Marathi Audition Script | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवीन ऑडिशन स्क्रिप्ट खास तुमच्यासाठी ” Marathi Audition Script | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट “ , मित्रांनो या स्क्रिप्ट मध्ये एक मुलगा किंवा पुरुष व्यक्ती आहे ज्याचा प्रेमभंग झालेला आहे आणि त्याच्या प्रियसीच आज लग्न आहे. तरीही व्यक्ती थोडीशी भाऊ झाली असल्यामुळे स्वतःला, देवाला, त्याचप्रमाणे तिच्या प्रियसीला जाब विचारते किंवा स्वतःची समजूत स्वतः काढायचा प्रयत्न करते आहे.

मित्रहो जर तुम्हाला आम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेल्या स्क्रिप्ट आवडत असतील तर खालील दिलेल्या सोशल मीडिया चॅनेलवर आम्हाला नक्की फॉलो करा त्याचप्रमाणे आमच्या स्क्रिप्ट जर तुम्ही कुठे परफॉर्म केले असेल आणि तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले असतील तर आमच्याशी फीडबॅक नक्की शेअर करा.. धन्यवाद..

[ Follow:  Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]

पात्र :

मुलगा/पुरुष ( वय वर्ष २० -३० – ४० ) थोड फार फरक असू शकतो

वेळ :

१ मिनिट ५० सेकंद

marathi-audition-script
Marathi Audition Script | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

Marathi Audition Script For Boy/Male | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट मेल

छान जमत (थोडा पॉज )… छान जमत काहीना ब्रेकअप करण… ब्रेकअप च्या नावाखाली आपल्या जवळच्या माणसांना दूर करण….छान जमतय.

नाही मी दुःखी नाहीये हा … (डोळे पुसल्यासारखं करत) …दुःखी नाहीये. उलट आनंदीच आहे. तुझं लग्न आहे आज, आणि हो आपल्याच प्रेयसीच्या लग्नात आनंदाश्रु येण हे बाकी दुनियेसाठी काही नवीन नाही पण माझ्यासाठी मात्र आहे हा. का माहिती आहे ? कारण एरवी या ना त्या कारणावरून प्रत्येकाशी वाद घालणारी , संशय घेणारी तू आज अगदी आनंदाने बोहल्यावर उभी राहशील.

खरं सांगू… मेंदूला कसबस समजावलय पण मनाच काय ? ते धावतय जुन्या आणि मळलेल्या पायवाटा शोधत. बरं का .. सर्वच वाटा आशा योग्य दिशेने नाही जात, काही दिशाभूल करणाऱ्या सुद्धा असतात.(थोड छातीकडे बघत..मनाला समजावतोय )

मग अशा वेळेस आपण काय कराव ..तर स्वतःच्या वाटा निर्माण करायच्या ज्या दिशभूलही करणार नाहीत आणि आपल्याला योग्य त्या ध्येयापर्यंत पोहोचवतील.

तुझं पण बरोबर आहे .. नाही म्हणजे सर्वांनी ठरवलेली ध्येय पूर्ण व्हायला लागली तर जगण्यासाठीची धडपड ती काय उरेल ? ठेचून टाकायची सगळी ध्येय ,सगळी स्वप्न.( स्वत:शीच थोडी चिडचिड करत )

सांग ना काय चुकलं होतं माझं ,जन्मभर फक्त तिचा हात मागितला होता रे . तेवढा दिलास असतास तरी अजून काहीच मागितलं नसत तुझ्याकडे.(वर देवाकडे बघत). नाही म्हटलं तरी गरिबी प्रेमाच्या आड येतेच,  हे वाक्य कुठेही लिहून ठेवलेलं सापडणार नाही पण अलिखित सत्य आहे हे मात्र खर.नाहीतर आपल्या माणसाला विसरायला भाग पडेल अशी एकही गोष्ट कुठे लिहून ठेवलेली मला तरी आठवत नाही.

” प्रेमात पडलो वाटल जग जिंकलो,
तुझ्या गोड आठवणींत हरवून गेलो,

अस वाटल हा आठवणींचा गोडवा आयुष्यभर चाखायला मिळेल,
पण नकळत तुझ्यापासून दूरच होत गेलो “

असो,.. प्रेमभंगातून नवा कवी किंवा लेखक जन्माला येतो म्हणतात ते काही खोट नाही.चला मुहूर्ताची वेळ निघून जाईल..

हे सुद्धा वाचा:

Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ

Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी

Marathi Audition Script PDF Download Free | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ डाउनलोड फ्री

marathi-audition-script
marathi-audition-script
Download Now

Tag: marathi audition script,Marathi audition script pdf download,Marathi audition script for male,Marathi audition script for girl,Marathi comedy script for audition,Audition script in,marathi for female,Marathi drama script pdf,Marathi natak script pdf,Short comedy marathi natak script pdf.

Leave a Comment