Female Audition Script | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी

पूर्वकल्पना :

मित्रहो आज मी आपल्यासाठी अजून एक स्क्रिप्ट घेऊन आलोय ‘ Female Audition Script ‘. एक मुलगी आहे जिला कोणीतरी किडनॅप केलेल आहे, तसेच तिच्यावर अमाणुशपणे अत्याचार करत आहे, तिचा छळ करत आहे. या सर्व परिस्तितीत त्या मुलीची एकच विनंती आहे की मला सोडा ,अस कृत्य नका करू.

आमच्या स्क्रिप्ट जर तुम्हाला आवडत असतील तर खाली कमेन्ट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया जरूर कळवा.

पात्र :

मुलगी ( वय वर्ष २० -३० )

वेळ:

१ मिनिट २५ सेकंद

Female-Audition-Script
Female Audition Script | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी

Short Female Audition Script In Marathi | महिलांसाठी खास, अंगावर शहारा आणणारी ऑडिशन स्क्रिप्ट

नाही नाही ….नको …नको …नकोरे दादा हे कृत्य नको करूस….. नको करुस हे… मलाही आयुष्य जगायचंय. ..(रडत).. तुझ्या क्षणिक सुखासाठी माझं आयुष्य का बरबाद करू नकोस .ए थांब कुठे चाललायस ….थांब ..मला या अवस्थेत सोडून असा निघून जाऊ नकोस. माझे आईवडील घरी वाट बघत असतील रे, माझे सगेसोयरे माझ्या शोधात असतील रे.

जा तु निघून जा ..निघून जा इथून …का थांबशील आता ?…झाला ना, तुला जे करायचं होत ते करून झाल. मिळाली असेल ना तुझ्या जीवाला शांती. जा आणी सांग सगळ्यांना जिवंत आहे, अजून मेली नाहीये म्हणावं. वासनेच्या अधीर झालेल्या झालेल्या राक्षसांना द्या सोडून माझ्यावर.

मीही कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, माझा अधिकार असा हिरावून घेऊन काय मिळणार आहे तुला? जा असाच जा माझ्या बापाच्या उरातील हुंदके सांगतील तुला जगण्याचा अर्थ, बघ माझ्या आईच्या डोळ्यात ‘ तिच्या डोळ्यांतील अश्रू सांगतील तुला मायेच महत्व. बघ ते घराच्या दारात आतुरतेने वाट बघत बसलेलं माझं कुटुंब.

राहवत नाहीये म्हणून एक प्रश्न विचारू , तुझ्या मनातील उफाळून आलेली वासना संपली का रे…? आणी नसेल तर ये आणी संपव तुझी वासना, कारण माझ्यासारख्या हजारो माझ्या बहिणी बाहेर आहेत त्यांच्या वाटेला जाऊ नकोस, त्यांचं आयुष्य बरबाद करू नकोस. जगले वाचले तर देवाची कृपाच , नाहीतर एक विनंती आहे . मेल्यावर तरी या देहाची विडंबना नको करुस जेणेकरून बघणाऱ्याला त्याच्या जिवंत असण्याची लाज वाटेल.

हे पण वाचा:

स्कूल /कॉलेज साठी मराठी ड्रामा स्क्रिप्ट |Marathi Drama Script For Children’s

फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

Female Audition Script PDF Free | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री

Female-Audition-Script
Female-Audition-Script
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag : Short female audition script , Dialogue Script for Audition in Hindi,Female audition script pdf,Female Audition Script in Hindi, Female Audition Script | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी ,Hindi Monologue Script Female,Female audition script in english,Monologue Script in Hindi, Marathi Audition Script.

Leave a Comment