पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो, राम राम, जय महाराष्ट्र आज मी तुमच्यासाठी खास Marathi Audition Script घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे Drama Script in Marathi | ड्रामा स्क्रिप्ट ऑडिशन इन मराठी . या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एक मनुष्य दिसतोय जो आपली माणस, सगेसोयरे सर्व सोडून पैसे कमवायला गेलाय. काही वर्ष उलटले आहेत आणि आता त्याच्याकडे भरपूर संपत्ति, पैसा आहे पण सुख नाही हे सर्व पाहून तो विचार करतोय आणि स्वतच्या जगात हरवून गेलाय.
” सुरू करण्यापूर्वी एक विनंती कृपया वाचून झाल्यावर खाली कमेन्ट बॉक्स आहे तिथे आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, कारण तुमची एक कॉमेंट आम्हाला अजून काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते. “
पात्र:
मध्यवर्गीय माणूस ( वय २६-३५ वर्ष )
वेळ:
१ मिनिट २० सेकंद

Best Drama Script in Marathi | बेस्ट मराठी ड्रामा ऑडिशन स्क्रिप्ट
कुठे आहे मी ?.. कुठे आहे ? वाट भरकटलो असेन की काय ? पण नाही कारण वाट निवडणारा मीच होतो. आई वडील ज्या वाटेवर चालायला लावत होते, ज्या वाटेची दिशा ते दाखवत होते ते मला नको होत. नको होत त्यांच जुन- गंजलल आणी घासून घासून संपत चाललेल्या अनुभवाचं ओझं. त्यांची जुनी विचारसरणी , त्यांचा तो साधेपणा, ती जगण्यासाठी केलेली तडजोड या सगळ्या बाबी मला तिथून दूर जाण्यास कारणीभूत होत्या का ?
बस ….घाबरलोय मी सरबरलोय . काय करायचं हे सुचत नाहीये. स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना बाजूला सारून ज्यांना आपलं मानल त्यांनीच पाठीत खंजीर खुपसावं. हे डेव्हलपमेंट आणी विकास या दोन शब्दांमध्ये मी पुरता अडकून गेलोय. संपत्ती, पैसा आणि प्रसिद्धी याचं काय करू . अस वाटत हा चुकीच्या दिशेने चाललेला प्रवास थांबवावा इथेच आणी संपवून टाकावं सगळं, पुन्हा नव्याने सुरुवात करावी ती सुद्धा माझ्या जिवाभावाच्या माणसांना सोबत घेऊन.
पण मला ते आता जवळ करतील ? मला आपलं मानतील ? हो नक्की करतील माला आशा आहे नक्की मला ते माफ करतील. मि जरी माणुसकी हरवून एखाद्या दगडाप्रमाणे वागलो असेन तरी शेवटी आपला माणूस समजून ते पडत्या कळात साथ देतील. पण कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ, माझ्यासारख्या लाज विकून खाणाऱ्या नराधमाची लायकी तरी आहे का त्या सज्जन माणसांसमोर उभ राहण्याची.
कुणी आहे का रे आजूबाजूला ? मला या अंधाररूपी मायाजालातुन बाहेर काढा रे, मला साधं सोप जगणं जगायचंय . मला हे पुस्तकी ज्ञान विसरून पुन्हा ते अनुभवाचे ज्ञान आत्मसाद करायचंय.
(थोडासा वेडेपणा) नको हा पैसा ..नको ..ही संपत्ती ..संपत्ती..नको मला .नको….मला बाहेर पडायचंय ….या सगळ्या मोहमायेतून बाहेर पडायचंय …हात द्या रे कुणीतरी , मी घुसमटतोय …हात द्या रे …मदतीचा हात द्या…( आणी बेशुद्ध होतो).
हे सुद्धा वाचा:
Marathi Monologue Script For Audition| मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट
Where Did The Name Bollywood Come From | बॉलीवुड शब्द कहासे आया,Top 5 Film Industry
Drama Script in Marathi PDF Free | ड्रामा स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ फ्री

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Short drama script in marathi, Drama script in marathi pdf download, Drama script in marathi pdf,Drama script in marathi for students, Drama Script in Marathi, ड्रामा स्क्रिप्ट ऑडिशन इन मराठी, marathi audition script.Best drama script in marathi, मराठी विनोदी नाटक स्क्रिप्ट pdf,मराठी नाटकांची नावे यादी.
Chan ahe script avdli
खूप खूप धन्यवाद !!
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमुळे अजून नवनवीन स्क्रिप्ट लिहायची ताकत मिळते.काही सजेशन असतील तर नक्की सांगा.
मानपूर्वक आभार..!