पूर्वकल्पना:
गणेश चतुर्थी जवळ येत असल्या कारणाने मंडळातील काही मूल ही वर्गणी मागायला फिरतायत. वर्गणी मागत मागत ते एका घरापाशी आले आहेत . आपापसात बोलणी करून आता घराची बेल वाजवायच्या तयारीत आहेत.आता पुढे ..(Audition Script in Marathi )
पात्र :
मुलगा (वय २०-३० वर्ष )
वेळ :
१ मिनिट ४० सेकंद
Audition Script in Marathi For Boy | मुलांसाठी ऑडिशन स्क्रिप्ट
टिंग टॉंग…(दाराची बेल वाजवतो) अरे थांबा रे … अशी डायरेक्ट बेल नाही वाजवायची .तुम्ही इथे कशाला आला आहात वर्गणी मागायला बरोबर की उधारीचे पैसे मागायला, नाही ना मग प्रेमाने बेल वाजवायची . बघ आता मी वाजवतो टिंग …. (मध्येच दार उधडतात) ..घंटा अर्धवटच राहिली…नाही नाही तुम्हाला काही नाही. काय काकू कश्या आहात, हो का छान छान. आम्ही पण उत्तम …. म्हणजे कसंय बरे,छान, चांगले,मस्त या सगळ्यांच्या वरती आपण पोचलेलो आहे , त्यामुळे उत्तमच.
(थोडासा मस्करी करण्याच्या उद्देशयाने )बर आमच इथे येण्याच प्रयोजन अस की प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही आपल्या चौकामध्ये गणपती बसवायचा आहे तर त्यासाठी वार्षिक वर्गणी जमा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. बोला कितीची पावती करू ? नाही म्हणजे तुम्ही स्वखुशीने कितीही आकडे भरू शकता .
५१ रुपये, फक्त ५१ रुपये . बर ठीक आहे थँक यु. चला रे. काकू कसय देवासाठी कोणी कीती पैसे देतो त्यापेक्षा तो यथाशक्ति काहीयरी देतो आहे याला महत्व आहे. ए एक मिनटं काय म्हणालात तुम्ही? नाही आत्ता तुम्ही कायतरी म्हणालात ? थांबा रे तुम्ही. काय ? आम्ही पैसे खातो ? म्हणजे हे जे लोकांच्या घरी जाऊन वर्गणी गोळा करतात ते आमच्यासाठी? ए ती गेल्यावर्शीची डायरी दे इकडे. दे रे … हे घ्या गेल्यावर्षीची जमा रक्कम बघा, किती आहे ? १.५ लाख आणी खर्च किती आहे ४.५ लाख .
हे वरचे जे ३.५ लाख आहेत ना ते पोरांनी लोकाकडे भिका मागून जमा केलेत, काहींनी स्वतःचे पगार घालवले पैसे फेडायला. तुमच्यासाठी गणपती 11 दिवस असतो ही पोर पुढचे ६ महिने हप्ते भरतात ते पण स्वतच्या खिशातून. पैसे खतात म्हणे.
आणी हो फक्त वर्गणी दिली की मी हक्क सांगायला मोकळा अस होत नसत. १२-१२ तास स्वतःची घरच्यांची झोप विसरून हे सगळे मंडपात असतात. 11 दिवस इथे एक पोलीस खाकी वर्दीत दिसत नाही का ? कारण ही पोर सगळया जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतात.
पैसे खतात म्हणे, काकू वाईट तुम्ही ५१ रुपये दिलेल्या वर्गणीच नाही वाटत, पण प्रामाणिक पणे काम करणाऱ्या पोरांवर भलते सलते आरोप लावता याच वाटत. इथे एकदा बोललात तेवढ पुरे बाहेर कुणाच्या तोंडावर बोलू नका, काय आहे ना आम्ही एकवेळ आमचा अपमान सहन करू शकतो पण बाप्पाचा नाही.
चला रे…आणी हो आरतीला हजर राहा , मान चुकवू नका नाहीतर बाप्पा आमच्यावर नाराज होईल.
हे पण वाचा:
फक्त एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट |1 Minute Monologues For Females
लव सीन(Romantic Movie Scenes) कैसे शूट किए जाते हैं?
Audition Script in Marathi PDF Download | ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ डाउनलोड
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Audition script in marathi pdf download, Audition script in marathi pdf, Audition script in marathi for male, Audition script in marathi for girl, Best audition script in marathi, Audition script in marathi for boy, marathi audition script.