पूर्वकल्पना:
आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्क्रिप्ट घेऊन आलो आहे Audition Script For Girl | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर गर्ल .. इथे एक मुलगी आहे जी राहुल नावाच्या मुलावर जिवापाड प्रेम करते. काही दिवसापासून तिच्या हे लक्षात येत की राहुल तिच्याबरोबर बोलण्यास,भेटण्यास टाळाटाळ करतो आहे. आज त्यांनी एक ठिकाणी भेटायच ठरवल आहे. आता पुढे.... [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
पात्र:
मुलगी (वय वर्ष २२-३०)
वेळ:
१ मिनिट ३० सेकंद
Best Audition Script For Girl in Marathi | बेस्ट ऑडिशन स्क्रिप्ट फॉर गर्ल इन मराठी
राहुल हे काय चाललंय ? मला कळेल का ? हे बघ तुला चांगलच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतेय ते. तु एकदिवस नीट बोलतोस आणी दोन दिवस मोबाईल स्विच ऑफ ठेवतोस, मी नक्की काय समजायचं ? काय झाल असेल ? माझं काही चुकलं असेल का ? अश्या अनेक प्रश्नांनी डोक खायला उठत माझं. तुला एकच आणी शेवटच सांगतेय तु या गोष्टीमध्ये सिरीयस असशील तरच आपण पुढे continue करू नाहीतर संपवून टाकू सगळं.
एकतर मी माझ्या घरच्यांशी खोट बोलले …कश्यासाठी ? तुझ्यासाठी …आपल्या दोघांच्या प्रेमासाठी, आणी एक तु आहेस ज्याला काही पडलेलीच नाही. माझ्या बाबांना हे जर कळलं ना तर उद्याच्या उद्या ते माझं लग्न लावून देतील. आत्ता सुद्धा तु किती वाजता येणार होतास आणी आलास किती वाजता ? यार दुसऱ्याच्या वेळेला थोडी तरी किंमत दे ना.
आता काही बोलणार आहेस की मी जाऊ परत. आज मी भेटायला आले कारण तु प्रॉमिस केल होतस की तु सर्व सोडून देणार आहेस, आणि हो सर्व म्हणजे सर्व हा. तुझ बाहेर काय काय चाललेलं असत ते मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे मी काही बोलत नाहीय त्याचा फायदा घेऊ नकोस.कळलं !
ते तुझ जॉब च काय झाल ? एवढा चकित कसला होतोस, जॉब च काय झाल ? तु बोलला होतास ना मित्राच्या कंपनीत जॉब भेटलाय म्हणून. तु माझ्या घरच्यांच्या अपेक्षा ऐकल्या आहेस ना , त्यांच्या मनासारखं नसेल तर लग्न सोड तुझ्यासोबत बोलायला सुद्धा बंदी करतील मला. म्हणजे तु आज ठरवूनच आला आहेस की बोळायचच नाही म्हणून.
हे बघ मला जे सांगायचं होत ते मी सांगितलंय आता काय करायचं ते तु ठरव. मला उशीर होतोय मी निघते.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
वडील या पात्रासाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Audition script For Male
Mobile Se Film Shooting Kaise Kare| मोबाइल से फिल्म शूटिंग कैसे करें?
1 Minute Monologues For Females Free | ऑडिशन स्क्रिप्ट मोनोलॉग फॉर फिमेल फ्री PDF
Tag: 1 minute monologues for females, Audition Script For Girl | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर गर्ल, Best audition script for girl, Audition script for girl in english, Free audition script for girl, Short audition script for gir, Audition Script for girl in Hindi,script for audition for female.