पूर्वकल्पना:
नमस्कार मित्रहो आजची नवीन स्क्रिप्ट खास तुमच्यासाठी ” Male Monologues For Auditions | ऑडिशन मोनोलॉग फॉर मेल “. आजच्या आपल्या गोष्टीमध्ये दोन मित्र आहेत जे एकमेकांचे खूप जिवलग आहेत. काही कारणास्तव दोघांच आधीच्या रात्री फोनवरुण भांडण झालय. दुसऱ्या दिवशी हे दोघे एकमेकाना भेटायच ठरवतात. एक जागा ठरली आहे , दोघेही ठरल्या वेळी तिथे एकत्र पोहोचले आता पुढे..
पात्र:
मित्र ( वय वर्ष २२-३० वर्ष )
वेळ:
१ मिनिट ४० सेकंद
Short Male Monologues For Auditions | शॉर्ट मेल मोनोलॉग फॉर ऑडिशन
या या या …या सर या तुमचीच वाट बघत होतो,अगदी रोखठोक भाषेत सांगायचं झाल तर ” एखाद्या रक्कामटेकड्याला कुठेतरी नौकरीची आस असावी, मृगजळाला कस्तुरीची आणि तशीच मला तुमची. कालचा तो फोन काय फक्त अपशब्द आणि शिवीगाळ करायच्या उद्देशानेच केला होता की काय ?, …नाही..मला तरी तसच जाणवलं …किंबहुना वाटलच.
मित्राने पडत्या कळात केलेली मदत, मित्राची उदारी, संकटात दिलेला तो मदतीचा हात हे क्षणभर देखील आठवलं नाही तुला. नात हे माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुला देखील माहिती आहे, मग याचं नात्यावर अविश्वास दाखवताना तुला काहीच वाटलं नाही.
कुणाच्यातरी तिसऱ्याच्या सांगण्यावरून तु आपल्या मैत्रीवर संशय घेतलास. काय तर म्हणे मी तुझ्या प्रेयसीला फोन करून तुझ्याबद्दल भडकवल. सॉरी हा माफी असावी….प्रेयसी नाही गर्लफ्रेंड.
कोण कुठली ती मुलगी तिला भेटून चार दिवस नाही झाले तर तिच्यापुढे मित्राची काहीच किंमत नाही. या मागच्या ८-१० वर्षांच्या आपल्या मैत्रीची किंमत तु फक्त चार दिवसांत ठरवलीस. शेवटी हे नात आहे रे मग ते मैत्रीच असो वा अन्य त्यात रुसवे,फुगवे,राग,लोभ सर्व काही असावं पण अविश्वास ! तो मात्र नसावा आणि नात्यात एकदा अविश्वासाच बीज रुजून आल की त्याची पाळ,मूळ आजूबाजूच सर्व नष्ट करून टाकतात.
खूप राग आला होता काल रात्री तुझा, अस वाटलं आताच्या आता जावं आणी दोन कानाखाली ठेवून द्याव्यात, तसा निघालोहि होतो पण नंतर आठवलं बाईक तुच घेऊन गेलेलास परवा तिला भेटायला. खूप रडलो, कधी नाव पण न घेणारा मी काल वाटलं लोक डोक्याचा भार कमी करण्यासाठी दारू पित असतील तर आज ती मला प्यायची आहे.
डोक बधिर झालेलं. काय करू मित्र मानतो रे तुला ,म्हणून आज नेहमी उशिरा येणारा मी ठरलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास तुझी वाट पाहत होतो. कधी एकदा तुला भेटतोय आणि माझं मन मोकळ करतोय अस झालेलं. माझ्या मनात जे होत ते मी बोलून टाकल, एक मित्र म्हणून माझी साथ नेहमीच असेल बाकी तुझ्यावर आहे. बस एवढच सांगायचं होत.बाकी तु समजदार आहेस.
हे पण वाचा:
१) एकदम जबरदस्त मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Male
२) Marathi Serial Audition For Male And Female|गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ऑडिशन स्क्रिप्ट
Male Monologues For Auditions PDF Free | मेल मोनोलॉग फॉर ऑडिशन फ्री पीडीएफ
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Male Monologues For Auditions, ऑडिशन मोनोलॉग फॉर मेल, Short male monologues for auditions, Male monologues from plays,2 minute monologues for males, 1 minute dramatic monologues for males, Male monologues for auditions pdf, Male monologues for auditions from movies, Marathi audition script, Marathi audition script for male.