Best Monologues For Auditions Female | बेस्ट मोनोलॉग फॉर ऑडिशन फिमेल

पूर्वकल्पना:

नमस्कार मित्रहो आजची स्क्रिप्ट खास आपल्या मैत्रिणींसाठी ज्याना अभिनयाची आवड आहे आणि स्वतः काहीतरी करायची धमक आहे. ” Best Monologues For Auditions Female | बेस्ट मोनोलॉग फॉर ऑडिशन फिमेल ” ; या ठिकाणी थोडीशी आजच्या काळातील वास्तविकता दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक क्रूर व्यक्तीने एक मुलीला बंदिस्त केलेल आहे, तिच्यावर अन्याय अत्याचार होईल या भीतीने ती भयभीत झालेली आहे परंतु एक बाजूने त्या संकटावर मात करण्याचा विचार करत आहे. ती हताश होऊन जिवाच्या आकांताने आजूबाजूला मदतीची हाक देते आहे . सामाज्याला स्वतःची चूक विचारते आहे, आक्रोश करते आहे.

पात्र :

मुलगी ( वय वर्ष १०-२५ )

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

Best-Monologues-For-Auditions-Female
Best Monologues For Auditions Female | बेस्ट मोनोलॉग फॉर ऑडिशन फिमेल

Female Monologues For Auditions | १ मिनिट मोनोलॉग फॉर फिमेल

होय मी मुलगी आहे, मग हा काय गुंन्हा आहे का माझा ? सांगा ना ..गुन्हा आहे का ? आजपर्यत कधी नाही विचारलं पण आता गरज वाटली, वाटलं विचारावसं. काय करू श्वास घेणं सुद्धा कठीण करून ठेवलंय तुमच्यातल्याचं काही लोकांनी. मला आज सवलती नकोत , तुमच्या सोई-सुविधा नकोत ; हवा तो फक्त आदर. तेवढा द्या म्हणजे माझं जगणं सुरक्षित होईल.

तुमची कौतुकाची थाप, मायेने पाठीवरून फिरवलेला हात, प्रेमाने घेतलेला तो गालगुच्छा सगळं कस हवहवंसं वाटत,परंतु यतदेखील आजकाल वासना हळूच डोकावत असल्याची भीती वाटत राहते.
माझं खेळण केलत रे तुम्ही लोकांनी, मनाला जेव्हा वाटेल तेव्हा वाजवावं आणि नंतर फेकून द्यावं. मुळात मला या जगात येऊ दिल हेच माझं नशीब म्हणा.आजकाल सटवी सुद्धा यायची बंद झाली बहुतेक. पूर्वी यायची बाळाच्या मस्तकावर त्याच भविष्य लिहून जायची. आता ती सुद्धा कंटाळली , का उगाच पेनाची शाही आणि मेहनत वाया घालवायची. माणूस नावाचा जोतिषी बसलाय ना, तोच ठरवतो कुणाचं भविष्य किती आहे ते.त्याला वाटलं तर जन्माला घालील, नाही वाटलं तर मारून टाकेल.

मी अन्य काहीही मागत नाही आहे, फक्त माझा जगण्याचा हक्क तवढा माझ्याकडून हिरावून घेऊ नका. आता फक्त मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली अस नाही तर ती जगली वाचली तरच तिची प्रगती होईल.

(अचानक बदल …तिला कुठेतरी बांधून ठेवलाय आणी ती स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करते आहे… आणि पुढील डायलॉग…)
ए दादा कधीपासून मला इथे बांधून ठेवलय ? , माझे आईवडील मला शोधत असतील रे, एकदा ….एकदा या हातावरच बंधन काढून टाक मला मुक्त कर , तुझ्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचे आहेत. एकदा विचार कर तुझ्या हातात जिने लाल धागा बांधलाय ती जर माझ्या जागेवर असती तरीही तु असाच वागला असतास का ?
ऐकशील ना रे…. करशील ना माला मुक्त …..करशील ना…करशील ना ….(रडत…)

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा:

Marathi Natak Script For Students(Audition)|मराठी नाटक ऑडिशन स्क्रिप्ट

Marathi Serial Audition Script | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट

Best Monologues For Auditions Female Free PDF | बेस्ट मोनोलॉग फॉर ऑडिशन फिमेल फ्री पीडीएफ

PDF image 3
Download Now

Tag: Best Monologues For Auditions Female | बेस्ट मोनोलॉग फॉर ऑडिशन फिमेल, Best monologues for auditions female free, 1 minute monologues for females, Best monologues for auditions female from movies, Best monologues for auditions female funny , Female monologues from movies, Female monologues for auditions, Marathiauditionscript.

Leave a Comment