Ekpatri Natak Script in Marathi PDF (Audition)| मराठी एकपात्री ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो परत आलोय आणि ते सुद्धा एका नवीन स्क्रिप्ट सोबत ” Ekpatri Natak Script in Marathi PDF (Audition)| मराठी एकपात्री ऑडिशन स्क्रिप्ट ” ; इथे एक मुलगा आहे जो लग्नाच्या वयाचा आहे, घरात आईवडिल आणि तो असा परिवार आहे . मुलाचा स्वभाव खूप तापत आहे तो सतत आईवडिलांना उलट सुलट बोलत असतो. मध्यमवर्गीय आईवडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या लग्नाचा विषय काढतात त्यावेळी मुलाला खूप राग येतो तो त्यांना उलट सुलट बोलू लागतो.

पात्र :

मुलगा ( वय वर्ष २५-३० )

समय:

२ मिनिटे

Ekpatri-Natak-Script-in-Marathi-PDF
Ekpatri Natak Script in Marathi PDF (Audition)| मराठी एकपात्री ऑडिशन स्क्रिप्ट

2 Minute Ekpatri Natak Script in Marathi PDF| मराठी एकपात्री नाटक स्क्रिप्ट pdf

बाबा… काय लावलंय संस्कारी संस्कारी , आजकाल काही नाही मिळत संस्कारी बनून. तुमच्या जमान्यातलं नऊवारी ,सहावारी, डोक्यावर पदर सगळं गेल हा , लुप्त झाल्या त्या गोष्टी. जमाना शॉर्ट्स वर आलाय आज, संस्कारी सुन पाहिजे म्हणे.
काय करणार आहात संस्कारी सुन करून, तुमची सेवा आणि घरची काम करायला लग्न नाही करायचंय मला, खूप स्वप्न आहेत माझी आणि ती इथे तुमच्यासोबत राहून मातीमोल नाही करायचीत मला.

(थोडा शांत होत) मला जशी हवी तशी मुलगी मी बघितली आहे आणि काहीच दिवसांत आम्ही दोघ लग्न सुद्धा करणार आहोत त्यामुळे प्लीज तुम्ही आणि आई माझ्या लग्नासाठी मुलगी शोधन थांबवा.

स्वीटी … नाव आहे तिच, एकुलती एक, लाडात वाढलेली तुमच्या अख्ख्या तीन पिढ्यानी जेवढं उभ्या आयुष्यात कमावलं नसेल तेवढं ती महिन्याला खर्च करते,कळलं ? आणि तसही तिच्यासोबत एक बंगला, गाडी नोकर चाकर सुद्धा लग्नानंतर जावयालाच
मिळणार आहेत.

खरं तर या एवढ्याशा घरात राहून कंटाळाच आलाय, ना धड बसायला जगा ना झोपायला. घेऊन घेऊन घेतलं, निदान पुढचा मागचा विचार करून तरी घ्यायच होत.

बर हो तुमच्या माहितीसाठी सांगतोय आम्ही लग्न मोठ्या हॉलवर ठेवणार आहोत, तेव्हा हे मळक बनियन, फाटकी साडी असलं काहीतरी घालून आलात ना तर हलकवून देतील त्यामुळे निदान समोरच्या माणसांसोबत नजर मिळवून बोलू शकू इतक्या दर्जाचे तरी कपडे घेऊन ठेवा.

*****अॅक्टिंग शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तके/ कादंबरी : ” ययाति – वी.एस. खांडेकर “*****

मी तर म्हणतो नाही आलात तरी हरकत नाही , निदान त्या लोकांसमोर माझा इन्सर्ट तरी नाही होणार. ह ह..(हास्य)
आणि हो काल त्या जोशीना काय सांगत होता, मुलाला काही पडलेली नाही, बापाच्या कष्टाची किंमत नाही. मूल जन्माला घातली की त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही आलीच , तीन वेळच खायला दिल ,दोनचार कपडे घेतले , मजबुरीच्या नावाखाली शाळेत घातलं की तुम्ही हे केल ते केल करत डंखा वाजवायला मोकळे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सर्व प्रत्येकजण आपल्या मुलासाठी करतात त्यामुळे दुनियेला सांगत बसायची काहीही गरज नाही आहे. [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे सुद्धा वाचा:

Monologues For Young Men in Marathi| पुरुषांसाठी ऑडिशन स्क्रिप्ट

Monologue in Marathi( Malvani ) | मोनोलॉग इन मराठी /मालवणी

Ekpatri Natak Script in Marathi PDF

Ekpatri Natak Script in Marathi PDF Free| एकपात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी फ्री

Ekpatri-Natak-Script-in-Marathi-PDF
Ekpatri Natak Script in Marathi PDF
Download Now

Tag: Ekpatri Natak Script in Marathi PDF (Audition)| मराठी एकपात्री ऑडिशन स्क्रिप्ट, Ekpatri natak script in marathi pdf free download, marathi drama script, marathi natak script, natak script in marathi, ekpatri natak script in marathi, एकपात्री नाटक script, short marathi drama script pdf, marathi natak script for students ,marathi natak script pdf free download, मराठी नाटक स्क्रिप्ट pdf, natak script, marathi audition script.

Leave a Comment