पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो घेऊन आलोय एक नवीन स्क्रिप्ट एका नवीन कॉन्सेप्ट वर खास फक्त तुमच्यासाठी.Emotional Audition Script in Marathi | इमोशनल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी
या स्क्रिप्ट ची पार्श्वभूमी अशी की एक लग्न झालेला मुलगा आणि त्याचे म्हातारे वडील.मुलाने वडिलांना १० वर्षापूर्वी आश्रमात आणून सोडलेले आहे आणि त्यानंतर तो कधीही त्यांना भेटायला आला नाही. आज अचानक सकाळी तो मुलगा त्यांना भेटून गेला, नंतर आश्रमातील सर्व मित्रमंडळींसोबत आजोबा व्यायाम करायला मैदानात आले आहेत. त्याचे डोळे काहीसे पाणावल्यासारखे दिसल्याने सर्व मित्रांपैकी एकाने त्याचे कारण विचारले…त्यावर आजोबा व्यक्त होतात…आता पुढे…
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
पात्र :
आजोबा, म्हातारी व्यक्ती (वय वर्षं साधारण ६०-८०) / कुणीही सादर करू शकता.
वेळ :
१ मिनिट ५० सेकंद

Emotional Audition Script in Marathi For Male| इमोशनल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फॉर मेल
काय गणोपंत आज उशीर झाला उठायला … काल रात्री रात्री डोळ्यावरची झोप उडून जावी म्हणून गुपचूप घेतलेला कोरा चहा जास्त झाला की काय ..हा हा हा ..
असो बाकी काही सकाळच्या व्यायामाला उपस्थित राहिलात हे महत्वाच नाही का .चला मग आता सूर्य अजून वर यायच्या आधी व्यायामाला सुरुवात करूया.
काय डोळे..? (कुणीतरी समोरून विचारण्याचा आभास) नाही ओ..माझे डोळे कशाला पाणावलेत ? उगाच आपलं काहीतरी. चला व्यायामाला उशीर होतोय. (थोड इग्नोर करत )
हो खरं आहे तुम्ही बोलताय ते… मुलगा आला होता मला भेटायला. कित्येक वर्षांनी आज या बापाची आठवण झाली असावी. त्या साफसफाईवाल्या पोरीने येऊन सांगितलं तुमचा पोरगा आलाय अस वाटलं माझ्या काळजी पोटी, माझी विचारपूस करायला आला असेल म्हणून पण कसलं काय पोटच्या पोरांपेक्षा कधी कधी वाटतं ही पोर तरी बरी ना कुठला स्वार्थ की ना कुठली अपेक्षा.
सही घेण्यासाठी आला होता त्याला वाटल मी अचानक गेलो तर नावावरची जमीन हातातून निघून जाईल म्हणून. १० वर्ष झाली या आश्रमात सोडून गेल्यावर पण एकदातरी म्हातारा मेलाय की जिवंत आहे याची चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही त्याला.
सुरुवातीला वाटायचं हे अस दिवस ढकलून जगण्यापेक्षा एकदाच मरण आलं तर पिढा निघून जाईल कायमची त्याच्याही डोक्यावरची आणि माझ्याही. सुदैवाने तुमच्यासारखे मित्र मिळाले , इथे प्रत्येकाकडे काहीना काही दुःख आहे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा संघर्ष करतोय. तसही संघर्ष काय कुणाला चुकलाय का..? पण या काळात जर आपली माणसं सोबत असतील तर शुल्लक वाटतो.
त्यामुळे विसरून जायच्या या कटू आठवणी आणि उरलेल्या या तुटपुंज्या आयुष्यात नव्याने आठवणी निर्माण करायच्या. काय..!
चला आता व्यायाम करूया की आज फक्त गप्पागोष्टीमध्येच दिवस काढायचाय. हा हा हा …(डोळे पुसत… आनंदाश्रु..हसत).
[ Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
हे पण वाचा:
Emotional Audition Script in Marathi PDF Download | इमोशनल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ डाउनलोड

Tag: Emotional Audition Script in Marathi | इमोशनल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी,भावनिक नाटक स्क्रिप्ट, भावनिक ऑडिशन डायलॉग, Marathi Natak Script Emotional, Emotional Marathi Dialogue, भावनिक संवाद मराठी, Marathi Drama Script for Audition, Marathi Monoact Script Emotional, भावनिक एकपात्री संवाद, Marathi Emotional Speech Script, Marathi Theatre Script Emotional, भावनिक ऑडिशन सीन, Marathi Emotional Scene for Practice