कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Audition Script For Girl

पूर्वकल्पना :

मित्रहो आजची स्क्रिप्ट खास मुलींसाठी आहे ” कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Script For Girl “ ; एक कॉलेजवयीन मुलगी आहे जी आज घरात सर्वत्र शोधाशोध करते आहे जणूकाही तिची काहीतरी माहत्वाची वस्तु हरवली आहे. घरातील कपाट, बिछाना त्याचबरोबर बाकी खोलीत ती आदळ-आपट करते आहे. तिची आई सुद्धा चिंता करू लागली आहे की माझी मुलगी अशी काय करते आहे. आता पुढे ..

marathi-audition-script-for-girl
कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Audition Script For Girl

पात्र:

कॉलेजवयीन मुलगी (वय वर्ष २३-२६ )

वेळ:

१ मिनिट ५० सेकंद

Marathi Audition Script For Girl | मुलींसाठी सोप्पी ऑडिशन स्क्रिप्ट

मम्मे …मम्मे  अग माझा टॉप भेटत नाहीये. तु कुठे बघितला का ? काय यार इथेच तर ठेवला होता.

अग टॉप शोधयेत ग, परवादिवशी आम्ही मॉल मध्ये गेलेलो ना तेव्हा घेतलेला.
मला चांगलं  आठवतंय की मी आणून इथेच ठेवलेला, शिवाय अजून उघडलेला पण नाही आहे. आज म्हटलं ‘ मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला घालायचा ‘ तर तो भेटतंच नाही आहे.

मम्मे मला माझा ड्रेस पाहिजे आहे. तुला माहिती आहे ६०० रुपये सांगितले होते त्याचे कसाबसा भांडून ५९० ला घेतलाय तो.
मग काय…. आहेच मी काटकसरी चक्क १० रुपये वाचवलेत. आणि  हो नाही वाचवले तरी पप्पा मला काहीच बोलणार नाही कारण मी पप्पाची लाडकी आहे .

बरं त्या टॉप च काय करू ते सांग. तुझ्या कपाटात काही आहे का , म्हणजे एखादा ड्रेस चुकून ठेवला असशील तर दे ना . मला  आता निघायचंय , हाच शोधत बसले तर बिर्थडे पार्टी संपून जाईल तिकडे.

सोड …मी पप्पाकडूनच पैसे घेते, तसही या महिन्याचा पॉकेट मनी बाकी आहे अजून. तुला माहिती आहे माझ्या मैत्रिणींना घरातून किती किती पैसे मिळतात ते? ५०० रुपये ! आणि मला फक्त १०० .
(आजकाल काय येतय १०० रुपयांत …. साधी लिपस्टिक पण नाय येत १०० रुपयाला ..१०० रुपये देतात मला. ..मला नको ते ठेवा तुम्हालाच –थोड स्वतःशीच कुजबुजत)

पप्पा मला पैसे हवेत ….ते एक अर्जेन्टमध्ये एक ड्रेस घ्यायचा आहे. मी ऑलरेडी घेतला होता पण आता भेटत नाही आहे.
ओ ओ बबन शेठ कुठे चाललाय असे सजून-धजून आणी हे काय आहे डोक्याला ? ( तिचा भाऊ छान तयार होऊन बाहेर चालला आहे ) …. कानटोपी? एक मिनटं इकडे बघ बघू . अरे माझा टॉप आहे हा , तु कानटोपी म्हणून वापरतोस. अर्धा तास झाला शोधतेय मी . चेहऱ्यावर बारा वाजवू नकोस, आण तो टॉप इकडे.
आई माझा टॉप भेटला बघ, हा बघ कानटोपी म्हणून घालून जात होता.

Marathi Audition Script For Girl Free PDF | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर गर्ल फ्री पीडीएफ

Marathi-Audition-Script-For-Girl
Marathi-Audition-Script-For-Girl
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: Marathi audition script for girl pdf free download,Marathi audition script for girl online,Marathi audition script for girl pdf,marathi audition,auditionscript,girls audition script,marathi audition script.

Leave a Comment