पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो आज आपण तुमच्यासाठी खूप छान अशी स्क्रिप्ट घेऊन आलेलो आहोत ” Script For Audition in Marathi For Female| महिलांसाठी मराठी ऑडिशन स्क्रिप्ट “ . या स्क्रिप्ट मध्ये खासियत अशी आहे की इथे वापरण्यात आलेली भाषा ही एकदम गावरान भाषा आहे त्यामुळे सादर करताना खूप मज्जा येणार आहे. तर गोष्ट अशी आहे की दोन अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. एका मैत्रिणीला एक मुलगा आवडतो आणि ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते परंतु दुसरी मैत्रीण तिला समजावते आहे की हे सर्व जस दिसतय तस नसतय , ती तिला या चार चांगल्या गोष्टी सांगते आहे. आता पुढे.. .. [नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
पात्र :
गावाकडची मुलगी (वय वर्ष २०-३५ )
वेळ :
१ मिनिट ५० सेकंद
Short Script For Audition in Marathi For Female | महिलांसाठी शॉर्ट आणि गावरान भाषेतील ऑडिशन स्क्रिप्ट
ए चंदे काय मॅड बीड झाली क काय..डोळ झाकून कुणावं बी ईश्वास ठेवती व्हय? तुला आधीच सांगायलोय हे जे काय बी तु करते ना एक दिस तुझ्याच अंगाशी येईल बघ. कोण कुठला त्यो पोरगा कधी त्याला बघितलं बी न्हाय अन त्याच्याशी संगट करायला निघाली तु. ते काय बी न्हाय त्याला आताच्या आता फोन लाव अन ईशय संपून टाक.
हा आता मैत्रिणीपेक्षा पिरेम मोठ दिसाया लागलाय वय. साळेत बाजूच्या बाकावर बसलेल्याशी बी बोलाया तुला भ्या वाटायचं अन आता बाजूच्या न्हाय तर गावाभाहेच्या लोकांशी तु बिधास बोलती. तु कोणाशी बी बोल, मला काय बी तरास न्हाय पर माणूस परखल्याशिवाय त्याच्याव ईश्वास ठेवण कितपत योग्य हाय.
आग ” मनाच्या तारा ह्या कुठून बी येत्यात अन कुठ बी जुळत्यात पर कधीतरी एखादया तारेला लायटीचा शॉक बी असतोया “ कळतंय ना म्या काय म्हणायलोय. ” अचानक जुळलेलं नात हे तुटायला बी येळ लागत न्हाय पर त्यापरीस, एकमेकांचा ईश्वास मुरवून -मुरवून तयार व्हणार नात हाय क नाय लई येळ टिकतं बघ.
आता तुझ्या अण्णा अन नानी च बघ की त्या येळेला तर ह्यो मोबाईल बी नव्हता तरीबी एकमेकांच्या साथीन इथवर आलेत. तुला एकच सांगते अन टोकाच सांगते तुमच्या नात्यात जर नितळ पाण्यावानी खरेपणा असलं ना तर कंची बी गोष्ट तुम्हाला मध्ये न्हाय यायची. इतकंच काय अण्णा अन नानी बी सवता तुमच लगीन लावून देतील. फकस्त तोवर तुम्हा दोघांला बी धीर धरावा लागल.
तवर पोटापाण्याचं, रवण्या-जेवन्याच बघा की वाईच, का धीर धरवना झालाय. (गमतीत)…अन आईकलस का, दुनिया हिकडंची तिकड होऊ देत पर म्या तुझी साथ देईन,तितकच कुणाला तरी मदत केल्याच समाधान मिळलं मला.
नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) आणि खाली कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून अभिप्राय नक्की कळवा.
हे सुद्धा वाचा:
Marathi Serial Audition Script | मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट
Female Audition Script | फिमेल ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी
Script For Audition in Marathi For Female PDF Download Free | महिलांसाठीची खास ऑडिशन स्क्रिप्ट पीडीएफ फ्री मध्ये डाउनलोड करा
Tag: Script For Audition in Marathi For Female| महिलांसाठी मराठी ऑडिशन स्क्रिप्ट, Script for audition in marathi for female pdf download, Short script for audition in marathi for female, Script for audition in marathi for female pdf,Script for audition in marathi for female online, Script for audition in marathi for female in english, Marathi audition script.