पूर्वकल्पना:
हे पात्र कोकणातील आहे. तसेच कोकणातील माणूस आहे त्यामुळे मालवणी भाषा तर इथे आपोआप येते. आता विषय असा आहे की या सिनमध्ये वडील आणि मुलाचा संवाद आहे. मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय की गावात आता काय आहे ? सगळ तर शहरात आहे आणि त्यामुळे इथे असलेली शेती, घर विकू आणि शहरात मोठ्ठ घर घेऊ. ही सगळ ऐकून घेतल्यावर त्या वडिलांची प्रीतिक्रिया पुढीलप्रमाणे…..
पात्र:
वडील (मालवणी पात्र )वय ३०-५० वर्ष
वेळ :
१ मिनिट २० सेकंद
Short Audition Script For Male | शॉर्ट ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल
काय म्हटलंस ?? कोकणात काय हा ? माका वाटता तुका समजावूचाच लागतला. अरे दोन- चार शाळेचे वर्ग काय शिकलस आणी आता बोलान दाखवूक लागलस. कोंकणात काय हा म्हणता. तुझ्या पूर्वजाचो अक्खो जन्म गेलो कोकणात आणी आता माझो पण आणी तु मनावर घितलंस तर तुझो पण जातलो. गावातला सुखासुखी जीवन ह्या आमच्यासारख्या अडाणी माणसाक उमाजला पण शिकलेल्यांका नाय समाजला.
प्रगती करुच्या नावावर मुंबईक जावा रे नुको कोण म्हणता पण गाव घर इकुक काढलास तर त्याच्यासारख्या भयंकर पाप दुसरा खयचा नाय. खरा हा गावात म्हणण्यासारखो पैसो नाय पण सुख हा जा तडे लाखानी पैसे देवन गावाचा नाय. कोकणात आंबो हा रतांबो हा तिरफळ, केळी, भाजीपालो ,भातशेती हा आणी काय व्हया?
अख्या जगातलो पर्यटक आज कोकणात येता खेका ? गरिबांसारिबाक जा फुकट गावता ता तो पैसे देवन करता, नदीचा निर्मळ पाणी, ताजी हवा , घरचा जेवान ह्या सगळ्याचो आनंद लुट्टा. आज आमची संस्कृती भायरच्या लोकांका कळली पण आमका कधी कळतली. घरचो घरवडी, शेतातलो राखनदार हेंच्यावर आमची भोळी माया आसा आणी म्हणानच आज मालवणी माणूस जगाच्या पाठीवर बिनधास्त वावरता हा.
माझो तुझ्या खायच्याच गोष्टीक विरोध नाय हा तुका वाटला गावात रावाचा तर रव, तुका वाटला शहरात जावंचा तर जा पण कोणाचा आयकान गावाघराची,पूर्वजाच्या शेतीवाडीची राखरांगोळी करुची आसली तर मी तुका माफ करुचंय नाय.
गावात माझा घर हा ह्या एक्या वाक्यात जितक्या समाधान हा ना ता बाकी खेच्यात नाय. म्हणान आता ह्या सांगतय ता शेवटचा, परत माका बोलाक लावू नुको. जा अवशीन आज सुकटाचा सारं आणी सोलकडी केल्यानं हा जेवन घी आणी मगे जा खय जावंचो तो.
हे पण वाचा:
एकदम जबरदस्त मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Male
Tollywood Number 1 Hero Kon Hai | टॉलीवूड नंबर १ हीरो कौन है ??
Free Audition Script For Male | फ्री ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ डाउनलोड करा
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Audition Script For Male | मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल, Free audition script for male, Audition Script for male in Hindi, Short audition script for male, Best audition script for male, Audition script for male pdf, Audition Script in Hindi pdf.