पूर्वकल्पना :
मित्रहो कसे काय आहात ? तुमच्यासाठी आपण रोज काहीतरी नवनवीन मेजवानी घेऊनच येत असतो तुमचाही प्रतिसाद खुप मिळतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज सुद्धा आपण एक ऑडिशन स्क्रिप्ट घेऊन आलोय “Children’s Monologues For Auditions in Marathi | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन “ .
या गोष्टीमध्द्ये एक लहान मुलगी आहे , ही मुलगी तिच्या दररोज होणाऱ्या पालकांच्या भांडणामुळे त्रस्त आहे. त्यांना खूप समजावते पण घरातली रोजची भांडण अजून कमी नाही झालीत. आज रविवार असल्याने तिला सुट्टी आहे पण सकाळी सकाळी आई-वडिलांची भाडण ऐकून ती आता त्यांना सांमजावायला लागली आहे. खास करून लहान मुलांसाठी ही स्क्रिप्ट खूप उपयोगी पडू शकते, त्यामुळे नक्की पूर्ण स्क्रिप्ट वाचा आणि कमेन्ट करून feedback जरूर कळवा.
पात्र:
मुलगी (८-१५ वर्ष )
वेळ:
१ मिनिट ३५ सेकंद

Best free Children’s Monologues For Auditions in Marathi | बेस्ट ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रन्स
आई -बाबा तुम्ही नका ना भांडू. प्रत्येक प्रॉब्लेम भांडूनच सॉल्व्ह होतो का ? (आई बाबांचं भांडण थांबवत)
दिवसा रात्री कधीही बघ घरात नुसती भांडण. कधी कधी वाटत आपण या घरात जन्माला का आलोय. हे बघा मला खूप कंटाळा आलाय तुमच्या अश्या वागण्याचा. ना धड खेळायला जावस वाटत ना धड अभ्यास करावासा वाटत. कधी १ दिवस स्कूल ला सुट्टी मिळाली तर म्हटलं थोडा आराम करू, तर झाल सकाळी सकाळी तुमच सुरु.
ए आजी जरा लवकर ये ” हे बघ काय यांचं पुन्हा सुरु झाल ” . तूच सांग यांना काहीतरी. अग स्कूलमध्ये मला टीचर खूप ओरडतात, म्हणतात तुझ लक्ष नाही क्लास मध्ये. आता दिवस रात्र हे भांडण ऐकून लक्ष कस लागणार अभ्यासात. सारखे आईबाबांचे चेहरे डोळ्यासमोर येत असतात की आज संध्याकाळी काय बर असेल नवीन.
आजी या वयात यांनी मला समजावलं पाहिजे ना, की तु अस नको करू, तस नुको करू पण नाही उलट मीच यांना समजावते. तुला एक सांगू …तु आहेस ना म्हणून मला टेंशन नाही आणि जर तु ही नसली असतीस तर? तर मी घर सोडून पळूनच गेले असते.
आजी मला एक सांग जसे माझे आई-बाबा भांडतात तसे तु आणि आजोबा सुद्धा भांडायचे का ग ? तुमच्यात पण अशीच भांडण व्हायची? सांग ना आणि मग बाबा तुमची भांडण सोडवायला यायचे का ?
काय सांगतेस तुमच्यात कधी भांडण झालीच नाहीत ! किती छान. मग यांनाच काय होत रोज रोज भांडण करायला. तु आधी आत जा ना आणि हे थांबावं नाहीतर माझी सुट्टी यांना समजावण्यातच जाईल.जा जा लवकर जा.
हे पण वाचा:
Marathi Audition Script PDF Monologue|मराठी ऑडिशन स्क्रिप्ट राजेश आणि राजनंदिनी …पहिली भेट
राजे पुन्हा जन्माला या (PDF)मोनोलॉग | Marathi Monologue For Male (MarathiAuditionScript)
Marathi Audition Script For Kids Free | चिल्ड्रन्स ऑडिशन स्क्रिप्ट फ्री

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Children’s Monologues For Auditions in Marathi | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन, Marathi audition script for kids, Marathi monologue for male,Monologue script in Marathi, Marathi monologue for female,Best free children’s monologues for auditions in marathi, Free children’s monologues for auditions in marathi online.