फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

पूर्वकल्पना:

एक फॅमिली आहे त्या फॅमिली मध्ये प्रॉपर्टी वरून वाद सुरू आहेत. दोन्ही बाजूनी प्रॉपर्टी मला कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या राहत असलेली जागा त्याच प्रमाणे गावची जागा, गावचे सण-उत्सव अशी बरीच करणे या भांडणाला कारणीभूत आहेत.।। ( Whatspp Channel जॉइन करा )

वेळ:

१ मिनिट

पात्र :

पुरुष (वय वर्ष ३५ ते ५० )

audition-script-marathi
फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

२०२४ मध्ये फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | पुरुषांसाठी मोनोलॉग स्क्रिप्ट (Monologue Script)

हे बघा तुम्हाला याआधी ही सांगितलंय आणि आताही सांगतोय तुमच्या वाट्याला आलेली प्रॉपर्टी ही तुम्ही आधीच विकून खाल्लीय, त्यामुळे तुम्ही आत्ता आमच्या वाट्यामध्ये ढवळा  ढवळ करू नका.

कमवायची अक्कल तर नाहीच पण जे वाडवाडिलांनी कमवून ठेवलय ते सुद्धा धुळीला मिळवलंय तुम्ही लोकांनी.
ज्यावेळी शेतजमिनीच्या वाटण्या झाल्या त्यावेळी तुझे ही वडील हयात होते आणि माझेही. त्यावेळी तुला काहीच अडचण नव्हती , आणी जर असतीच तर बोललास का नाही ?

आणी हो आता हे सर्व बोलून काहीही फायदा नाही. माझ्याकडे उपलब्ध असलेले संबंधित कागदपत्र मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवले आहेत आणी तरीदेखील विश्वास नसेल तर हे घ्या पूर्ण फाईल.

कसंय ना विकायची असती तर कधीच विकली असती. गिराइक लागत नाही म्हणून आजपर्यंत नाही राहिलीय, तर विकायची हिम्मत होत नाही आहे म्हणून राहिलीय. वाढवडिलांनी पै पै जमा करून स्वतःच्या घामाच्या पैशाने ही जमीन घेतली आहे, त्यामुळे या जमिनीपासून तुम्ही लांबच राहिलेलं बर.
आता गेल्या वर्षी गावच्या मीटिंग मध्ये ठरल्यप्रमाणे सण-वार हे  प्रत्येकाने गावी जाऊन करायचे. मग त्यादिवशी नागपंचमी ला का नाही गेलात गावी ? म्हातारा-म्हातारी असेपर्यंत ठीक होत कुणी जावा अथवा नका जाऊ पण आता आपल्यालाच बघायच आहे ना सगळं.

यावर्षी संडास बांधायचा हे ठरलेलं  ? हो की नाही ? हो ना मग ठरल्याप्रमाणे तुमच्या हिस्स्याचे पैसे एव्हाना जमा व्हायला हवे होते. झाले का जमा ? काय मी काय म्हणतोय झाले का जमा?
येतायत हिस्से मागायला,स्वतःच्याने काही नवीन करायची ताकत नाही पण जे नशिबाने मिळालय ते सुद्धा टिकवायच नाही.

हे बघा मला उगाच क्षुल्लक कारणावरून वाद नकोय, उगाच जगाला नाव ठेवायला कारण बाकी काही नाही.

मग आता गरज होती का हा विषय इथे काढण्याची, अरे प्रसंग काय तुम्ही करताय काय जरा तरी भान ठेवा. एकतर कित्येक वर्षानी आपल्या घरात काहीतरी मंगल कार्य होतय आणि त्यात स्वतहूंन विघ्न आणायच ही कितपत योग्य आहे ?

आणि बस हा आता मला याच्यापुढे कोणाचा एकही शब्द नकोय, बोलू या विषयावर आपण नंतर.

[आम्हाला फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

instagram
facebook
Youtube

हे पण वाचा:

नवरा-बायको(मोनोलॉग ) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट | Acting Audition Script Marathi

महाराष्ट्राची हास्य जत्रा और चला हवा येऊ द्या मे बेस्ट कौन है |Maharashtrachi Hasya Jatra Cast

Audition Scripts For Male Actors | ऑडिशन स्क्रिप्ट मराठी फॉर न्यू एक्टर्स पीडीएफ

PDF image 5
Download Now

Tag: dialogues marathi film marathi script for audition,navryala patra in marathi,script monologue,audition dialogue,monologue in marathi,audition scripts for males,एकपात्री नाटक script,मराठी ऑडिशन स्क्रिप्ट ,फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024,marathi audition script.

Leave a Comment