नमस्कार, मी सौरभ घाडीगावकर राहणार कोकण ” सिंधुदुर्ग ” , लहानपणापासूनच मला एक्टिंग, नाटक, एकांकिका, ड्रामा, स्कीट, कॉमेडी, सोंग , वाद्य या सगळ्याची आवड आहे .
अगदी लहान असल्यापासून मला कला हे क्षेत्र अगदी जवळचे आहे. मुळातच आमच्या घरात कुणीही कला क्षेत्रामध्ये करिअर केलेलं नाही परंतु कलेचा वारसा नक्की आहे.
त्यामुळेच या सगळ्या गोष्टी कदाचित माझ्यापर्यंत आल्या, तसा मी ” कम्प्युटर इंजिनियर आहे ” आणि सध्या ” हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनियर” म्हणून जॉब करतोय.
परंतु नक्की येत्या काही काळात या कला क्षेत्रामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, आणि त्यामुळेच ही छोटीशी सुरुवात. माझ्यासारख्या अनेक नवीन आणि होतकरू कलाकारांसाठी ” Marathiauditionscript ” मोफत उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
तरी सर्वांना एक विनंती आहे , मी कोणीही प्रोफेशनल नाही परंतु मला कलेची जाण आहे, त्यामुळे ज्या गोष्टी मला माहित आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. नक्की मला सपोर्ट करा.
खाली सोशल मीडिया प्रोफाइल सुद्धा दिलेले आहेत नक्कीच मला फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब वर फॉलो करा आणि तुमच्या काही नवीन रिक्वायरमेंट असतील तर कमेंट करून नक्की सांगा, आपण शंभर टक्के प्रयत्न करू
धन्यवाद!!(मालवणी माणूस).