marathi One-Act-Play Script

नमस्कार साहेब .. आज लवकर !! नाही म्हणजे तुम्ही रोज वेळेच्या आधी जात नाही म्हणून विचारल , घरी सगळ ठीक आहे ना.

मी कसला लवकर जातोय .. आपली ड्यूटी अजून संपलेली नाही .. हा आणि १२ तास संपले की लगेच घरी . बर या तुम्ही साहेब .

(साहेब बोलतात की तुझ्याशी बोलायच आहे .. तसा रमेश घाबरून )

माझ्याशी बोलायचय ..?

नाही म्हणजे माझ काही चुकल का .. पण काहीच केल नाही मी .. सकाळी पण लवकर आलोय , सगळी काम पण झालीत .. मग ? ? साहेब खरंच काही नाही ओ मी काही नाही केलय . (थोड्या वेळाने शांत होतो )

तुम्ही मला कामावरून काढून तर नाही टाकणार ना ? अस नका हो करू , मी हात जोडतो तुमच्यापुढे .

काय म्हणालात ? कामावरुन नाही काढणार ! मग ठीक आहे .. विचार विचारा काय विचारायच ते .

(साहेब घरच्याबद्दल विचारतात )

माझ्या घरी ! मी, बायको , आई-वडील, आणि छोटीशी मुलगी आहे .

(आर्थिक परिस्तिती बद्दल विचारतात )

काय करणार साहेब कुटुंब आहे म्हणजे जबाबदारी आहे आणि एकदा का जबाबदारी अंगावर आली की झटकून कस चालेल .. नाही का ? हा आता एवढ्याशा पगारात नाही भागत पण काराव लागत काय करणार .

एक विचारू का ? तुम्ही एवढ्या आपुलकिन विचारल तेवढंच खूप आहे माझ्यासाठी, नाहीतर आजकाल आमच्यासारख्या साध्या शिपायाला कोण विचारतय .

कधी कधी खूप पश्चयाताप होतो, का त्यावेळी शिकलो असतो तर आज चांगली नोकरी मिळाली असती. काय करणार घरी दोन वेळच अन्न नाही ते शिक्षणाच तर दूरच राहील. पण साहेब एक मात्र परिस्थितीने शिकवलय किती आणि काही ही झाल तरी खंबीर उभ राहायच.

(advance पैसे पाहिजे असल्याचा अर्जा बद्दल विचारतात )

हो साहेब ते घरी वडिलांची तब्बेत बारी नाहीय, दवाखान्यात न्यायचय त्यासाठी च अर्ज केलाय. मी परत नाही मागणार .. ते आता जरा गरज होती.

(साहेब पैसे पुढे करतात…)

नाही साहेब एवढे नकोत .. मी जेवढे मागितले तेवढेच द्या.

धन्यवाद साहेब.

साहेब गाडी आली तुमची, चला मी गाडीपर्यन्त सोडतो तुम्हाला .

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Marathi Audition Script PDF Free | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री

PDF image 5
Download Now

Tag: marathi natak script pdf free download,hindi audition script for female,Marathi Audition Script PDF Free ,script in marathi for audition,sample script,मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री ,sample scripts,acting scripts for auditions,marathi audition.

Leave a Comment