पूर्वकल्पना:
नमस्कार, मित्रहो आज मी आपल्यासाठी एक सुंदर स्क्रिप्ट घेऊन आलोय ” Ekankika Script in Marathi(Audition )| मराठी एकांकिका स्क्रिप्ट ” ; आपण सर्वनिच वासुदेवा बद्दल ऐकलेल आहे, सकाळच्या प्रहरी वासुदेव घरी यायचे सर्वाना आशीर्वाद द्यायचे आणि आपल्या आईने दिलेला शिधा घेऊन ते पुढे निघून जायचे | तसेच एक वासुदेव आज आपल्याला भेटायला आलेले आहेत; म्हणजेच आपल्या स्क्रिप्ट मध्ये आलेले आहेत. एक घरासमोर ते आले आहेत त्या घरातील सुहासिनी स्त्री अंगणात काहीतरी कामं करत आहे .
वासुदेव आलेत म्हटल्यावर त्यांची यथाशक्ति सेवा करण्यासाठी ती स्त्री पुढे येते आणि नंतर त्या दोघांमध्ये घडलेल संभाषण.. आता पुढे .. ( विनंती: खाली सोशल मेडिया लिंक दिलेले आहेत ,कृपया स्क्रिप्ट वाचून झाल्यावर जॉइन ,subcribe आणि फॉलो करायला विसरू नका अन्यथा नवीन अपडेट तुमच्यापर्यन्त आम्ही पाठवू शकणार नाही .नुकतेच आपल्याला whatsapp चॅनल ला ५० followers पूर्ण झाले आहेत. )
पात्र :
वासुदेव ( वय वर्ष ३०-५० ), इतर सुद्धा करू शकतात
वेळ :
१ मिनिट ४० सेकंद
२ Minute Ekankika Script in Marathi For Male | मराठी एकांकिका ऑडिशन स्क्रिप्ट
वासुदेव आला हो वासुदेव आला …
वासुदेव आला हो वासुदेव आला…..
सकाळच्या पारी मुखी रामनाम बोला….
वासुदेव आला हो वासुदेव आला….
(रामनाम सुरु आहे…एवढ्यात समोरून एक स्त्री येऊन पाया पडल्याचा आभास… मुखी जप सुरु आहे …हातानी तिला आशीर्वाद देण्याची कृती)
वासुदेव आला हो वासुदेव आला…..
तथास्तु माई. ..सौभाग्यवती भव..सुखी राहा …इच्छित मनोकामना परिपूर्ण होवोत … माई तुझ्या डोळ्यांत हे अश्रू ! सकाळच्या पारी घरच्या लक्ष्मीला हे शोभत नाही, इतकं सगळं सुंदर सुरु असताना कुणी साधूसंतासमोर असे अश्रू ओघळणे हे कितपत योग्य आहे माई.
मला सांग काय समस्या आहे तुझी ? घरच्या लक्ष्मीन कस हसत राहावं, स्वतःच दुःख पदराच्या आड लपवून कुटुंबाच संगोपन करावं. काय समस्या आहे तुझी, मला सांग उपदेश करण आमच्यासारख्या साधूसंतांचं काम आहे.
माई, सुख-शांती ,आरोग्य-ऐश्वर्य चांगल लाभण हे आपल्या कर्मावर अवलंबून असत बघ. चांगल कर्म कराल तर फळ देखील चांगलंच मिळेल.
मला जे दिसतंय तेच मी सांगतोय बघ, माझ्या रूपात तोच तुला उपदेश करतोय अस समज. माई संतती प्राप्ती अथोनाथ प्रयत्न करतेस हे दिसतंय आम्हाला, नवरा बायकोन कस लक्ष्मी- नारायणासारखं राहावं, सुखान संसार करावा; तुझ्या बाबतीत मात्र हे चित्र उलट दिसतंय बघ. घाबरू नकोस तुझ्या नशिबात पुत्रप्राप्तीचा योग आहे . हे घे आणि देवघरात ठेव, सकाळी- सायंकाळी बत्ती-वात करून मनातील इच्छा व्यक्य करत जा. तुझ्या मनातील इच्चित मनोकामना लवकरच परिपूर्ण होईल.
*****अॅक्टिंग सुधारण्यासाठी पुस्तक : ” मराठी नाटक आणि रंगभूमि “*****
(जेवण्याचा आग्रह करते) माई आपली इच्छा मी समजू शकतो परंतु आम्ही कुणाच्याही वास्तुमध्ये ना वास्तव्यास राहत ना ही भोजन करत, आम्ही फक्त कोरड्या शिध्याचे मानकरी. कोरडा शिधा असेल तर आमच्या या झोळीमध्ये द्या हाच आमचा मान सन्मान.
आयुष्यमान भव. ..सुखी राहा…माई त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि मुखात रामनाम जपा …बोला वासुदेव आला हो वासुदेव आला …सकाळच्या पारी रामनाम बोला …..
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा:
दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download
मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male
Ekankika Script in Marathi PDF Free | एकांकिका स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ फ्री
Tag: Ekankika Script in Marathi(Audition )| मराठी एकांकिका स्क्रिप्ट, Ekankika script in marathi pdf free, Ekankika script in marathi pdf, Ekankika script in marathi for students, Solo act script in Marathi, Marathi Drama Script for children’s, Marathi film script PDF free, Marathi Audition Script, मराठी एकांकिका ऑडिशन स्क्रिप्ट, एकांकिका ऑडिशन स्क्रिप्ट.